चहाला व्यसन असेच संबोधले जाते. कारण चहाची ज्यांना फार सवय असते त्यांना वेळेला चहा लागतोच. एखादी चहाची वेळ चुकली की त्यांना त्रास होतो. डोकं दुखतं किंवा इतरही त्रास होतात. (drinking tea at this time may cause problem, see what to do, how tea is harmful )वेळेवर चहा मिळाला नाही तर त्यांची फार चिडचिड होते. चहा पिणे ही सवय झाली असते. झोपेतून उठल्यावर पहिले चहा हवा असतो. त्याशिवाय पुढील काहीच कामे करावीशी वाटत नाही. काहींना तर पोट साफ होण्यासाठीही चहा प्यावा लागतो. त्याशिवाय प्रेशर येत नाही असे म्हणणारे अनेक जण आहेत. मात्र ही सवय आरोग्यासाठी हानिकारक ठरु शकते. काही जणांना उपाशीपोटी चहा प्यायल्यामुळे पित्त होते आणि त्याचा त्रास वाढतच जातो.
अनेकांची प्रकृती पित्तकर असते. ज्यांना पित्ताचा फार त्रास आहे अशांनी सकाळी सकाळी रिकाम्या पोटी चटा पिणे टाळायला हवे. चहा पिण्याची ही सवय तुमच्यासाठी त्रासदायक ठरु शकते. पोटात डचमळून उलट्या होतात. तसेच डोकं दुखतं. नक्की काय होते ते जाणून घ्या.
चहामुळे शरीरातील पित्त खवळते. शरीरातील अॅसिडची पातळी वाढल्यामुळे चिडचिड व्हायला लागते. सारखा संताप होत राहतो. डॉ. हरीश पाटणकर सांगतात, चहा पिण्यापूर्वी काहीतरी खा आणि मगच चहा प्या. रिकाम्या पोटी अजिबात चहा पिऊ नका. त्यामुळे पित्ताची पातळी वाढते. पोटाचे विकार होतात. तसेच शितपित्त अंगावर उठायला लागते. पित्तामुळे उलट्या होतात आणि डोकं दुखतं मात्र शितपित्तामुळे शरीरावर चट्टे उठतात. अंगावर पित्त उठलं असं अनेक जण म्हणतात. पित्त उठतं म्हणजे काय होतं? तर सहन न होणारे पित्त आणि उष्णता शरीर बाहेर सोडते. त्यामुळे शरीरावर लहान लहान लालसर पुरळ उठते.
हळूहळू संपूर्ण शरीरभर ते पसरत जाते. फक्त पसरत नाही तर त्यावर खाजही येते. खाज इतकी असह्य सुटते की ती सहन होत नाही आणि खाजवण्याची क्रिया घडून येते. खाजवल्यामुळे ते आणखी वाढते आणि मग जाता जात नाही. उष्णता वाढवण्यात आणि पित्ताची पातळी वाढवण्यात चहा कारणीभूत ठरतो. त्यामुळे सकाळी उठल्या उठल्या हातात चहाचा कप घेण्याची सवय बदला. ती आरोग्यासाठी चांगली नाही असे अनेक तज्ज्ञ सांगतात.