आपलं शरीर हे गुंतागुंतीच्या यंत्रासारखं आहे. जेव्हा या यंत्राचा एखादा भाग नीट काम करत नाही, तेव्हा शरीर आपल्याला विविध संकेतांच्या माध्यमातून सावध करण्याचा प्रयत्न करत असतं. आपल्या रोजच्या धावपळीच्या जीवनात या छोट्या-मोठ्या लक्षणांकडे दुर्लक्ष करतो आणि याचा गंभीर परिणाम आपल्या आरोग्यावर होतो.(kidney disease symptoms) हल्लीच्या काळात चुकीची जीवनशैली, जंक फूडचे सेवन आणि व्यायामाचा अभाव यामुळे किडनीशी संबंधित आजार झपाट्याने वाढत आहेत.(early signs of kidney disease)
अनेकदा आपल्याला वाटतं की पाय सुजणे किंवा थकवा येणे हे कामाच्या ताणामुळे होत आहे, पण हे संकेत आपल्या किडनीच्या आरोग्याशी निगडित असू शकतात.(swelling in legs causes) किडनी हा आपल्या शरीरातील असा अवयव आहे जो रक्तातील घाण फिल्टर करून लघवीवाटे बाहेर काढतो. पण या प्रक्रियेत अडथळा आला, तर शरीरात विषारी घटक साचू लागतात. त्याचे परिणाम हात-पाय थरथरणे किंवा सूज येण्याच्या रूपात दिसू लागतात.(hand tremors health causes) त्यासाठी किडनी निकामी होण्यापूर्वी शरीर जे 'रेड सिग्नल' देतं, ते वेळीच ओळखणं अत्यंत गरजेचं आहे. जाणून घेऊया किडनी आपल्याला कोणते संकेत देते.
1. किडनी आपल्या रक्तातील जास्त प्रमाणातील सोडियमचे प्रमाण बाहेर काढण्यास असमर्थ ठरते, तेव्हा हे पाणी शरीराच्या खालच्या भागात साठते. ज्यामुळे पाय, घोटा आणि तळपायांवर सूज येते. जर ही सूज बराच वेळ राहत असेल तर किडनीच्या आजाराची सगळ्यात मोठी खूण असू शकते.
2. रक्तातील विषारी घटक वाढल्याने मज्जासंस्थेवर ताण येतो. यामुळे स्नायूंमध्ये कमजोरी जाणवते. ज्यामुळे हात-पाय थरथरु लागतात. ही सर्व किडनीच्या आजारामुळे होते.
3. वारंवार लघवीला येणे, लघवीचा रंग गडद होणे किंवा लघवीतून फेस येणे ही लक्षणे किडनीमध्ये प्रोटीनची गळती होत असल्याचे सांगतात. लघवीतून रक्त येणे हे तर अत्यंत गंभीर लक्षण मानले जाते.
4. आपल्या डोळ्यांखाली सतत सूज दिसत असेल, तर आपली किडनी रक्तातील प्रोटीन लघवीवाटे बाहेर टाकत आहे. तसेच रक्तातील टाकाऊ पदार्थ वाढल्याने त्वचेवर पुरळ आणि प्रचंड खाज सुटू शकते.
5. किडनीचे आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी आपल्याला दिवसातून किमान ३-४ लिटर पाणी प्यायला हवे. ज्यामुळे किडनीतील टॉक्सिन्स बाहेर काढण्यास मदत होईल. आहारात मिठाचे प्रमाण कमी ठेवा, ज्यामुळे मीठ खाल्ल्यावर किडनीवर जास्त ताण येणार नाही.
