Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > आंखे रातभर जगी.. डोळे थकलेत अनेकांचे, दृष्टी होतेय अधू-पाहा डोळ्यांवरचा स्ट्रेस कमी करणारे ५ उपाय

आंखे रातभर जगी.. डोळे थकलेत अनेकांचे, दृष्टी होतेय अधू-पाहा डोळ्यांवरचा स्ट्रेस कमी करणारे ५ उपाय

Eye Care Tips- Simple Habits to Keep Your Eyes Healthy and Strong : डोळ्यांची काळजी घेण्यासाठी टिप्स. पाहा काय करावे.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2026 14:45 IST2026-03-13T14:42:12+5:302026-03-13T14:45:19+5:30

Eye Care Tips- Simple Habits to Keep Your Eyes Healthy and Strong : डोळ्यांची काळजी घेण्यासाठी टिप्स. पाहा काय करावे.

Eye Care Tips- Simple Habits to Keep Your Eyes Healthy and Strong | आंखे रातभर जगी.. डोळे थकलेत अनेकांचे, दृष्टी होतेय अधू-पाहा डोळ्यांवरचा स्ट्रेस कमी करणारे ५ उपाय

आंखे रातभर जगी.. डोळे थकलेत अनेकांचे, दृष्टी होतेय अधू-पाहा डोळ्यांवरचा स्ट्रेस कमी करणारे ५ उपाय

डोळे हा शरीरातील अत्यंत नाजूक आणि महत्त्वाचा अवयव. आपला दैनंदिन दिनक्रम, सततचा स्क्रीनचा वापर, कमी झोप आणि चुकीच्या सवयी यांचा थेट परिणाम डोळ्यांच्या आरोग्यावर होत असतो. (  Eye Care Tips- Simple Habits to Keep Your Eyes Healthy and Strong)आजकाल मोबाइल, लॅपटॉप आणि टीव्हीचा वापर मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे अनेकांना डोळे दुखणे, कोरडेपणा, जळजळ, लालसरपणा किंवा दृष्टी कमी होणे अशा समस्या जाणवू लागल्या आहेत. त्यामुळे डोळे निरोगी ठेवण्यासाठी काही साध्या सवयी अंगीकारणे आणि काही गोष्टी टाळणे अत्यंत गरजेचे आहे.

डोळ्यांची काळजी घेण्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पुरेशी झोप. दररोज किमान सात ते आठ तासांची झोप घेतली तर डोळ्यांना योग्य विश्रांती मिळते. झोप कमी झाल्यास डोळे जड वाटणे, सूज येणे किंवा लाल होणे असे त्रास होऊ शकतात. त्याचबरोबर दिवसभर स्क्रीनकडे पाहत काम करत असाल तर मधूनमधून ब्रेक घेणे खूप आवश्यक आहे. सतत मोबाइल किंवा कॉम्प्युटरकडे पाहिल्याने डोळ्यांवर ताण येतो. त्यामुळे थोड्या वेळाने स्क्रीनपासून नजर दूर करुन काही वेळ दूरच्या वस्तूकडे पाहिल्यास डोळ्यांना आराम मिळतो.

दिवसभरात काही वेळा थंड पाण्याने डोळे धुतल्यानेही डोळ्यांचा थकवा कमी होतो आणि डोळ्यांना ताजेतवाने वाटते. तसेच आहाराकडेही विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. गाजर, हिरव्या पालेभाज्या, फळे, बदाम आणि अक्रोड यांसारख्या पदार्थांमध्ये डोळ्यांसाठी उपयुक्त पोषक घटक असतात. अशा पदार्थांचा नियमित आहारात समावेश केल्यास डोळ्यांचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होते. उन्हात बाहेर जाताना सनग्लासेस वापरणेही फायद्याचे ठरते, कारण सूर्याच्या तीव्र किरणांपासून डोळ्यांचे संरक्षण होते.

यासोबतच काही सवयी टाळणेही तितकेच महत्त्वाचे आहे. अनेकांना डोळे खाजल्यास किंवा त्रास झाल्यास डोळे चोळण्याची सवय असते. मात्र हात स्वच्छ नसतील तर यामुळे संसर्ग होण्याचा धोका वाढतो. तसेच खूप कमी प्रकाशात वाचन करणे किंवा मोबाइल वापरणेही डोळ्यांसाठी त्रासदायक ठरू शकते. डोळ्यांसाठी वापरला जाणारा मेकअप इतरांसोबत शेअर करणे किंवा एक्सपायर झालेला मेकअप वापरणे टाळणे आवश्यक आहे, कारण त्यामुळे संसर्ग होण्याची शक्यता असते.

जर डोळे सतत दुखत असतील, पाणी येत असेल किंवा दृष्टी धूसर वाटत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नये. अशा वेळी तज्ज्ञांचा सल्ला घेणे गरजेचे असते. डोळ्यांची काळजी घेण्यासाठी फार मोठे बदल करण्याची गरज नसते, फक्त रोजच्या जीवनात काही चांगल्या सवयी अंगीकारल्या तर डोळे दीर्घकाळ निरोगी आणि सुरक्षित राहू शकतात.

Web Title : आँखों की थकान: आँखों के तनाव को कम करने के पांच उपाय।

Web Summary : पर्याप्त नींद लेकर, स्क्रीन से ब्रेक लेकर, ठंडे पानी से धोकर और स्वस्थ भोजन खाकर अपनी आंखों को तनाव से बचाएं। आंखों को रगड़ने और एक्सपायर हो चुके मेकअप का उपयोग करने से बचें। लगातार समस्याओं के लिए डॉक्टर से सलाह लें।

Web Title : Sleepless nights strain eyes: Five ways to reduce eye stress.

Web Summary : Protect your eyes from strain by getting enough sleep, taking breaks from screens, washing with cold water, and eating healthy foods. Avoid rubbing eyes and using expired makeup. Consult a doctor for persistent issues.