Join us

कंबर दुखते-चाललं की गुडघे ठणकतात? थंडीत १ लाडू रोज खा, सांध्यांचं दुखणं होईल कमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2025 16:44 IST

Eat One Laddu Daily in Winter Knee Back And Joints All Pain : रोज १ लाडू खाल्ल्यानं हाडांना बळकटी येईल आणि गंभीर आजारांपासूनही तुमचा बचाव होईल.

हिवाळ्याच्या दिवसांत त्वचेची, आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागते. कारण हिवाळ्यात  कंबरदुखी, गुडघेदुखीच्या समस्या उद्भवू लागतात. कंबरेत वेदना होतात, चालायला त्रास होतो. जर तुम्हाला तब्येतीच्या या कुरबुरी टाळायच्या असतील तर तुम्ही आहारात बदल करायला हवा. रोज १ लाडू खाल्ल्यानं हाडांना बळकटी येईल आणि गंभीर आजारांपासूनही तुमचा बचाव होईल.

खासकरून हिवाळ्यात बनवल्या जाणाऱ्या या लाडूंमध्ये ड्रायफ्रु्ट्स डिंक, मेथी आणि सुंठ असते. रोज फक्त १ लाडू खाल्ल्यानं तुमच्या शरीरातील वेदना कमी होतील. लाडू खाल्ल्यानं शरीरातही उष्णता टिकून राहील. मेथी आणि सुंठाचे लाडू करण्याची सोपी रेसिपी पाहूया. (Eat One Laddu Daily in Winter Knee Back And Joints All Pain Will Go Away Methi Sauth Ladoo Recipe)

पौष्टीक मेथी, सुंठाच्या लाडूंची रेसिपी

लाडू करण्यासाठी मेथी जवळपास २ कप दुधात व्यवस्थित भिजवून ठेवा.  मेथी वाटूनही तुम्ही दुधात घालू शकता. भिजवलेली मेथी मिक्सरमध्ये घालून जाडसर वाटू शकता.

एका कढईत तूप घालून त्यात बदाम घालून भाजून घ्या. गॅस मिडीयम फ्लेमवर ठेवून बदाम भाजून घ्या. नंतर कढईत काजूसुद्धा भाजून घ्या. नंतर अक्रोड भाजून घ्या. नंतर डिंक मंद आचेवर भाजून घ्या. डिंक व्यवस्थित भाजलं जायला हवं. ज्यामुळे लाडू चिकट होत नाहीत.

प्युअर पैठणीची पारख कशी कराल? ८ टिप्स, शुद्ध राजेशाही पैठणीची ओळख होईल-सुंदर दिसाल

उरलेल्या तुपात वाटलेली मेथी घालून चमच्याच्या साहाय्यानं परतवत मेथी व्यवस्थित भाजून घ्या. त्यात पुन्हा थोडं तूप घाला. मेथी व्यवस्थित भाजून झाली की तूप सुटेल. नंतर त्यात सुंठ पावडर घाला. एका कढईमध्ये बेसन भाजून घ्या. भाजताना तूप घाला. बेसन पीठ सोनेरी होईपर्यंत भाजून घ्या नंतर काढून घ्या.

एका कढईत १ चमचा तूप घाला. त्यात गूळ घाला. गूळ वितळवण्यासाठी १ चमचा पाणी घाला. तोपर्यंत सर्व ड्राय फ्रुट्स जाडसर दळून घ्या.डिंकाचाही चुरा करा. जास्त बारीक न करता जाडसर डिंक ठेवा. गूळ वितळल्यानंतर गॅस बंद करा आणि सर्व पदार्थ गुळात एकजीव करा.

घरात बोअरींग गाऊन घालणं विसरा; मॅक्सी घेता तेवढ्याच पैशात मिळतील १० कॉटनचे नाईट सूट्स

थंड झाल्यानंतर व्यवस्थित मिसळून या मिश्रणाचे लाडू वळून घ्या. स्वादीष्ट मेथी, सुंठाचे लाडू तुम्ही हिवाळ्यात रोज खाऊ शकता. फक्त १ लाडू रोज खाल्ल्यानं शरीरातील वेदना, सांधेदुखी कमी होईल. थंडीत शरीराला आतून उष्णता मिळण्यासही मदत होईल.

English
हिंदी सारांश
Web Title : Relieve joint pain with a daily laddu this winter season.

Web Summary : Combat winter joint pain with a daily dose of methi and sunth ladoos. These ladoos, rich in dry fruits and spices, provide warmth and strengthen bones, offering relief from discomfort. The article includes a simple recipe for preparing these beneficial treats.
टॅग्स : हेल्थ टिप्सलाइफस्टाइल