Join us

५ गोष्टींचा त्रास असेल तर कोमट पाणी कधीच पिऊ नका; वजन कमी करण्याच्या नाद पडेल महागात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2024 17:37 IST

Drinking Hot Water: Is it Good for You? : कोमट पाणी पिणे फायदेशीर जरी असले तरी याचे काही दुष्परिणाम आहेत..

हिवाळा (Winter) सुरु होताच लोक कोमट पाणी प्यायला सुरुवात करतात (Warm Water). कोमट पाणी पिण्याचे अनेक फायदे आहेत. पण जास्त प्रमाणात कोमट पाणी प्यायल्याने शरीराला हानी देखील पोहचू शकते (Health Tips). कोमट पाणी पिण्याचेही काही नियम आहेत. काहींच्या आरोग्यासाठी कोमट पाणी फायदेशीर ठरते. तर काहींनी चुकूनही कोमट पाणी पिऊ नये.

बऱ्याचदा आधीपासून असलेला आजार गंभीर होऊ शकतो. ज्यामुळे डॉक्टरांकडे चकरा वाढू शकते. कोमट पाणी नेमके कुणी पिऊ नये? कोमट पाणी प्यायल्याने कोणत्या गंभीर आजारांचा धोका वाढू शकतो?(Drinking Hot Water: Is it Good for You?).

कोमट पाणी कधी पिऊ नये?

कोमट पाणी प्यायल्याने रक्ताभिसरणात सुधारणा होते. परंतु काही लोकांसाठी हे हानिकारक ठरू शकते. डिहायड्रेशन, पोटात अल्सर, माऊथ ब्लीडींग, ताप आणि अॅसिड रिफ्लेक्स असल्यावर कोमट पाणी पिणे टाळावे. याचा नकारात्मक परिणाम आरोग्याला सहन करावे लागते.

थुलथुलीत पोट होईल सपाट - बॅड कोलेस्टेरॉलही येईल नियंत्रणात; फक्त रोज चमचाभर 'ही' चटणी खा

डिहायड्रेशन

एनसीबीआयच्या रिसर्चनुसार, शरीराला हायड्रेट ठेवण्यासाठी १६ डिग्री सेल्सियस तापमान असलेले पाणी प्यावे. सतत कोमट पाणी प्यायल्याने शरीर डिहायड्रेट होते.

माऊथ ब्लीडींग

हेल्थ डायरेक्ट या वेबसाईटनुसार, जर आपल्या तोंडात फोड आले असतील आणि माऊथ ब्लीडींग होत असेल तर, कोमट पाणी पिणे टाळावे. अशा परिस्थितीत थंड पाणी प्यावे. यामुळे माऊथ ब्लीडींगचा त्रास होत नाही.

पोटाचा अल्सर

पोटाच्या अल्सरला गॅस्ट्रिक अल्सर असेही म्हणतात. गरम पाण्यामुळे पोटाच्या आतील अस्तर खराब होऊ शकतात, असे तज्ज्ञांचे मत आहे. त्यामुळे पोटाचा त्रास असल्यास शक्यतो कोमट पाणी पिणे टाळा.

दिवाळीत फोटो सुंदर यायला हवेत? आजपासून फॉलो करा ७ गोष्टी- १० दिवसांत घटेल वजन

उच्च ताप

तापामध्ये शरीराचे तापमान वाढल्याने आणि घाम येणे यामुळे डिहायड्रेशन होते. या कारणास्तव या काळात सामान्य पाणी प्यावे. ताप असताना खूप थंड किंवा गरम पाणी पिऊ नये.

टॅग्स : हेल्थ टिप्सआरोग्य