वजन कमी करण्यासाठी आपण आहारात अनेक बदल करतो.(Peanut butter side effects weight gain) मैद्याचे, साखरेचे आणि दुधाचे पदार्थ खाण्याचे बंद करतो. परंतु, प्रोटीन समजून जे पदार्थ आपण आहारात खातोय ते खरेच आरोग्यासाठी चांगले आहे का? याविषयी आपल्यापैकी अनेकांना माहित नाही. (Is peanut butter good for weight loss)
वजन कमी करण्यासाठी आहारासोबत व्यायाम आणि शरीराला प्रोटीन्स देखील महत्त्वाचे आहे. यावेळी आपण आपले आवडते पदार्थ, जंक फूड देखील खाणे टाळतो.(Peanut butter and heart health warning) व्यायाम, वर्कआउट करुन वजन कमी करण्याचा प्रयत्न करतो.(High protein myth peanut butter) परंतु सगळ्या गोष्टींची काळजी घेऊन देखील वजन काही कमी होत नाही. आपल्यापैकी अनेकजण डाएटमध्ये हाय प्रोटीनमध्ये पीनट बटर सगळ्यात जास्त खाल्ले जाते.(Healthy or harmful peanut butter truth) यामध्ये प्रोटीन, फायबर, हेल्दी फॅट्स, व्हिटॅमिन आणि मिनरल्स जास्त प्रमाणात असतात. ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते असं म्हटलं जाते. पण आपण खात असलेल्या पीनट बटरमुळे खरेच वजन कमी होईल का?(Peanut butter nutrition facts Marathi) न्यूट्रिशनिस्टने व्हिडीओ शेअर करुन पीनट बटर वजन कमी करण्यासाठी खरेच फायदेशीर आहे का? याविषयी सांगितले आहे.
पिंपल्स-फोडांचे डाग जात नाहीत? रोज रात्री करा खास उपाय, चेहऱ्यावरील सुरकुत्या- मुरुमे होतील कमी
पीनट बटर हा ब्रेड लावून खाल्ला जाणारा हाय प्रोटीन पदार्थ आहे. याचा सगळ्यात जास्त वापर सॅण्डविच, मिल्कशेक आणि स्मूदी सारख्या घटकांसोबत केला जातो. पण Nutricop म्हणून असणाऱ्या न्यूट्रिशनिस्टने म्हटलं की, पीनट बटरमध्ये प्रोटीनसोबत हेल्दी फॅट्स आणि हाय कॅलरीज देखील आहे. यात ट्रांस फॅट असल्यामुळे आपल्या हृदयाला नुकसान होते.
पीनट बटरला प्रोटीन समजून अनेकदा स्नॅक्ससारखे खाल्ले जाते. परंतु यामध्ये भरपूर प्रमाणात कॅलरीज आणि फॅट्स असते. एक चमचा पीनट बटरमध्ये १०० कॅलरीज, ४ ग्रॅम प्रोटीन्स आणि १२ ग्रॅम फॅट्स असते. इतकेच नाही तर काही कंपन्या पीनट बटर बनवताना त्यात हाइड्रोजेनेटेड व्हेजिटेबल ऑइल, साखर आणि मीठ घालते. यामध्ये ट्रांस फॅट असते जे आपल्या आरोग्यासाठी चांगले नसते.
पीनट बटर खरेदी करताना आपण त्यात असणाऱ्या कॅलरीज आणि त्यात वापरले जाणारे घटक तपासायला हवे. खरेदी करताना चांगला ब्रँड पाहावा. ज्यामुळे आपल्या शरीराला योग्य प्रोटीन्स मिळतील.