Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > सततचा कोरडा खोकला म्हणजे झोपेचे वाटोळे! सारखा ठसका लागतो, ३ उपाय करा-कमी होईल त्रास

सततचा कोरडा खोकला म्हणजे झोपेचे वाटोळे! सारखा ठसका लागतो, ३ उपाय करा-कमी होईल त्रास

dry cough remedies, follow these 3 remedies, cure for dry cough , monsoon illness : कोरडा खोकला बरा व्हावा यासाठी काही टिप्स पाहा. घरगुती उपाय करुन पटकन बरे व्हा.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2025 14:30 IST2025-07-10T14:28:45+5:302025-07-10T14:30:25+5:30

dry cough remedies, follow these 3 remedies, cure for dry cough , monsoon illness : कोरडा खोकला बरा व्हावा यासाठी काही टिप्स पाहा. घरगुती उपाय करुन पटकन बरे व्हा.

dry cough remedies, follow these 3 remedies, cure for dry cough , monsoon illness | सततचा कोरडा खोकला म्हणजे झोपेचे वाटोळे! सारखा ठसका लागतो, ३ उपाय करा-कमी होईल त्रास

सततचा कोरडा खोकला म्हणजे झोपेचे वाटोळे! सारखा ठसका लागतो, ३ उपाय करा-कमी होईल त्रास

खोकला सगळ्यांनाच होतो. खोकला झाल्यावर घसा तर दुखतोच पण पाठ, पोट, छाती इतरही अवयव फार दुखतात. ( dry cough remedies,  follow these 3 remedies, cure for dry cough , monsoon illness )त्यात जर कोरडा खोकला असेल तर तो दीर्घकाळ राहतो. कोरडा खोकला हा अनेक कारणांमुळे होतो आणि त्याची लक्षणे सामान्यतः दीर्घकाळ टिकणारीच असतात. सर्वसामान्यपणे सर्दी, ताप बरा झाल्यावरही खोकला राहतो. पटकन बरे वाटत नाही. या मागचं कारण म्हणजे श्वासनलिकेतील संवेदनशीलता वाढलेली असते. वातावरण यासाठी कारणीभूत असतेच मात्र धूळ, धूर, परागकण, प्राण्यांचे केस किंवा कोणतीही अ‍ॅलर्जी देखील कोरड्या खोकल्यास कारणीभूत ठरते.

काही वेळा अपचन, पित्त किंवा अन्ननलिकेत आम्ल उलट्या दिशेने गेल्यामुळेही गळ्याला त्रास होतो आणि खोकला सुरू होतो. धूम्रपान करणार्‍यांमध्ये तर कोरड्या खोकल्याचा त्रास अधिक सर्वाधिक असतो. कारण त्यांच्या फुफ्फुसांवर सतत ताण येतो त्यामुळे व्यसने टाळावीत. याशिवाय प्रदूषित हवामान, रासायनिक वायू किंवा काही औषधांचे दुष्परिणाम देखील खोकल्यास कारणीभूत ठरू शकतात. काही व्यक्तींना दमा असल्यास त्यांनाही खोकला सारखा होतो. मुख्य म्हणजे रात्री कोरड्या खोकल्याचा त्रास जास्त होतो. आडवे पडल्यावर लगेच खोकला येतो. . सतत ताणतणावात राहणार्‍या लोकांना मानसिक कारणांमुळे खोकल्याचा त्रास जाणवू शकतो.

 

कोरडा खोकला झाल्यावर घरगुती उपाय खूप उपयुक्त ठरू शकतात. दिवसातून अनेक वेळा गरम पाणी पिणे, गळा कोरडा राहू न देता थोड्या-थोड्या वेळाने काहीतरी गरम पिणे. असे सामान्य उपाय सतत करत राहावे. हा एक साधा पण प्रभावी उपाय आहे.

 

आल्याचा रस, हळद, तुळस आणि काळीमिरी घालून तयार केलेला काढा कोरड्या खोकल्यावर फार गुणकारी ठरतो. झोपण्यापूर्वी हळदीचे दूध घेतल्याने गळ्याला आराम मिळतो आणि रात्री झोपताना लागणारा ठसका जरा नियंत्रणात ठेवता येतो. खवखव थोडी कमी होते.

 

गरम पाण्यात थोडेसे सैंधव टाकून त्याची वाफ घेण्याने श्वसननलिका मोकळी होते आणि खोकला कमी होतो. ताज्या तुळशीच्या पानांचा रस आणि मध एकत्र करून घेतल्यास त्याचा सुद्धा चांगला परिणाम होतो.

मात्र, काही वेळा केवळ घरगुती उपायांनी खोकला कमी होत नाही. जर कोरड्या खोकल्यासोबत सतत ताप येत असेल, वजन कमी होत असेल, छातीत दुखत असेल किंवा खोकल्यात रक्त येत असेल तर डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे आहे. दोन आठवड्यांपेक्षा अधिक काळ खोकला चालू राहीला तरी वैद्यकीय तपासणी करून योग्य औषधोपचार घ्यावेत. कोरड्या खोकल्याकडे दुर्लक्ष न करता योग्य उपचार व काळजी घेतल्यास तो लवकर बरा होतो आणि श्वसनसंस्थेचे आरोग्य टिकून राहते.

Web Title: dry cough remedies, follow these 3 remedies, cure for dry cough , monsoon illness

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.