Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > पाणी पिताना हमखास सगळेच करतात ‘या’ ४ चुका, पाणी पिऊनही तब्येत बिघडण्याचा धोका

पाणी पिताना हमखास सगळेच करतात ‘या’ ४ चुका, पाणी पिऊनही तब्येत बिघडण्याचा धोका

Everyone makes these 4 mistakes while drinking water, there is a risk of health deterioration : पाणी पिताना काळजी घेणे आवश्यक. पाहा काय चुकत आहे ते.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2025 14:04 IST2025-03-15T13:49:07+5:302025-03-15T14:04:39+5:30

Everyone makes these 4 mistakes while drinking water, there is a risk of health deterioration : पाणी पिताना काळजी घेणे आवश्यक. पाहा काय चुकत आहे ते.

Everyone makes these 4 mistakes while drinking water, there is a risk of health deterioration | पाणी पिताना हमखास सगळेच करतात ‘या’ ४ चुका, पाणी पिऊनही तब्येत बिघडण्याचा धोका

पाणी पिताना हमखास सगळेच करतात ‘या’ ४ चुका, पाणी पिऊनही तब्येत बिघडण्याचा धोका

आपण शाळेत शिकलो आहोत की 'जल हेच जीवन.' माणसाचे शरीर ६० ते ७० टक्के पाण्याचे बनले आहे.(Everyone makes these 4 mistakes while drinking water, there is a risk of health deterioration) योग्य प्रमाणात पाणी पिणे फारच गरजेचे असते. पचनसंस्थेपासून चेतासंस्थेपर्यंत सगळ्याच शारीरिक संस्थांना पाण्याची गरज असते. ऋतू  बदलला की शरीरासाठी पाण्याची गरजही बदलते. थंडीच्या दिवसांमध्ये पाणी कमी प्यायले जाते. तसेच उन्हाळा आला की आपण गटागट तांब्याच्या तांबे संपवून टाकतो. (Everyone makes these 4 mistakes while drinking water, there is a risk of health deterioration)तरी पाण्याची तहान काही भागत नाही.  प्रमाण कमी जास्त होते मात्र पाणी पिणे ही क्रिया सातत्याने घडत असते.   

तज्ज्ञ सांगतात वयानुसार, वजनानुसार पाण्याची आवश्यकता ठरते. मात्र शरीराला रोज सुमारे ३ लिटर पाण्याची आवश्यकता असते. पाणी पिणे ही फारच सामान्य क्रिया आहे त्यामुळे आपण त्याबद्दल फार विचार करत नाही. पण तुम्हाला माहिती आहे का? आपण पाणी पिताना चूक करतो. सात्विक मुव्हमेंटची फाऊंडर सुबा सराफ सांगते,   जर या चुका टाळल्या नाहीत तर, त्यांचे परिणाम वाईट होऊ शकतात.  

१. गटागट पाणी पिणे
कधीकधी घशाला फारच कोरड पडते. मग आपण पाणी गटागट एका श्वासात पिऊन टाकतो. पाणी एकदम पटकन प्यायल्यावर शरीराला एक झटका बसतो. तो धोकादायक ठरू शकतो. त्यामुळे पाणी चघळून प्यावे.

२. पाण्याचे तापमान
पाणी पिताना ते अति थंडही असू नये किंवा अति गरमही असू नये. शरीराला पाणी पचवण्यासाठी खरंतर कष्ट लागत नाहीत. पण जर पाण्याचे तापमान चुकले तर मग शरीराला त्रास होतो. त्यामुळे पाणी पिताना त्याचा चटका बसणार नाही आणि ठणकाही बसणार नाही याची काळजी घ्यावी.

३. जेवताना पाणी पिणे
जेवताना पाणी प्यायल्याने भुकेचे गणित चुकते. ठसका लागल्यावर पिणे, काही तिखट लागल्यावर पिणे वेगळी गोष्ट आहे. पण उगाच पाणी पिणे टाळावे. कारण पाण्यामुळे पचनक्रियेचा कालावधी वाढतो आणि पाणी जिरल्यावर पुन्हा भूक लागते.

४.प्लास्टिकचा वापर.
 पाणी पिताना ते आपण कशातून पितो हे पाहणेही गरजेचे असते. प्लास्टिकच्या बाटलीतून किंवा ग्लासमधून पाणी पिताना, प्लास्टिकचे काही अंश पोटात जातात. ते शरीरासाठी हानिकारक आहेत. पाणी पिताना धातुंच्या भांड्यांचा वापर करावा. 

Web Title: Everyone makes these 4 mistakes while drinking water, there is a risk of health deterioration

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.