Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > स्वयंपाकघरातील 'या' मसाल्याची पावडर अनेक आजारांवर बहुगुणी, हाडं होतील दणकट- झोपही शांत लागेल

स्वयंपाकघरातील 'या' मसाल्याची पावडर अनेक आजारांवर बहुगुणी, हाडं होतील दणकट- झोपही शांत लागेल

Nutmeg powder health benefits: Eating nutmeg powder daily benefits: मर्यादित प्रमाणात जायफळचे सेवन केल्यास आपले एकूण आरोग्य सुधारते. तसेच महिलांच्या अनेक आजारांच्या समस्या सोडवता येतात.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2025 12:11 IST2025-06-06T12:09:11+5:302025-06-06T12:11:38+5:30

Nutmeg powder health benefits: Eating nutmeg powder daily benefits: मर्यादित प्रमाणात जायफळचे सेवन केल्यास आपले एकूण आरोग्य सुधारते. तसेच महिलांच्या अनेक आजारांच्या समस्या सोडवता येतात.

eating Nutmag powder daily in food jayfal benefits skin care improve immunity strong bones imbalance hormones periods and insomnia issue | स्वयंपाकघरातील 'या' मसाल्याची पावडर अनेक आजारांवर बहुगुणी, हाडं होतील दणकट- झोपही शांत लागेल

स्वयंपाकघरातील 'या' मसाल्याची पावडर अनेक आजारांवर बहुगुणी, हाडं होतील दणकट- झोपही शांत लागेल

आपल्या स्वयंपाकघरातील मसाल्यांमध्ये असे अनेक मसाले आहेत जे आपल्या आरोग्यासाठी चांगले असतात.(Nutmeg powder health benefits) प्राचीन काळापासून भारतीय आयुर्वेदात अनेक औषधी वनस्पतींना महत्त्वाचे मानले गेले आहे.(Eating nutmeg powder daily benefits) आपल्या स्वयंपाकघरात असे अनेक मसाले आहेत जे पदार्थांची चव वाढवतात. त्यातील एक औषधी मसाला म्हणजे जायफळ. जायफळ हा फक्त स्वयंपाकघरातील मसाला नसून आरोग्यासाठी वरदान आहे. (Nutmeg uses for women health)
जायफळ हे कोणत्याही पदार्थात मिसळल्याने त्याचा सुगंध येतो.(Nutmeg for glowing skin) अन्नाची चव वाढवण्याचे काम करते.(Jayfal powder for clear skin) यामध्ये अँटीऑक्सिडंट्स आणि पोषक घटक आढळतात. महिलांच्या आरोग्यासाठी जायफळ अतिशय फायदेशीर आहे.(Natural skin care with nutmeg) शरीरातील हार्मोन्सची पातळी संतुलित करण्यासोबतच पचन सुधारण्यास, त्वचेचे आरोग्य वाढविण्यास आणि आपला मूड सुधारण्याचे मदत करते.(Nutmeg for hormonal imbalance) मर्यादित प्रमाणात जायफळचे सेवन केल्यास आपले एकूण आरोग्य सुधारते. तसेच महिलांच्या अनेक आजारांच्या समस्या सोडवता येतात. पाहूया याचे फायदे कसे होतात. 

अनुष्का शर्माने का सोडले गोड पदार्थ, दूध आणि गहू? ती सांगते, त्यानं नेमकं काय बदललं..

1. जायफळमध्ये नैसर्गिक संयुगे असतात जे आपल्या हार्मोनल संतुलित ठेवण्याचे काम करतात. ज्यामुळे मासिक पाळी वेळेवर येत नसेल किंवा पीसीओएस, पीसीओडीचा त्रास होत असेल तर जायफळ फायदेशीर ठरेल. चिमूटभर जायफळ मधात मिसळून खाल्ल्याने फायदा होईल. 

2. जायफळमध्ये दाहक विरोधी आणि स्नायूंना आराम देणारे गुणधर्म आहे. मासिक पाळीदरम्यान होणाऱ्या वेदना कमी करण्यासाठी मदत करते. जायफळचे सेवन केल्याने पोटफुगी, मूड स्विंग आणि थकवा यापासून आराम मिळतो. 

अनियमित पाळी- पोटात दुखतं? अनेक समस्यांवर रामबाण उपाय, रोज प्या हे ड्रिंक्स- चार दिवसातला त्रास कमी

3. जायफळमध्ये अँटीऑक्सिडंट आणि अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असतात. जे आपल्याला मुरुमांशी लढण्यास मदत करतात. त्वचेतील जळजळ कमी करतात. जायफळाचे दररोज सेवन केल्याने त्वचा स्वच्छ होते. तसेच त्वचेचा ग्लो होतो. 

4. जायफळमध्ये अँटीऑक्सिडंट आणि अँटी-इंफ्लेमेटरी संयुगे असतात जे आपल्या रक्तदाबाला कमी करण्यास आणि हृदयाचे आरोग्य सुधारण्यास मदत करतात. जे आपली कोलेस्टेरॉलची पातळी देखील कमी करते. धमन्यांमध्ये प्लेक तयार होण्यास प्रतिबंध करते, ज्यामुळे हृदयरोगाचा धोका कमी होतो. जायफळमध्ये संयुगे असतात जे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यास मदत करतात. 

5. जायफळमध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि फॉस्फरस सारखे खनिजे आहेत, जे आपल्या हाडांना मजबूत करतात. महिलांमधील आजार ऑस्टियोपोरोसिसला प्रतिबंधित करतात. हे आपल्या हाडांची घनता राखण्यास मदत करते. महिलांचे वय वाढू लागले की, त्यांची हाडं कमकुवत होतात- गुडघेदुखी, कंबरदुखीचा त्रास वाढतो. अशावेळी रोज चिमुटभर जायफळ खायला हवे. 

Web Title: eating Nutmag powder daily in food jayfal benefits skin care improve immunity strong bones imbalance hormones periods and insomnia issue

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.