Join us

चहा पिताना तुम्हीपण हमखास ८ चुका करताच, चहाचे शौकीन असाल तर 'या' सवयी टाळा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2023 16:17 IST

Don't Make These 8 Mistakes While Sipping Chai : चहा पिताना ८ चुका ठरतात आरोग्यासाठी घातक, चहा प्या पण..

चहाला वेळ नाही, मात्र वेळेला चहा (Tea Lovers) हा लागतोच. चहा पिण्यासाठी बरेच जण कारणं शोधतात. कारण २ कप चहाने अनेकांचं भागत नाही. मग पाहुणे आले की, 'कपभर चहा मलाही हवा', 'वातावरण किती चांगलं आहे, चला घोटभर चहा घेऊयात.' असे म्हणत-म्हणत आपण दिवसभरात किती कप चहा पितोय हे आपल्यालाही कळून येत नाही. पण प्रमाणाच्या बाहेर चहा कधी पिऊ नका.

जर आपण चहाचे शौकीन असाल तर, नक्कीच प्या. पण चहा कधी, केव्हा आणि कितीप्रमाणात प्यावा, हे ठाऊक असणं गरजेचं आहे (Health Tips). चहा पिताना कोणत्या चुका टाळायला हव्या. याबद्दलची माहिती आहारतज्ज्ञ राधिका गोयल यांनी शेअर केली आहे. त्यामुळे चहा पीत असताना या ८ गोष्टी लक्षात ठेवून प्या, यामुळे आरोग्य सुदृढ राहील. शिवाय चहा पिण्याची तलफही मिटेल(Don't Make These 8 Mistakes While Sipping Chai ).

चहा पिताना करू नका ८ चुका, आरोग्यासाठी हानिकारक

- अनेकदा लोकं रिकाम्या पोटी चहा पितात. पण बेड टी आरोग्यासाठी हानिकारक. जर आपण देखील रिकाम्या पोटी चहा पीत असाल तर, वेळीच ही सवय मोडा. यामुळे दिवसभर पोटात जळजळ, अॅसिडिटी होऊ शकते.

-सकाळी नाश्ता किंवा काहीतरी हेल्दी पदार्थ खाऊनचं चहा प्या. काही जण न्याहारीसोबत चहा घेतात. पण ही पद्धत चुकीची आहे. जर आपण नाश्त्यासह चहा पीत असाल तर, शरीराला पदार्थातून आयर्न अब्जॉर्ब करण्यास अडचण येऊ शकते.

भरपेट जेवण केल्यानंतरही खाण्याची इच्छा होते? 'असं ' होण्याची ४ कारणं, वेळीच सवय बदला-भुकेवर राहील कण्ट्रोल

- जेवण्यापूर्वी किंवा जेवल्यानंतर लगेच चहा पिणे टाळा. चहामध्ये असलेले घटक शरीराला आयर्न अब्जॉर्ब करण्यास अडथळे निर्माण करतात. ज्यामुळे अॅनिमिया देखील होऊ शकते. जेवण, नाश्ता करण्याच्या एक तासानंतरचं चहा प्या.

- थंड पदार्थ खाल्ल्यानंतर लगेच चहा पिऊ नका. यामुळे हिरड्या कमकुवत होतात, शिवाय दातही किडतात.

- झोपण्याच्या ६ ते ८ तास आधी चहा पिऊ नका. त्यामध्ये असलेल्या कॅफिनमुळे झोपेचं चक्र बिघडू शकतं. त्यामुळे झोपेच्या आधी कधीच कॅफिनयुक्त पदार्थ खाऊ किंवा पिऊ नका.

मिठात भेसळ आहे हे कसे ओळखाल? बाबा रामदेव सांगतात १ सोपी ट्रिक

- जास्त चहा प्यायल्याने अॅसिडिटी होते. शिवाय पचनक्रियेतही अडचण निर्माण होते. त्यामुळे दिवसभरात १ ते २ कपपेक्षा जास्त चहा पिऊ नका.

- प्लास्टिकच्या कपात चहा कधीही पिऊ नका. यामुळे चहा विषारी होऊ शकते.

- चहामध्ये साखरेचा जास्त वापर करू नका. खूप गोड चहा प्यायल्यास त्याचा दुष्परिणाम शरीराच्या ब्लड शुगरवरही होऊ शकतो.

टॅग्स : हेल्थ टिप्सआरोग्य