बदलेल्या जीवनशैलीमुळे कमी वयातच आपल्याला अनेक आजारांना सामोरे जावे लागत आहे. मधुमेह, रक्तदाब, कर्करोगासह गंभीर आजारांचा विळाखा आपल्याला पडतोय.(banana and heart health) अशातच खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी, सतत कॅफिनचे सेवन, धूम्रपान आणि अपुरी झोप यामुळे आपण आजारी पडण्याची शक्यता अधिक असते.(natural remedies for high BP)
सध्या जगभरात ९० टक्के तरुण पिढीमध्ये रक्तदाबाचा धोका वाढताना दिसून येत आहे.(potassium rich foods for blood pressure) वाढत्या रक्तदाबाला नियंत्रित करण्यास देखील अनेक अडचणींचा सामना करावा लागतोय. (one banana a day for hypertension) वाढता रक्तदाब नियंत्रणात आणण्यासाठी आपण रोज एक केळी खाल्ल्यास फायदा होऊ शकतो. असा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. (banana benefits for high blood pressure)
मुलतानी मातीत कालवून 'हा' पदार्थ चेहऱ्याला लावा! भरपूर पिंपल्स- पिगमेंटेशन-डाग होतील गायब
रिसर्चनुसार असे दिसून आले की, केळीसारख्या पोटॅशियमयुक्त अन्नपदार्थ जास्त प्रमाणात खायला हवे. शरीरातील मीठाचे सेवन कमी करण्यापेक्षा रक्तदाब कमी करण्यासाठी प्रभावी ठरु शकतो. अमेरिकन जर्नल ऑफ फिजियोलॉजी-रेनल फिजियोलॉजीमध्ये झालेल्या रिसर्चमध्ये असे दिसून आले की, शरीरात पोटॅशियमचे प्रमाण वाढल्यास रक्तदाब नियंत्रणात राहातो. केळी खाण्याची योग्य वेळ कोणती जाणून घेऊया.
केळी रक्तदाब कसा कमी करते?
केळीमध्ये पोटॅशियम असते, जे उच्च रक्तदाब नियंत्रित करण्यास मदत करतात. एका मध्यम आकाराच्या केळीमध्ये साधरणत: ४२२ मिलीग्रॅम पोटॅशियम असते. जे आपल्याला दैनंदिन गरेजपेक्षा १० टक्के आहे. पोटॅशियम सोडियमचे प्रमाण कमी करते. रक्तवाहिन्यांमधील ताण कमी करते.
केळी खाण्याचे फायदे
1. केळीमध्ये फायबर असते. जे आतड्यांसाठी चांगले मानले जाते. फायबरयुक्त पदार्थ खाल्ल्याने आपल्याला गंभीर आजार रोखण्यापासून मदत मिळते.
2. केळी खाल्ल्याने रोगप्रतिकारशक्ती मजबूत होते. तसचे चयापचय गतिमान करुन वजन कमी होण्यास मदत होते. केळीमध्ये पोटॅशियम असते. जे हृदय, मूत्रपिंड, स्नायू आणि नसा यांच्या कार्यासाठी आवश्यक आहे. हे फळ आपल्याला नैसर्गिक ऊर्जा प्रदान करते.
केळी खाण्याची योग्य वेळ कोणती?
केळी खाण्याची योग्य वेळ तशी नाही. तज्ज्ञ सांगतात की, केळी खाण्याची योग्य वेळ सकाळ आणि संध्याकाळ आहे. नाश्त्यात फक्त केळी खाणे योग्य नाही. रात्रीच्या वेळी केळी खाल्ल्याने झोपचे चक्र नियमित होते.