Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > सोशल मीडियाच्या अतीवापराने डोक्यावर परिणाम, एकटेपणा वाढून बिघडतेय मानसिक संतूलन; संशोधनाचा नवा दावा

सोशल मीडियाच्या अतीवापराने डोक्यावर परिणाम, एकटेपणा वाढून बिघडतेय मानसिक संतूलन; संशोधनाचा नवा दावा

social media use loneliness and psychological distress in emerging adults: social anxiety and loneliness a systematic review: Social media side effects: Can social media cause loneliness?: How to get used to loneliness?: Does social media make you lonely: Social media and loneliness research: सोशल मीडियाच्या अधिक वापरामुळे लोकांमध्ये एकटेपणा जाणवत आहे. ज्यामुळे त्यांचे मानसिक संतुलन बिघडत असून ते भावनाशून्य पद्धतीने वागताय असे बेलर विद्यापीठाच्या संशोधनात म्हटले आहे.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2025 16:55 IST2025-02-12T16:53:15+5:302025-02-12T16:55:25+5:30

social media use loneliness and psychological distress in emerging adults: social anxiety and loneliness a systematic review: Social media side effects: Can social media cause loneliness?: How to get used to loneliness?: Does social media make you lonely: Social media and loneliness research: सोशल मीडियाच्या अधिक वापरामुळे लोकांमध्ये एकटेपणा जाणवत आहे. ज्यामुळे त्यांचे मानसिक संतुलन बिघडत असून ते भावनाशून्य पद्धतीने वागताय असे बेलर विद्यापीठाच्या संशोधनात म्हटले आहे.

Excessive use of social media affects the head, increases loneliness and anxiety mental balance research claims | सोशल मीडियाच्या अतीवापराने डोक्यावर परिणाम, एकटेपणा वाढून बिघडतेय मानसिक संतूलन; संशोधनाचा नवा दावा

सोशल मीडियाच्या अतीवापराने डोक्यावर परिणाम, एकटेपणा वाढून बिघडतेय मानसिक संतूलन; संशोधनाचा नवा दावा

सोशल मीडियाचे जाळे जगभर पसरले आहे. सध्या आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यातील अविभाज्य भागही सोशल मीडिया बनला आहे. (social media use loneliness) अगदी लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत अनेकजण सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रीय असतात.  सोशल मीडियावर पोस्ट केल्यानंतर किती लाईक्स मिळाले, किती कॉमेंट्स आल्या हे वारंवार तपासतात. सतत रिल्स किंवा स्क्रिन स्क्रोल करत राहातात. (social anxiety and loneliness a systematic review) याच्या वाढत्या वापरामुळे एकटेपणा येतोय, असे संशोधनात म्हटले आहे. 
पर्सनॅलिटी अँड सोशल सायकॉलॉजी बुलेटिन या जनर्लमध्ये बेलर विद्यापीठाने केलेल्या संशोधनात असे म्हटले की,(Social media side effects) लोकांशी संवाद साधणारे सोशल मीडिया आता एकटेपणाला कारणीभूत ठरत आहे. सतत काही ना काही पाहात राहाणे, स्क्रोल करणे किंवा ब्राउझिंगवर सर्च करण्याचा वापर अधिक वाढला आहे. यामध्ये पोस्ट आणि इतरांशी संवाद साधण्याचा समावेश एकटेपणाच्या भावनांशी जोडण्यात आला आहे. 

संशोधनातून असे सिद्ध झाले आहे की, डिजिटल संवादांची गुणवत्ता वाढत असून समोरासमोर संवाद साधणे लोकांना कठीण होतयं. ज्यामुळे मानसिक संतुलन बिघडते आहे, असे जेम्स ए. रॉबर्ट्स यांनी म्हटले आहे. ते म्हणाले की, सोशल मीडियाचा वापर सध्याचा जगात कितीही फायदेशीर असला तरीही लोकांमधील एकाकीपणाची भावना कमी करत नाही. त्यांनी असेही म्हटले की, एकाकीपण आणि सोशल मीडियामध्ये प्रतिस्पर्धा सुरु आहे. लोक आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी सोशल मीडियाचा आधार घेतात. परंतु, ते योग्य वेळी व्यक्त न झाल्यामुळे त्यांच्यात एकटेपणाची भावना निर्माण होते.