Join us
Daily Top 2 Weekly Top 5

थंडीचे ३ दोस्त-हिवाळ्यातले ३ सुपरफूड-केस आणि त्वचेसह बदलून टाकतील तुमचं रुप, दिसाल सुंदर-फिट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2025 19:47 IST

Health Tips For Winter: हिवाळ्यात त्वचा, केस यांच्या वेगवेगळ्याा समस्यांपासून ते आरोग्याच्या कित्येक तक्रारींवर उपाय हवा असेल तर पुढे सांगितलेले काही पदार्थ तुमच्या आहारात नियमितपणे घ्यायला सुरुवात करा.(everyone must eat 3 superfood in winter)

ठळक मुद्दे हिवाळ्यात सुपरफूड मानले जाणारे कोणते पदार्थ प्रत्येकानेच आवर्जून खायला हवे, याची माहिती सेलिब्रिटी आहारतज्ज्ञ ऋजुता दिवेकर यांनी सोशल मीडियावर शेअर केली आहे.

जसा जसा ऋतू बदलत जातो तसा तसा त्याचा आरोग्यावर वेगवेगळा परिणाम होत जातो. ऋतू बदलला की त्वचेची, आरोग्याची काळजी घेण्याची पद्धतही बदलते. तसाच बदल आपल्या आहारामध्येही होतो. आता हेच पाहा ना. सध्या हिवाळा सुरू आहे. त्यामुळे या दिवसांत  त्वचा काेरडी पडणे, तळपायांना भेगा पडणे, अंगाला खाज येणे, केस गळणे, कोंड्याचं प्रमाण वाढणे, कॉन्स्टिपेशन असे कित्येक त्रास डोकं वर काढू लागतात (Health Tips For Winter). हे त्रास कमी करायचे असतील तर आहारात थोडा बदल करायला हवा (winter superfood for healthy hair and skin). त्यासाठी हिवाळ्यात सुपरफूड मानले जाणारे कोणते पदार्थ प्रत्येकानेच आवर्जून खायला हवे, याची माहिती सेलिब्रिटी आहारतज्ज्ञ ऋजुता दिवेकर यांनी सोशल मीडियावर शेअर केली आहे.(special food in winter to get rid of dry skin, dry scalp, bloating, constipation)

हिवाळ्यात कोणते पदार्थ आवर्जून खायलाच हवे?

 

१. बाजरी

ऋजुता दिवेकर सांगतात की बाजरी हिवाळ्यात खायलाच हवी. भाकरी, बाजरीचा भात, लाडू अशा कोणत्याही पदार्थाच्या माध्यमातून बाजरी खाऊ शकता.

हिवाळ्यात करून खा प्रोटीन रिच मेथी पनीर पराठा- मुलांचा डबा, नाश्त्यासाठी खमंग, खुसखुशीत बेत

बाजरी तुमच्या हाडांसाठी, मेंदूसाठी खूप फायदेशीर असून केस गळणं कमी करण्यासाठीही बाजरीचा फायदा होतो. हिमोग्लोबिन कमी झालं असेल, एनर्जी थोडी कमी झाली असेल तरीही बाजरी तुम्हाला पुन्हा नक्कीच रिफ्रेश करू शकते.

 

२. उंदियाे

दुसरा पदार्थ आहे उंदियाे. गुजरातमध्ये या दिवसांत उंदियो घरोघरी करून खाल्ला जातो. वेगवेगळ्या डाळी आणि या दिवसांत मिळणाऱ्या ताज्या भाज्या यांच्या मिश्रणातून उंदियो तयार होतो.

बिनसाखरेचा चहा-कॉफी पिऊनही वजन घटत नाही कारण ‘ही’ बेचव चूक करते घात, हलतच नाही वजनाचा काटा

त्यामुळे आठवड्यातून एकदा तरी उंदियो खायला हवा. उंदियो हे एक उत्तम प्री- बायोटिक आहे. त्यामुळे पचन, मेटाबॉलिझम चांगले होण्यासाठीही त्याची मदत होते.

 

३. खोबरं

हिवाळ्यातलं एनर्जी बुस्टर म्हणजे सुकं खोबरं. खोबरं खाल्ल्यामुळे अंगात ताकद तर येतेच. पण त्वचा आणि केस देखील अधिक चांगले होतात. त्यांचा काेरडेपणा कमी होतो.

धुळीमध्ये गेल्यावर सटासट शिंका येतात- श्वास घ्यायला त्रास होतो? ५ उपाय- धुळीचा त्रास होणार नाही

त्यामुळे खोबऱ्याचा एक तुकडा दिवसभरातून कधीही एकदा बारीक चावून नक्की खा. दातांचं आरोग्य सुधारण्यासही मदत होईल. 

 

English
हिंदी सारांश
Web Title : Eat these 3 superfoods in winter for healthy skin and hair.

Web Summary : Celebrity nutritionist Rujuta Diwekar recommends consuming bajra, undhiyo, and coconut this winter. These superfoods help combat dryness, hair fall, and constipation, promoting overall health, better skin, and strong hair.
टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्सहिवाळाहिवाळ्यातला आहारथंडीत त्वचेची काळजी