Join us
Daily Top 2 Weekly Top 5

शरीरातील मॅग्नेशियम कमी झाल्याची ही लक्षणे समजून घेण्यात चुकू नका , पाहा मॅग्नेशियम वाढवण्याचे सोपे उपाय ....

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2026 15:13 IST

Don't miss out on these symptoms of magnesium deficiency, see these easy ways to increase magnesium : आहारातील मॅग्नेशियम वाढवा, कसे ते जाणून घ्या.

शरीर निरोगी ठेवण्यासाठी विविध खनिजांची गरज असते आणि त्यामध्ये मॅग्नेशिअम हे एक अत्यंत महत्त्वाचे खनिज आहे. स्नायूंचे कार्य, नर्व्हस सिस्टीम, हाडांचे आरोग्य आणि हृदयाचे ठोके व्यवस्थित ठेवण्यासाठी मॅग्नेशिअमची मोठी भूमिका असते. (Don't miss out on these symptoms of magnesium deficiency, see these easy ways to increase magnesium)पण अनेक वेळा आहारातील कमतरता, ताणतणाव किंवा काही आरोग्य समस्यांमुळे शरीरात मॅग्नेशिअमची पातळी कमी होते आणि त्याची विविध लक्षणे दिसू लागतात.

मॅग्नेशिअमची कमतरता असल्यास सुरुवातीला थकवा आणि अशक्तपणा जाणवतो. शरीरात ऊर्जा कमी असल्यासारखं वाटतं आणि काम करण्याची इच्छाही कमी होते. त्याचबरोबर स्नायूंमध्ये गोळे येणे, आकडी येणे किंवा थरथरायला होणे ही लक्षणे दिसू शकतात. काही लोकांना रात्री पायात क्रॅम्प्स येण्याचा त्रास होतो.  याशिवाय डोकेदुखी, चिडचिड, झोप न लागणे किंवा झोपेचा दर्जा खराब होणे हे ही संकेत असू शकतात.

काही वेळा हृदयाचे ठोके अनियमित होणे, रक्तदाबात चढ-उतार होणे यासारखी गंभीर लक्षणेही दिसू शकतात. मानसिक आरोग्यावरही परिणाम होऊन चिंता, तणाव किंवा उदासीनता वाढू शकते. त्यामुळे ही लक्षणे सतत जाणवत असतील तर त्याकडे दुर्लक्ष करू नये. मॅग्नेशियम कमी झाले की झोपेवर त्याचा चांगलाच परिणाम होतो. झोपेचे प्रमाण कमी होते. 

मॅग्नेशिअमची कमतरता भरून काढण्यासाठी सर्वात सोपा आणि प्रभावी मार्ग म्हणजे योग्य आहार घेणे. हिरव्या पालेभाज्या, बदाम, काजू, शेंगदाणे, बिया (जसे की भोपळ्याच्या बिया), डाळी, केळी आणि संपूर्ण धान्य यामध्ये मॅग्नेशिअम चांगल्या प्रमाणात आढळते. रोजच्या आहारात या पदार्थांचा समावेश केल्यास शरीराला आवश्यक प्रमाण मिळू शकते.

तसेच भरपूर पाणी पिणे आणि कॅफिन किंवा जास्त साखर असलेले पदार्थ कमी करणेही उपयोगी ठरते. ताणतणाव कमी करण्यासाठी योग, ध्यान किंवा हलका व्यायाम करणे फायदेशीर आहे, कारण जास्त ताणामुळेही मॅग्नेशिअमची पातळी कमी होऊ शकते. काही वेळा डॉक्टरांच्या सल्ल्याने मॅग्नेशिअम सप्लिमेंट्स घ्यावे लागतात, पण ते स्वतःहून घेणे टाळावे.

एकंदरीत, मॅग्नेशिअमची कमतरता ही लहान वाटणारी समस्या असली तरी ती शरीरावर मोठा परिणाम करू शकते. योग्य आहार, निरोगी सवयी आणि वेळेवर लक्ष दिल्यास ही कमतरता सहज भरून काढता येते आणि शरीर निरोगी ठेवता येते.

English
हिंदी सारांश
Web Title : Don't ignore magnesium deficiency symptoms; boost magnesium with these simple ways.

Web Summary : Magnesium deficiency causes fatigue, muscle cramps, and sleep issues. Increase intake through green leafy vegetables, nuts, seeds, and bananas. Reduce stress and consult a doctor.
टॅग्स : हेल्थ टिप्सआरोग्यहोम रेमेडीअन्नसोशल व्हायरल