बदलेल्या जीवनशैलीमुळे आजार देखील लवकर बळावताना दिसत आहे.(Heart health tips) लहान वयातच अनेक लोक गंभीर आजारांना बळी पडत आहेत.(Shortness of breath while walking) त्यातील एक कोलेस्टेरॉल आणि हृदयविकाराचा झटका.(cholesterol issue) सध्या कोलेस्टेरॉल हे हृदयविकाराचे सामान्य कारण आहे. तज्ज्ञ सांगतात ४० ते ५० वर्षात पूर्वी कोलेस्टेरॉल वाढण्याची समस्या होती. परंतु, सध्या ३० व्या वर्षातच कोलेस्टेरॉलचा सामना तरुणांना करावा लागत आहे. खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी, ताणतणाव, अपुरी झोप याचा हृदयावर परिणाम होतो. सतत बाहेरचे पदार्थ, तेलाचे पदार्थ खाल्ल्याने शरीरातील कोलेस्टेरॉलची पातळी वाढते. कोलेस्टेरॉलमुळे चयापचय बिघडते. जर आपल्याला देखील चालताना सतत धाप लागते, घाम येतो किंवा थकवा येत असेल तर वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या.
मुलांनी रात्री किती वाजता झोपणं आवश्यक? पालकांनी करावं १ काम, मुलांसाठी फार आवश्यक
कोलेस्टेरॉल हे आपल्या शरीरासाठी खूप महत्त्वाचे असते. जे आपल्या पेशी आणि हार्मोन्स बनवण्यास मदत करतात. व्हिटॅमिन डी सुद्धा यामुळे निर्माण होते. पण चांगले आणि वाईट कोलेस्टेरॉलची पातळी वाढली की, रक्तप्रवाहात अडथळा येतो. ज्यामुळे हार्ट ॲटॅक आणि स्ट्रोक येऊ शकतो.
लहान वयात कोलेस्टेरॉल वाढण्याची अनेक कारणं असू शकतात. जसे की, अस्वास्थ्यकर आहार, सतत काम करणं, शारीरिक हालचाल, लठ्ठपणा, मधुमेह. तसेच या समस्या अनुवांशिक देखील असू शकतात. त्यासाठी आपणं योग्य आहार, पुरेसा व्यायाम करायला हवा. कोलेस्टेरॉलची पातळी वाढल्यावर शरीरात अनेक प्रकारची लक्षणे दिसू लागतात. बहुतेक लोक याला सामान्य समजून दुर्लक्ष करतात. ज्यामुळे हृदयविकाराचा झटका येऊ शकतो. थकवा, अशक्तपणा, श्वास घेण्यास अडचण, छातीत दुखणे, हातापायांना मुंग्या येणे, हातपाय सुन्न होणे, पाय दुखणे किंवा पेटणे येणे, त्वचेचा रंग बदलणे यांसारख्या समस्या येतात. वाढलेल्या कोलेस्टेरॉलमध्ये उच्च रक्तदाब आणि पोटदुखीचा समावेश अधिक असतो.