Join us

तब्येत म्हणजे काडी, काही केल्या वजन वाढत नाही? ५ प्रकारे खा खजूर, सुधारणारच तब्येत...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2025 17:52 IST

eat dates for weight gain : how to eat dates to gain weight : benefits of dates for weight gain : how dates help in increasing weight : वजन वाढवण्यासाठी खजूर नेमका कोणत्या पद्धतीने खाल्ला तर अधिक परिणामकारक ठरतो ते पाहा...

आपल्यापैकी बरेचजण इतके बारीक आणि सडपातळ असतात की, त्यांच्या वजनाचा आकडा वाढतच नाही. कित्येकजणांच्या वजनाचा आकडा हा वर्षानुवर्षे तितकाच असतो, काही केल्यास वजन काही वाढतच नाही. बरेचजण त्यांच्या कमी वजनामुळे हैराण असतात. कमी वजनामुळे शरीरात (benefits of dates for weight gain) अशक्तपणा जाणवतो आणि अनेक (eat dates for weight gain) आजार होण्याची शक्यता वाढते. वजन वाढवण्यासाठी आपण अनेक उपाय करतो, पण काहीवेळा आपल्याला अपेक्षित असे परिणाम मिळत नाहीत. जर तुम्हाला नैसर्गिक आणि सोप्या पद्धतीने वजन वाढवायचे असेल, तर खजूर हा एक उत्तम पर्याय आहे. खजूरामध्ये असलेले पोषक तत्व वजन वाढवण्यास मदत करतात(how to eat dates to gain weight).

खजूर हा पौष्टिक आणि वजन वाढवण्यासाठी अतिशय उपयुक्त असा नैसर्गिक पदार्थ मानला जातो. त्यामध्ये भरपूर प्रमाणात फायबर, नैसर्गिक साखर, जीवनसत्त्वे आणि मिनरल्स असतात जे शरीराला ऊर्जा देतात आणि स्नायूंना ताकद (how dates help in increasing weight) मिळवून देतात. पण वजन वाढवण्यासाठी खजूर नेमका कोणत्या पद्धतीने खाल्ला तर अधिक परिणामकारक ठरतो, हे जाणून घेणं देखील तितकेच आवश्यक आहे. 

वजन नैसर्गिक पद्धतीने वाढवण्यासाठी खजूर कोणत्या पद्धतीने खावा ? 

१. दूध आणि खजूर :- वजन नैसर्गिक पद्धतीने वाढवण्यासाठी आपण खजूर दुधासोबत खाऊ शकता. वजन वाढवण्याचा हा एक अत्यंत सोपा उपाय मानला जातो. रात्री झोपताना एक ग्लास गरम दुधात ४ ते ५ खजूर टाकून ते पिऊ शकता. खजूरामध्ये भरपूर प्रमाणांत प्रोटीन असते, जे स्नायू मजबूत करण्यास आणि वजन वाढ करण्यास मदत करते.

वयाच्या तिशीतच केस झाले पांढरेशुभ्र? जेवणात रोज खा 'ही' चमचाभर चटणी - पांढरे केस दिसणारच नाहीत...

२. खजुराची स्मूदी बनवा :- तुम्ही खजुराची स्मूदी देखील तयार करुन पिऊ शकता. यासाठी दूध, केळी आणि खजूर ब्लेंडरमध्ये एकत्रित करून घ्या. ही स्मूदी स्वादिष्ट आणि पौष्टिक तर असतेच सोबतच शरीराला ऊर्जा देते आणि वजन वाढवण्यास मदत करते.

३. खजुराचे लाडू :- आपण खजुराचे लाडू देखील तयार करुन खाऊ शकता. यासाठी इतर ड्राय फ्रुटस सोबत खजूर एकत्र करून त्याचे पौष्टिक लाडू तयार करू शकता. यामुळे शरीरातील पोषणाची कमतरता भरून निघते आणि वजन वाढण्यास मदत होते.

ना फॅन्सी डाएट, ना महागडे सप्लिमेंट्स ! ऋजुता दिवेकर सांगते, घरचे साधे जेवण जेवून होतो वेटलॉस... 

४. खजूर गुळासोबत खा :- वजन वाढवण्यासाठी खजूर गुळासोबत खाणे अधिक फायदेशीर ठरते. खजूरामध्ये आयर्न, फायबर आणि मिनरल्स चांगल्या प्रमाणात असतात. गूळ पचनसंस्था मजबूत करण्यास मदत करते. 

आता शुगर वाढणार नाही, डायबिटीस राहील नियंत्रणात! जेवणाच्या ताटात हव्याच ६ भाज्या - राहाल एनर्जेटिक...  

५. खजूर आणि चणे :- वजन वाढवण्यासाठी आपण खजूर आणि चणे एकत्रित करुन खाऊ शकता. खजूरामध्ये लोह आणि खनिजे भरपूर प्रमाणात असतात, जे शरीराला ऊर्जा आणि पोषण देतात. तर, चणे प्रोटीन आणि फायबरचा उत्तम स्रोत आहेत, जे स्नायू मजबूत करण्यास मदत करतात. जर तुम्ही रोज भिजवलेले चणे आणि खजूर खाल्ले, तर ते वजन वाढवण्यासाठी खूप उपयुक्त ठरते.

टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्सहोम रेमेडीअन्न