Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > तिखट असल्या तरी जेवताना हिरव्या मिरच्या खाणं फायदेशीर! न्यूट्रिशनिस्ट सांगतात, चवीसाठी नाही, तर आरोग्यासाठीही फायद्याचं...

तिखट असल्या तरी जेवताना हिरव्या मिरच्या खाणं फायदेशीर! न्यूट्रिशनिस्ट सांगतात, चवीसाठी नाही, तर आरोग्यासाठीही फायद्याचं...

Eating Green Chillies With Meals Benefits : benefits of eating green chillies daily : जेवणासोबत दोन हिरव्या मिरच्या खाण्याची सवय लावून घेतली, तर ही खूप हेल्दी हॅबिट असू शकते...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2026 11:05 IST2026-03-19T11:00:30+5:302026-03-19T11:05:01+5:30

Eating Green Chillies With Meals Benefits : benefits of eating green chillies daily : जेवणासोबत दोन हिरव्या मिरच्या खाण्याची सवय लावून घेतली, तर ही खूप हेल्दी हॅबिट असू शकते...

Eating Green Chillies With Meals Benefits benefits of eating green chillies daily | तिखट असल्या तरी जेवताना हिरव्या मिरच्या खाणं फायदेशीर! न्यूट्रिशनिस्ट सांगतात, चवीसाठी नाही, तर आरोग्यासाठीही फायद्याचं...

तिखट असल्या तरी जेवताना हिरव्या मिरच्या खाणं फायदेशीर! न्यूट्रिशनिस्ट सांगतात, चवीसाठी नाही, तर आरोग्यासाठीही फायद्याचं...

भारतीय आहारात हिरव्या मिरचीचा वापर हा बहुतेक पदार्थांमध्ये केला जातो. डाळ-भाजीची फोडणी असो किंवा चटणी, हिरव्या मिरचीची चव जवळपास बऱ्याच पदार्थांमध्ये पाहायला मिळते. यासोबतच, आपल्यापैकी काहीजण अगदी रोजच्या जेवणासोबत कच्ची हिरवी मिरची खाणंही पसंत करतात. थोड्याशा तिखटपणामुळे जेवणाला वेगळीच अप्रतिम चव  येते, पण फक्त चव वाढवण्यापुरतंच त्यांचं महत्त्व मर्यादित नाही. कच्च्या हिरव्या मिरच्या या आरोग्यासाठीही अनेक प्रकारे फायदेशीर ठरतात, त्यामध्ये असलेले व्हिटॅमिन्स, अँटिऑक्सिडंट्स आणि पोषक घटक शरीराला बळकटी देण्यास मदत करतात. जेवणाच्या ताटात डाळ, भात, भाजी आणि पोळीसोबत जर एक 'कच्ची हिरवी मिरची' असेल, तर जेवणाची रंगतच काही वेगळी असते(Eating Green Chillies With Meals Benefits).

अनेकांना जेवताना मिरची कचाकचा चावून खायची सवय असते. साधारणपणे आपण मिरचीला फक्त 'तिखट' आणि 'जिभेची आग' होणारा पदार्थ मानतो. ही छोटीशी हिरवी मिरची प्रत्यक्षात आरोग्याचा मोठा खजिना आहे. वजन कमी करण्यापासून ते रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यापर्यंत, हिरवी मिरची अनेक समस्यांवर औषधी मानली जाते. न्यूट्रिशनिस्ट लीमा महाजन सांगतात की, जर तुम्ही तुमच्या रोजच्या संतुलित आहारासोबत दोन हिरव्या मिरच्या खाण्याची सवय लावून घेतली, तर ही खूप हेल्दी हॅबिट असू शकते. त्यांनी याचे फायदे, खाण्याची योग्य पद्धत आणि कोणत्या लोकांनी यापासून लांब राहावे, अशा सर्व आवश्यक (benefits of eating green chillies daily) गोष्टी इंस्टग्राम व्हिडिओवर सविस्तर शेअर केल्या आहेत. हिरव्या मिरच्या खाण्याचे नेमके फायदे कोणते आणि मिरच्या कशा खाव्यात, हे जाणून घेणं तितकंच महत्त्वाचं आहे.

हिरव्या मिरचीमध्ये असतो हा खास घटक... 

न्यूट्रिशनिस्ट सांगतात की, हिरव्या मिरचीमध्ये 'कॅप्सॅसिन' (Capsaicin) नावाचा एक खास घटक असतो. यामुळे शरीरातील 'थर्मोजेनेसिस' (Thermogenesis) प्रक्रिया थोड्या प्रमाणात वाढू शकते. याचा अर्थ असा की, जेवणानंतर शरीरात उष्णता निर्माण करण्यासाठी शरीर थोडी जास्त ऊर्जा (Energy) खर्च करते. या प्रक्रियेदरम्यान शरीर सामान्यपेक्षा जास्त कॅलरीज बर्न करू शकते.

मुलं बटाट्यासारखी गोलमटोल झाली म्हणून टेंशन आलं, ‘एवढं’ करा-डाएटची शिस्त न पाळूनही होतील फिट...

मेटाबॉलिझम आणि वेट लॉसमध्ये मदत करू शकते हिरवी मिरची...

न्यूट्रिशनिस्ट लीमा महाजन सांगतात की, हिरव्या मिरचीमध्ये असलेले 'कॅप्सॅसिन' TRPV रिसेप्टरला सक्रिय करण्यास मदत करू शकते, जे 'ब्राऊन फॅट'च्या हालचालींशी संबंधित असते. यामुळे शरीराला जास्त ऊर्जा म्हणजेच कॅलरी बर्न करण्यास मदत मिळते, ज्यामुळे वजन कमी होण्यास फायदा होतो. तसेच हे मेटाबॉलिझम वाढवण्यासाठी देखील मदत करते.

लिंबापेक्षा जास्त असते व्हिटॅमिन 'सी'...

तज्ज्ञ सांगतात की, जर तुम्ही १०० ग्रॅम लिंबू आणि १०० ग्रॅम हिरवी मिरची यांची तुलना केली, तर मिरचीमध्ये जास्त प्रमाणात व्हिटॅमिन 'सी' असते. हेच कारण आहे की, हिरवी मिरची रोगप्रतिकारक शक्तीला वाढवण्यास आणि शरीर आतून बळकट करण्यास मदत करते. कोलेजन उत्पादन वाढवण्यासही हिरव्या मिरच्या खाणं फायदेशीर ठरु शकत. 

ब्लड शुगर बॅलन्स ठेवण्यास मदत करू शकते हिरवी मिरची...

लीमा सांगतात की, काही अभ्यासांनुसार हिरव्या मिरचीमध्ये असलेले 'कॅप्सॅसिन' इन्सुलिन रिस्पॉन्स अधिक चांगला करण्यास मदत करते. यामुळे जेवणानंतर रक्तातील ग्लुकोजची पातळी अचानक वाढत नाही.

डाएट करतानाही बिंधास्त खा पुऱ्या, तमन्न भाटियाचे फिटनेस कोच सांगतात-पुरी खाण्याचं तंत्र...

शरीर नैसर्गिकरीत्या थंड ठेवण्यास मदत करते... 

 हिरव्या मिरचीची उष्णता शरीराला आतून थंडगार ठेवण्याचं काम करते. खरंतर, ही उष्णता रिसेप्टर्सना सक्रिय करते, ज्यामुळे मेंदूला शरीराचे तापमान कमी करण्याचे संकेत मिळतात. यामुळे घाम येणे सुरू होते आणि शरीर नैसर्गिकरीत्या स्वतःला थंड ठेवते.

पचनशक्तीला आधार देऊ शकते... 

हिरवी मिरची पचन सुधारण्यास मदत करू शकते. जेव्हा आपण जेवणासोबत थोडी हिरवी मिरची खातो, तेव्हा पाचक एन्झाइम्स (Digestive enzymes) आणि गॅस्ट्रिक ज्यूस उत्तेजित होतात, ज्यामुळे पचन प्रक्रिया सुरळीत होते.

लाल मिरचीपेक्षा हिरवी मिरची कशी चांगली आहे?

न्यूट्रिशनिस्ट सांगतात की, लाल मिरचीमध्ये सुद्धा 'कॅप्सॅसिन' असते, परंतु त्यात व्हिटॅमिन सी चे प्रमाण खूप कमी असते. याउलट हिरव्या मिरचीमध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते. याशिवाय लाल मिरची आतड्यांच्या अस्तरांना त्रासदायक ठरू शकते आणि ॲसिडिटीचे कारण ठरू शकते.

कोणी हिरवी मिरची खाणे टाळावे?

न्यूट्रिशनिस्टच्या मते, जेवणासोबत १ ते २ हिरव्या मिरच्या खाणं साधारणपणे सुरक्षित असते. परंतु, जर तुम्हाला यामुळे पचनाशी संबंधित समस्या त्रास देत असतील, तर ते टाळावे. याशिवाय ज्या लोकांना ॲसिड रिफ्लक्स किंवा GERD, गॅस्ट्रायटिस (पोटाची सूज), पोटात अल्सर, IBS किंवा अत्यंत संवेदनशील पचन संस्था असेल तसेच मूळव्याध या समस्या असतील तर हिरव्या मिरच्या चुकूनही खाऊ नयेत.


Web Title : भोजन के साथ हरी मिर्च: पोषण विशेषज्ञ द्वारा बताए गए स्वास्थ्य लाभ।

Web Summary : हरी मिर्च वजन घटाने, रोग प्रतिरोधक क्षमता बढ़ाने और ब्लड शुगर को संतुलित करने में सहायक है। कैप्साइसिन मेटाबॉलिज्म को बढ़ाता है। विटामिन सी की मात्रा अधिक होती है। पाचन संबंधी समस्याओं में सेवन सीमित करें।

Web Title : Eating green chilies with meals: Health benefits revealed by nutritionist.

Web Summary : Green chilies aid weight loss, boost immunity, and balance blood sugar. Capsaicin boosts metabolism. Vitamin C content is high. Limit intake if digestive issues exist.