Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > उन्हाळ्यात रोज ‘हे’ पाणी प्या, चुकूनही लागणार नाही उन्हाळी-होणार नाही पित्त आणि गॅसेस

उन्हाळ्यात रोज ‘हे’ पाणी प्या, चुकूनही लागणार नाही उन्हाळी-होणार नाही पित्त आणि गॅसेस

Drink this water every day in summers, stay healthy with easy home remedies : हे पाणी पचनासाठी फार चांगले. पाहा कसे तयार करायचे.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2026 16:12 IST2026-03-04T16:09:02+5:302026-03-04T16:12:01+5:30

Drink this water every day in summers, stay healthy with easy home remedies : हे पाणी पचनासाठी फार चांगले. पाहा कसे तयार करायचे.

Drink this water every day in summers, stay healthy with easy home remedies | उन्हाळ्यात रोज ‘हे’ पाणी प्या, चुकूनही लागणार नाही उन्हाळी-होणार नाही पित्त आणि गॅसेस

उन्हाळ्यात रोज ‘हे’ पाणी प्या, चुकूनही लागणार नाही उन्हाळी-होणार नाही पित्त आणि गॅसेस

उन्हाळा असो किंवा पावसाळा, पोटाचे आजार, सूज, अपचन, गॅस किंवा जडपणा यामुळे अनेकांना त्रास होतो. अशा वेळी घरच्या घरी सहज करता येणारा आणि आजीबाईंच्या घरगुती उपायांमध्ये मानाचा असलेला एक उपाय म्हणजे धणे, जिरे आणि ओवा घालून केलेले पाणी. साधे दिसणारे हे पाणी शरीरावर मात्र अतिशय चांगला परिणाम करते. नियमित आणि योग्य प्रमाणात घेतल्यास पचन सुधारते, सूज कमी होते आणि शरीर हलके वाटू लागते.

धणे, जिरे आणि ओवा या तिन्ही घटकांमध्ये औषधी गुणधर्म आहेत. धण्यात थंडावा देणारे आणि पित्त शांत करणारे गुण असतात. त्यामुळे शरीरातील उष्णता कमी करण्यास आणि अॅसिडिटी आटोक्यात ठेवण्यास मदत होते. जिऱ्यात अँटी ऑक्सिडंट्स आणि पचन सुधारक गुणधर्म असतात. जिरे पोटातील एन्झाइम्स सक्रिय करून अन्न पचण्यास मदत करतात. (Drink this water every day in summers, stay healthy with easy home remedies )ओवा मात्र विशेषतः गॅस, पोटदुखी आणि अपचनावर प्रभावी मानला जातो. ओव्यातील थायमॉल हा घटक पचनक्रिया सुधारतो आणि पोटातील जंतुसंसर्ग कमी करण्यास मदत करतो.

हे तिन्ही घटक एकत्र आल्यावर त्यांचा परिणाम अधिक प्रभावी होतो. हे पाणी शरीरातील सूज कमी करण्यास मदत करते. ज्यांना सतत पोट फुगल्यासारखे वाटते किंवा जेवल्यानंतर जडपणा जाणवतो, त्यांच्यासाठी हे पाणी लाभदायक ठरते. सकाळी रिकाम्या पोटी कोमट स्वरुपात घेतल्यास पोट साफ होण्यास मदत होते आणि मेटाबॉलिझम सुधारते. त्यामुळे वजन नियंत्रणात ठेवण्यासाठीही काही प्रमाणात उपयोग होऊ शकतो.

उन्हाळ्यात हे पाणी शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी उपयुक्त ठरते, तर हिवाळ्यात कोमट करून घेतल्यास सर्दी-खोकल्यावरही हलका आराम मिळतो. महिलांमध्ये मासिक पाळीदरम्यान होणारी पोटदुखी कमी करण्यासही ओवा-जिरे उपयुक्त ठरतात. याशिवाय हे पाणी शरीरातील विषारी घटक बाहेर टाकण्यास मदत करून त्वचा स्वच्छ आणि तजेलदार ठेवण्यास हातभार लावू शकते. कोणताही घरगुती उपाय मर्यादित प्रमाणातच घ्यावा. अतिप्रमाणात सेवन केल्यास अॅसिडिटी किंवा पित्त वाढण्याची शक्यता असते. गर्भवती महिला किंवा दीर्घकालीन आजार असलेल्यांनी डॉक्टरांचा सल्ला घेऊनच पाणी प्यावे. एकंदरीत, धणे, जिरे आणि ओवा घालून केलेले पाणी हा साधा, स्वस्त आणि नैसर्गिक उपाय आहे. पचनसंस्था सुरळीत ठेवणे, शरीर हलके ठेवणे आणि उष्णतेचा त्रास कमी करणे यासाठी हा उपाय फायदेशीर ठरू शकतो. 

Web Title : गर्मी में पाचन, एसिडिटी से राहत के लिए रोज पिएं यह पानी।

Web Summary : धनिया, जीरा और अजवाइन का पानी पाचन में मदद करता है, एसिडिटी और सूजन को कम करता है। यह सरल उपाय पेट के स्वास्थ्य, विषहरण और समग्र कल्याण को बढ़ावा देता है। सीमित मात्रा में सेवन करें।

Web Title : Drink this daily in summer for digestion, acidity relief.

Web Summary : Dhaniya, jeera, and ajwain water aids digestion, reduces acidity, and inflammation. This simple remedy promotes gut health, detoxification, and overall well-being. Consume in moderation.