Join us

रेडी टू इट फूड खाताय ? सावधान, गंभीर आजारांचा धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2022 18:22 IST

Ready to Eat Food not good for Health या धकाधकीच्या जीवनात स्वतःची काळजी घेणं महत्त्वाचं आहे. रेडी टू फुडला टाळा, आरोग्यासाठी उत्तम राहेल.

लोकांमध्ये सध्या रेडी टू इट फूडची क्रेझ वाढत चालली आहे. भूक लागली की इन्स्टंट बनणारे पदार्थांचे सेवन अधिक केले जाते. या धकाधकीच्या जीवनात अनेकांना रेडी टु इट फूड सोपे आणि सोयीस्कर वाटते. मात्र, हेच पदार्थ आपल्या शरीरासाठी हानिकारक ठरते. ब्राझीलमधील साओ पाउलो विद्यापीठाचे प्रमुख आणि संशोधनाचे लेखक एडुआर्डो निल्सन यांच्या म्हणण्यानुसार, "अल्ट्रा-प्रक्रिया केलेले खाद्यपदार्थ शरीरासाठी हानिकारक आहे. एका संशोधनानुसार 2019 मध्ये, ५ लाखांहून अधिक प्रौढांचा मृत्यू झाला आहे. त्याचं मुख्य कारण रेडी टू इट फूड बनलं आहे.

अमेरिकन जर्नल ऑफ क्लिनिकल न्यूट्रिशनमध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासानुसार, साखर आणि प्रीजर्व्हेटीव्ह्स पदार्थ असलेले अल्ट्रा-प्रोसेस्ड पदार्थ जसे की, पिझ्झा, बर्गर, साखर युक्त स्नॅक्स आणि केक्स इत्यादी खाल्ल्याने हृदयविकाराचा धोका वाढतो. त्यांच्या नियमित सेवनाने अकाली मृत्यू होण्याचीही दाट शक्यता आहे.

हृदयरोग आणि स्ट्रोकची शक्यता जास्त प्रमाणात प्रक्रिया केलेले खाद्यपदार्थ खाल्ले की लोकांमध्ये हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोग, हृदयविकाराचा झटका आणि स्ट्रोकचा जास्त धोका दिसून येतो. तर, ज्यांनी प्रक्रिया केलेले पदार्थ खाल्ले नाहीत, त्यांच्यात कमी धोका दिसून आला आहे.

टॅग्स : हेल्थ टिप्सलाइफस्टाइलआरोग्यअन्न