Join us

रात्रीच्या जेवणात खाऊ नयेत '७' पदार्थ! बिघडते झोपेचे चक्र - शांत झोपेसाठी वेळीच बदला आहार...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2025 22:05 IST

Eating These Foods In Dinner Can Ruin Your Sleep : Foods to avoid at dinner for better sleep : Dinner foods that disturb sleep : Sleep-disrupting foods at night : Dinner habits that ruin sleep : रात्री हवी सुखाची झोप, 'हे' ७ पदार्थ विषच ! खाणं टाळा - अंथरुणांत पडताच लागेल गाढ झोप....

आपण अनेकदा दिवसाचा थकवा घालवण्यासाठी आणि शरीराला आराम मिळावा म्हणून रात्री वेळेवर झोपण्याचा प्रयत्न करतो. परंतु अनेकदा आपल्याला झोपेच्या अनेक समस्या सतावतात. आपल्यापैकी अनेकांना झोपेच्या समस्या खूप त्रास देतात. कुणाला अंथरुणांत पडूनही तासंतास झोपच लागत नाही, तर कुणाला वारंवार जाग येऊन (Eating These Foods In Dinner Can Ruin Your Sleep) झोपेत खंड पडतो, कित्येकांना तर रात्रभर (Foods to avoid at dinner for better sleep) झोपच लागत नाही. खरंतर, आपल्या रात्रीच्या जेवणाचा आपल्या झोपेवर खूप मोठा परिणाम होत असतो. रात्रीच्या जेवणातील काही चुकांमुळेही (Dinner foods that disturb sleep ) आपल्याला झोपेसंबंधित समस्या सतावतात. काही पदार्थ असे असतात की जे दिवसभर खाल्ले तरी चालतात, पण रात्री खाल्ल्यास झोपेवर विपरीत परिणाम करतात(Sleep-disrupting foods at night).

रात्रीचं जेवण म्हणजे केवळ पोट भरण्यापुरतं नसून, शरीर आणि मनाच्या विश्रांतीसाठी ते महत्त्वाचं असतं. मात्र, काही अन्नपदार्थ रात्री खाल्ल्यास पचनक्रिया मंदावते आणि त्यामुळे झोपेत अडथळा येतो. ही समस्या वारंवार होत असेल, तर आहारात काही बदल करणं गरजेचं आहे. आपल्या दैनंदिन आहारात काही पदार्थ असे असतात जे पौष्टिक वाटले तरी रात्री खाल्ल्यास ते झोपेवर वाईट परिणाम करू शकतात. काही पदार्थ रात्रीच्या जेवणात घेतल्यास पचनावर अधिक ताण येतो, झोप लागत नाही किंवा वारंवार जाग येते. त्यामुळे रात्री जेवताना काय खायचं आणि काय टाळायचं हे जाणून घेणं फार महत्त्वाचं आहे. रात्रीच्या जेवणातील कोणते पदार्थ तुमची झोप खराब करू शकतात ते पाहा. 

 रात्रीच्या जेवणातील 'हे' पदार्थ करतात तुमची झोप खराब... 

१. पचनास जड असणारे पदार्थ :- जर रात्रीच्या जेवणात राजमा, छोले किंवा चणे यांसारखे पदार्थ खाल्ले, तर हे पदार्थ पचनक्रियेसाठी अडथळा ठरू शकतात. हे पदार्थ उशिरा पचतात आणि त्यामुळे पोट फुगणे, गॅस व अ‍ॅसिडिटी सारख्या तक्रारी उद्भवू शकतात. परिणामी, झोपेत अडथळा येतो. याशिवाय, कोबी आणि वांगी यांसारख्या भाज्याही पचनासाठी जड ठरतात आणि रात्रीच्या जेवणात त्या खाणे टाळावे. अशा पचनास जड असणाऱ्या पदार्थांमुळे शरीरात अस्वस्थता निर्माण होऊ शकते. 

गुडघेदुखीचा त्रास-सांध्यांतून कट-कट आवाज येतो? डॉक्टर सांगतात ५ उपाय - दुखणे होईल कमी...

२. तिखट - झणझणीत पदार्थ :- जर तुम्ही रात्रीच्या जेवणात खूपच चटपटीत, तिखट किंवा मसालेदार अन्नपदार्थ घेत असाल, तर त्यामुळे तुमची झोप बिघडू शकते. तिखट अन्नपदार्थामुळे पोटात अ‍ॅसिड वाढते, ज्यामुळे पोटात आणि छातीत जळजळ होऊ शकते. या अस्वस्थतेमुळे झोप लागण्यात अडथळा येतो आणि शरीराला आराम मिळत नाही. त्यामुळे रात्री शक्यतो हलकं, कमी मसालेदार जेवण घेणं चांगलं ठरतं.

३. तळलेले पदार्थ :- रात्रीच्या जेवणात तळलेले आणि तेलकट - तूपकट पदार्थ खाणं आरोग्यासाठी घातक ठरू शकतं. जर तुम्ही रात्रीच्या जेवणात पुरी, भजी, भटुरे यासारखे तळलेले पदार्थ खात असाल, तर त्यामुळे पोट फुगणे, गॅस आणि अ‍ॅसिडिटीचा त्रास होऊ शकतो. या त्रासांमुळे झोपेत वारंवार व्यत्यय येतो आणि त्यामुळे पुरेशी विश्रांती मिळत नाही. त्यामुळे रात्री शक्यतो हलकं आणि कमी तेलकट असणारे अन्नपदार्थ घेणं अधिक फायदेशीर ठरतं.

Sexually Transmitted Infections: लैंगिक संबंधातून होणारे ५ इन्फेक्शन टाळण्यासाठी महिलांनी करायला हव्या ५ गाेष्टी...

४. लोणचं :- भारतीय खाद्यसंस्कृतीत लोणचं हा जेवणाचा एक अविभाज्य भाग मानला जातो. पुरी, पराठा, डाळ-भात किंवा खिचडीसोबत लोणचं खाल्ल जात.  परंतु , लोणच्यामध्ये मीठ आणि तेलाचं प्रमाण खूप जास्त असतं. त्यामुळे शरीर डिहायड्रेट होऊ शकतं आणि रात्री वारंवार तहान लागण्याची शक्यता वाढते. यामुळे झोपेत व्यत्यय येऊ शकतो. त्यामुळे रात्रीच्या जेवणात लोणचं खाणे टाळणे फायदेशीर ठरेल. 

५. दही :- आयुर्वेदानुसार रात्रीच्या जेवणात दही खाणं आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतं. दही खाल्ल्याने शरीरात कफदोष वाढतो, ज्यामुळे घसा दुखणे, सर्दी - खोकला आणि पचनासंबंधी त्रास होण्याची शक्यता वाढते. विशेषतः थंड दही खाल्ल्यास सर्दी होऊ शकते. त्यामुळे रात्री दही खाणं टाळावं किंवा गरज असल्यास थंड दही न खाता नॉर्मल टेम्परेचरला असणारे दही खाऊ शकता. 

६. कॅफेन :- अति प्रमाणात चहा-कॉफी पिण्यामुळे देखील झोपेवर परिणाम होऊ शकतो. काहीजणांना रात्रीच्या जेवणानंतर जागं राहण्यासाठी चहा किंवा कॉफी पिण्याची सवय असते. परंतु, या पेयांमध्ये असणारं कॅफिन आपल्या झोपेच्या नैसर्गिक चक्रात बाधा आणू शकतं. कॅफिनमुळे शरीर अधिक अ‍ॅक्टिव्ह राहतं आणि मन शांत न झाल्यामुळे झोप लागण्यात अडथळा निर्माण होतो. त्यामुळे रात्री चहा-कॉफी पिणं टाळणं केव्हाही चांगलं.

७. शिळे अन्नपदार्थ :- शिळे अन्नपदार्थ रात्रीच्या जेवणात खाणं आरोग्यासाठी अत्यंत हानिकारक ठरू शकतं. अशा अन्नामुळे शरीरात विषारी घटकवाढू शकतात आणि पचनक्रिया बिघडू शकते. शिळ्या अन्नपदार्थांमुळे उलटी, पोटदुखी आणि फूड पॉइझनिंग होण्याचा धोका देखील असतो. त्यामुळे शक्यतो ताजं आणि पौष्टिक अन्नपदार्थच रात्रीच्या जेवणात समाविष्ट करावं.

टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्सलाइफस्टाइल