कान हे अतिशय नाजूक आणि महत्त्वाचे इंद्रिय आहे. कान तसा सतत त्रास न देणारा अवयव आहे. पण अनेकदा चुकीच्या सवयींमुळे कानात मळ साचतो, संसर्ग होतो आणि कान दुखण्याचा त्रास सुरू होतो. (Earache can be painful, Is it dirt stuck or is there something else? Here's what to do..)त्यामुळे कान स्वच्छ कसे ठेवावेत, कान दुखण्याची सामान्य कारणे कोणती आणि त्यावर कोणते उपाय करता येतात हे जाणून घेणे आवश्यक ठरते.
कान साफ ठेवण्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कानाच्या आत खोलवर काहीही घालू नये. काड्यापेटीतली काडी, कापूस , पिनेची उलटी बाजू, पेनइतर टोकदार वस्तू कानात घालण्याची सवय कानाच्या पडद्याला इजा करते. ()कान स्वच्छ करताना फक्त बाहेरील भाग ओल्या, स्वच्छ कपड्याने हलक्या हाताने पुसणे पुरेसे असते. आंघोळीनंतर कानात पाणी राहू नये यासाठी डोके हलकेच एका बाजूला झुकवून पाणी बाहेर येऊ द्यावे. कानात नैसर्गिकरित्या तयार होणारा मळ म्हणजेच वॅक्स हा संरक्षणासाठी असतो, तो पूर्णपणे काढण्याची गरज नसते.
कानात जास्त मळ साचत असेल किंवा कान बंद झाल्यासारखे वाटत असेल तर स्वतः काही प्रयोग न करता तज्ज्ञ डॉक्टरांकडूनच कान साफ करून घेणे योग्य ठरते. काही लोक कानात तेल घालतात, परंतु तेही डॉक्टरांच्या सल्ल्यानेच करावे. कानात सतत इअरफोन किंवा हेडफोन घालून ठेवणअयाची सवय असल्यास ती बदला. कानाला त्याचा त्रास होतो. तसेच ही यंत्रे वेळोवेळी स्वच्छ करणे गरजेचे असते. कारण त्यातून संसर्ग होण्याची शक्यता वाढते.
कान दुखण्याची अनेक सामान्य कारणे असतात. कानात जंतुसंसर्ग होणे हे सर्वात सामान्य कारण मानले जाते. सर्दी, सायनस किंवा घशाचा संसर्ग वाढून तो कानापर्यंत पोहोचला तर कान दुखू लागतात. लहान मुलांमध्ये सर्दी झाल्यानंतर कानदुखीचा त्रास जास्त दिसून येतो. कानात पाणी शिरुन ते अडकून राहिल्यासही संसर्ग होऊ शकतो आणि वेदना निर्माण होतात.
कानात जास्त मळ साचणे हेही दुखण्याचे कारण ठरते. मळ कडक झाला की कानात दाब जाणवतो, ऐकू कमी येते आणि वेदना होतात. तसेच दातदुखी, जबड्याचा त्रास किंवा अक्कल दाढ येणे यामुळेही कानात दुखतो. कधी कधी जोरात आवाज ऐकणे, सतत हेडफोन वापरणे किंवा अचानक कानावर मोठ्या आवाजाचा आघात होणे. यामुळेही कानात वेदना होतात. कान फार नाजूक अवयव आहे. त्यामुळे काहीही उपाय करण्याऐवजी तज्ज्ञांचा सल्ला घेणे फार महत्त्वाचे असते.
