Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > डोळ्यांनी कमी किंवा धुसर दिसतं? 'हा' गंभीर आजारही झालेला असू शकतो, पाहा लक्षणं

डोळ्यांनी कमी किंवा धुसर दिसतं? 'हा' गंभीर आजारही झालेला असू शकतो, पाहा लक्षणं

Diabetes Symptoms : डोळ्यांनी जर कमी दिसत असेल तर हे एका गंभीर आजाराचं लक्षण असू शकतं. ज्यामुळे वेळीच सावध होण्याची गरज आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2025 12:57 IST2025-07-28T12:07:53+5:302025-07-28T12:57:35+5:30

Diabetes Symptoms : डोळ्यांनी जर कमी दिसत असेल तर हे एका गंभीर आजाराचं लक्षण असू शकतं. ज्यामुळे वेळीच सावध होण्याची गरज आहे.

Expert says blurred vision can be a sign of diabetes, know symptoms | डोळ्यांनी कमी किंवा धुसर दिसतं? 'हा' गंभीर आजारही झालेला असू शकतो, पाहा लक्षणं

डोळ्यांनी कमी किंवा धुसर दिसतं? 'हा' गंभीर आजारही झालेला असू शकतो, पाहा लक्षणं

Diabetes Symptoms : अलिकडे कमी वयातच जवळचा किंवा दूरचा चष्मा लागणं कॉमन झालं आहे. आधी वाढत्या वयात लोकांना डोळ्यांनी कमी दिसयाचं. पण आता तर लहान मुलांना सुद्धा जवळचं किंवा दूरचं कमी दिसू लागलं आहे. महत्वाची बाब म्हणजे आपले डोळे आपल्या शरीरात नेमकी काय गडबड सुरू आहे किंवा आरोग्य कसं आहे याबाबत खूप काही सांगत असतात. अशात डोळ्यांनी जर कमी दिसत असेल तर हे एका गंभीर आजाराचं लक्षण असू शकतं. ज्यामुळे वेळीच सावध होण्याची गरज आहे. कारण हा आजार असा आहे जो आयुष्यभर आपला पिच्छा सोडत नाही. पाहुयात कोणता आहे हा आजार...

प्रसिद्ध न्यूट्रिशनिस्ट लीमा महाजन यांनी इन्स्टाग्रामवर अलिकडेच एक व्हिडीओ शेअर केलाय. ज्यात त्या सांगतात की, दृष्टी जर कमी झाली असेल किंवा धुसर दिसत असेल हा डायबिटीसचा संकेत असू शकतो. शरीरात जर शुगर वाढली असेल तर ब्लर्ड व्हिजन म्हणजे धुसर दिसणं हे सगळ्यात कॉमन आहे.

जर आपल्यासोबतही असं काही होत असेल तर वेळीच सावध होण्याची गरज आहे. आज आपण हेच समजून घेणार आहोत की, हाय ब्लड शुगरमुळे डोळे कसे प्रभावित होतात आणि यामुळे दृष्टी का कमी होते.


डायबिटीस काय आहे?

डायबिटीस आजार जगभरात एक मोठी समस्या बनला आहे. हा एक गंभीर आजार असून यामुळे शरीरात इतरही आजार घर करू शकतात. डायबिटीस झाला असेल तर ब्लडमध्ये शुगरची लेव्हल खूप जास्त वाढते. हे तेव्हा होतं जेव्हा शरीर पुरेसं इन्सुलिन तयार करू शकत नाही किंवा इन्सुलिनचा योग्यपणे वापर करू शकत नाही. चिंतेची बाब म्हणजे या आजारावर कोणताही ठोस उपाय नाही. हा आजार केवळ कंट्रोल केला जाऊ शकतो. लाइफस्टाईल बदल, फायबर असलेले पदार्थ, नियमितपणे व्यायाम, संतुलित आहार या गोष्टी फॉलो करून हा आजार कंट्रोल करता येऊ शकतो.

डायबिटीसची लक्षणं

शरीरात जेव्हा ब्लड शुगर हाय होते तेव्हा वेगवेगळी लक्षणं दिसू लागतात. ज्यांकडे दुर्लक्ष करणं महागात पडू शकतं. जर वेळीच ही लक्षणं ओळखता आली तर योग्य ते उपचारही घेता येतील. डायबिटीसची काही लक्षणं खालीलप्रमाणे सांगता येतील.

- खूप जास्त तहान लागणे

- जास्त वेळा लघवीला जावं लागणे

- धुसर दिसणे किंवा दृष्टी कमजोर होणे

- सतत थकवा जाणवणे

- विनाकारण वजन कमी होणे

ब्लड शुगर वाढल्यास डोळ्यांचं नुकसान

जर अचानक दृष्टी कमजोर झाली असेल किंवा थांबून थांबून धुसर दिसत असेल तर हा डायबिटीसचा मुख्य संकेत असू शकतो. जॉन्स हापकिंस मेडिसिनच्या रिपोर्टनुसार, जेव्हा ब्लडमध्ये ग्लूकोज जास्त जमा होतं आणि ते कोशिकांपर्यंत पोहोचू शकत नाही, तेव्हा रक्तवाहिन्या आणि नर्वसचं नुकसान होतं. ज्यामुळे डोळ्यांचं नुकसान होतं. अशात हे गरजेचं आहे की, आपली शुगर नियमितपणे तपासा आणि डोळ्यांची टेस्टही करा.

CDC नुसार, डायबिटीसमुळे हळूहळू डोळ्यांचं नुकसान होतं. दृष्टी तर कमजोर होतेच, सोबतच पुढे जाऊन दृष्टी पूर्णपणे जाऊ सुद्धा शकते. मात्र, डायबिटीस कंट्रोलमध्ये ठेवून डोळ्यांचं नुकसान टाळता येऊ शकतं. 

Web Title: Expert says blurred vision can be a sign of diabetes, know symptoms

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.