हल्ली बदललेल्या रुटीनमध्ये आजारांचं स्वरुपही बदललं आहे. पुर्वी जे आजार वयस्कर लोकांना व्हायचे तेच आजार आता तरुण पिढीला छळत आहेत. त्यामुळेच तर आपण आपल्या आजुबाजुला असे अनेक लोक सध्या पाहात आहोत ज्यांना हृदयरोग, मधुमेह, बीपी असे त्रास होत आहेत. काही जणांचं कोलेस्टेरॉल आणि शुगर तर सतत वाढलेली असते (How To Control Sugar And Cholesterol Level?). यावर डॉक्टरांचा सल्ला घेऊन योग्य तो औषधोपचार आणि आहार घेणं तर गरजेचं आहेच. पण तरीही हे काही घरगुती उपायही तुम्ही करून पाहू शकता..(expert suggests 4 remedies to control sugar and cholesterol)
वाढतं कोलेस्टेरॉल आणि शुगर कमी करण्यासाठी उपाय
कोलेस्ट्रॉल आणि रक्तातील वाढलेली साखर या दोन्ही गोष्टी नियंत्रित ठेवायच्या असतील तर त्यासाठी काय उपाय करता येतील याविषयीची माहिती डॉक्टरांनी ambernathmadhavbaug या इंस्टाग्राम पेजवर शेअर केली आहे. यामध्ये त्यांनी एकूण ४ उपाय सांगितले आहेत. हे उपाय तुम्ही तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घेऊनच करून पाहावेत..
भर उन्हाळ्यातही सर्दी होऊन नाक गळतं, सटासट शिंका येतात? काय यामागची कारणं आणि उपाय
१. डॉक्टरांनी सांगितलेला पहिला उपाय म्हणजे ज्यांना कोलेस्टेरॉलचा आणि शुगरचा त्रास असते अशा व्यक्तींनी दुपारच्या आणि रात्रीच्या जेवणाच्या आधी २ टाेमॅटो कच्चे खावेत आणि त्यानंतर पुढचे जेवण करावे. यामुळे खूप चांगला फरक दिसून येईल असं डॉक्टर सांगतात.
कडाकड चावणाऱ्या डासांमुळे वैतागलात? बाल्कनीमध्ये ५ रोपं लावा- डास दूर पळून जातील
२. दररोज सकाळी नाश्त्याच्या वेळी घरात ज्या भाज्या असतील त्या सगळ्या भाज्या एकत्र करा आणि त्यांचा १०० मीली एवढा ज्यूस किंवा सूप करून प्या. यामुळेही कोलेस्टेरॉल आणि रक्तातील साखरेची पातळी कमी व्हायला मदत होते.
३. सकाळी नियमितपणे एक आवळा चावून खा किंवा मग आवळ्याचा रस प्या. यामुळेही खूप चांगला फरक पडेल, असं डॉक्टरांचं म्हणणं आहे.
वाट्यांचं मंगळसूत्र नेहमीचंच, आता घ्या नव्या फॅशनचं टेम्पल डिझाईन मंगळसूत्र, १० सुंदर डिझाईन्स
४. याशिवाय त्यांनी सांगितलेला आणखी एक महत्त्वाचा उपाय म्हणजे तुमच्या आहारातून दूध तसेच दुग्धजन्य पदार्थ आणि बेकरीचे पदार्थ हे सगळं पुर्णपणे बंद करा. याचाही खूप चांगला परिणाम रक्तातील साखर आणि कोलेस्टेरॉल कमी होण्यावर दिसून येईल.