Join us

Drop Head Syndrome: सारखं मोबाईल बघितल्यामुळे २५ वर्षाच्या तरुणाची मान कायमची वाकली, जडला नवाच आजार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2025 15:33 IST

Drop Head Syndrome: सतत मोबाईल पाहण्याची सवय (mobile addiction) किती विचित्र आजारांना जन्म देऊ शकते पाहा....

ठळक मुद्दे मान सतत खाली झुकल्यामुळे त्याला हळूहळू अन्न गिळायलाही त्रास होऊ लागला. त्यामुळे साहजिकच वजनही कमी कमी होऊ लागलं. 

मोबाईल आता जवळपास सगळ्याच वयोगटातल्या लोकांसाठी एक अत्यावश्यक वस्तू झालेला आहे. मोबाईलशिवाय एक- दोन तास घालवणंही कित्येकांना असह्य वाटू लागतं. कामासाठी मोबाईल वापरणं सध्याच्या जगाच गरजेचंच आहे. पण आपण त्याचा खूप अतिरेक करायला लागलो आहोत. गरज नसतानाही उगाच मोबाईल हातात घ्यायचा आणि स्क्रोलिंग करत बसायचं ही वाईट सवय सध्या अनेकांमध्ये दिसून येते. याच सवयीचा किती वाईट परिणाम आपल्या आरोग्यावर होऊ शकतो, हे सांगणारं एक उदाहरण नुकतंच समोर आलं असून सध्या त्या जपानी तरुणाचा किस्सा सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.

 

जर्नल ऑफ ऑर्थोपेडिक सर्जरी यांनी नुकताच एक अहवाल प्रसिद्ध केला. यामध्ये असं दिसून आलं की जपानमध्ये राहणाऱ्या एका २५ वर्षीय तरुणाला खूप जास्त वेळ मोबाईल पाहण्याची सवय होती.

७ प्रकारच्या चपात्या- रोज यापैकी एक चपाती खा, वजन- शुगर कंट्रोलमध्ये राहून तब्येत होईल ठणठणीत

मोबाईल पाहताना तो मान खाली झुकवायचा आणि तासंतास त्याच अवस्थेत राहायचा. यामुळे मग हळूहळू त्याच्या मानेला गाठ येऊ लागली आणि त्याला मान वर उचलून पाहणंही कठीण होऊ लागलं. अहवालानुसार मान सतत खाली झुकल्यामुळे त्याला हळूहळू अन्न गिळायलाही त्रास होऊ लागला. त्यामुळे साहजिकच वजनही कमी कमी होऊ लागलं. 

 

‘ड्रॉपिंग हेड सिंड्रोम’ असं म्हणून हा आजार आता ओळखला जाऊ लागला आहे. त्या मुलाच्या मानेमध्ये प्रचंड वेदना होत होत्या. त्यामुळे डाॅक्टरांनी त्याच्यावर उपाय केला.

तांदळाच्या पिठाचा जाळीदार, कुरकुरीत इंस्टंट डोसा- नाश्त्यासाठी परफेक्ट मेन्यू, घ्या चवदार रेसिपी 

पण त्याचा विपरित परिणाम झाला आणि त्याच्या मानेच्या भागातल्या सगळ्या संवेदनाच गेल्या. या तरुणाची मान पुन्हा पुर्ववत करण्यासाठी जपानी डाॅक्टर खूप प्रयत्न करत असून आजवर त्याचे बरेच लहान लहान ऑपरेशन्सही झाले आहेत. असा आजार आपल्यालाही गाठू शकतोच. त्यामुळे मोबाईलचं व्यसन कमी करणं आणि मोबाईल पाहायचाच असेल तर योग्य स्थितीत बसून तो बघणं हे खूप गरजेचं आहे. 

 

टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्समोबाइल