गेल्या काही वर्षांमध्ये, भारतीय लोकांमध्ये हृदयविकाराशी संबंधित समस्यांचा धोका झपाट्याने वाढलेला दिसत आहे. आपण दररोज वेगवेगळ्या सोशल मिडिया माध्यमांतून कमी वयातच हृदयविकाराच्या झटक्याने होणाऱ्या मृत्यूच्या बातम्या पाहत आणि ऐकत असतो. सध्या कमी वयातच हार्ट ॲटॅक (Energy Drink Consumption Heart Risks) येण्याचे प्रमाण फार जास्त वाढल्याचे दिसत आहे. २० वर्षांपेक्षा कमी वयाच्या तरुणाईमध्ये देखील हृदयविकाराचा झटका आणि त्यामुळे होणाऱ्या मृत्यूच्या प्रमाणात वाढ झाली आहे. चुकीचा आहार, व्यायामाचा अभाव, धूम्रपान, झोपेची कमतरता (Side Effects of Energy Drinks on Heart Health) आणि कोलेस्टेरॉल - बीपीसारख्या समस्या यामुळे हृदयविकाराचा धोका अधिक जास्त प्रमाणात वाढतो. त्यामुळे हृदयाची काळजी घेणे आणि निरोगी सवयी स्वतःला लावून घेणे हे अतिशय आवश्यक आहे(Energy Drinks and Heart Problems in Young Adults).
हृदयविकार तज्ज्ञ डॉ. दिमित्री यारानोव यांनी अमर उजालाशी बोलताना, तरुण वयातच हार्ट ॲटॅक येण्याची अनेक कारणे अधोरेखित केली आहेत. चुकीची लाईफस्टाईल, खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी, उच्च रक्तदाब आणि लठ्ठपणा या समस्यांनी हृदयविकाराचा धोका खूप वाढवला आहे. व्यायामाचा अभाव, ऑफिसमध्ये दीर्घकाळ एकाच जागी बसून काम करण्याची सवय आणि सुरुवातीच्या टप्प्यात रक्तदाबाकडे दुर्लक्ष करणे यांसारख्या सवयी हार्ट ॲटॅकचा (Energy drink consumption has been linked to serious heart issues in young adults) धोका आणखीनच वाढवत आहेत. याचबरोबर, तरुण वयातच हार्ट ॲटॅक येण्यामागे, आजच्या तरुण पिढीतीलच काही वाईट सवयी देखील कारणीभूत ठरतात. या सवयी नेमक्या कोणत्या आहेत ते पाहूयात...
एनर्जी ड्रिंक्समुळे हृदयरोगांचा धोका वाढतोय...
डॉ. दिमित्री यांनी त्यांच्या एका सोशल मिडिया पोस्टमध्ये सांगितले आहे की, तरुणांमध्ये एनर्जी ड्रिंक्स पिण्याचे प्रमाण खूपच वाढले आहे. अनेक अभ्यासांमधून असे दिसून आले आहे की, एनर्जी ड्रिंक्स पिण्याची सवय गंभीर हृदयविकारांचा धोका कित्येक पटींनी वाढवू शकते. त्यामुळे, याबद्दल सर्वांनीच सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे.
डॉक्टर सांगतात, २० ते ३० वयोगटातील तरुण आणि निरोगी लोकांना अचानक हार्ट फेल्युअरचा झटका येतो. जेव्हा त्यांच्या कुटुंबाचा आणि आरोग्याच्या अभ्यास केला, तेव्हा त्यांच्यापैकी बहुतेकांना धूम्रपानाची सवय नसते किंवा हृदयविकाराचा कोणताही कौटुंबिक इतिहासही नसतो. परंतु या रुग्णांमध्ये जी सर्वात मोठी समस्या आढळून आली ती म्हणजे, त्यापैकी बहुतेक जण दिवसातून ३ ते ४ एनर्जी ड्रिंक्स पीत होते. हेच त्यांच्या हृदयविकाराचे मुख्य कारण असल्याचे आढळून आले."
एनर्जी ड्रिंक्स इतके धोकादायक का आहेत ?
डॉ. यारानोव सांगतात की, एनर्जी ड्रिंक्स अति जास्त प्रमाणात प्यायल्याने रक्तातील साखर आणि ब्लड प्रेशर वाढतो. याव्यतिरिक्त, यामुळे हृदयाचे आरोग्य बिघडते, ज्यामुळे कालांतराने हृदयाचे स्नायू कमकुवत होतात. एनर्जी ड्रिंक्समध्ये असलेले कॅफिन आणि इतर उत्तेजक घटक हृदयाला खूप ॲक्टिव्ह करतात, ज्यामुळे जीवघेणी परिस्थिती निर्माण होऊ शकते. तरुणांमध्ये झपाट्याने वाढणाऱ्या हृदयविकाराच्या झटक्यासाठी आणि हार्ट फेल्युअरसाठी हे एक मुख्य कारण मानले जाते.
हृदय निरोगी ठेवण्यासाठी काळजी घेण्याची गरज...
आरोग्य तज्ज्ञ सांगतात की, कमी वयातच हार्ट ॲटॅक येऊन मोठ्या संख्येने अनेकजण मृत्युमुखी पडत असल्यामुळे, आपण सर्वांनी हृदयाला हानी पोहोचवणाऱ्या पदार्थांपासून दूर राहिले पाहिजे. प्रक्रिया केलेले अन्नपदार्थ, तंबाखू आणि दारूचे वाढते व्यसन तसेच मानसिक तणाव यांनी हृदयाचे खूप नुकसान होऊ शकते म्हणून या गोष्टींपासून दूर राहणे खूप महत्त्वाचे आहे.