Join us

सततच्या डोकेदुखीकडे दुर्लक्ष नकोच! ब्रेन ट्यूमरसारखा गंभीर आजार, ६ लक्षणं दिसातच व्हा सावध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2025 13:40 IST

6 symptoms of brain tumor: Headache due to brain tumor: Signs your headache is serious: बऱ्याचदा डोकेदुखीच्या या समस्येला दुर्लक्ष केले जाते ज्यामुळे नंतर आपल्याला अधिक त्रास सहन करावा लागतो. ब्रेन ट्यूमरची लक्षणे कोणती पाहूया.

डोकेदुखीची समस्या अशी आहे ज्याचा सामना आपण कधी ना कधी केलाच असेल. आज भयंकर डोकं दुखतंय ग.. असं आपण वारंवार कुणाकडून तरी ऐकतच असतो.(Headache due to brain tumor) बऱ्याचदा डोकेदुखीच्या या समस्येला दुर्लक्ष केले जाते ज्यामुळे नंतर आपल्याला अधिक त्रास सहन करावा लागतो. (Signs your headache is serious) वेळेवर झोप न घेणे, ताण आणि कमी पाणी प्यायल्यानंतर आपल्याला डोकेदुखीची समस्या उद्भवते.(6 symptoms of brain tumor) परंतु, अनेकदा अचानक डोके दुखू लागते अशावेळी नेमके काय करावे सुचत नाही. वाढत्या स्क्रीन टाइमचा ताण डोळ्यांवर पडू लागला की, भयंकर डोके दुखू लागते.(Head pressure vs headache tumor) डोकेदुखीमुळे अस्वस्थ वाटू लागले की आपण पेनकिलर्स घेतो परंतु, तज्ज्ञ म्हणतात वारंवार डोकेदुखी आपल्या शरीरासाठी चांगले नाही. डोकेदुखीचा हा त्रास ब्रेन ट्यूमरचे लक्षण असू शकते.(Brain tumor awareness tips) हा आजार वृद्ध लोकांमध्ये वाढत्या वयानुसार पाहायला मिळतो. सुरुवातीला ट्यूमरचा दाब जाणवत नाही त्यामुळे आपण याकडे दुर्लक्ष करतो. (Don't ignore these headache signs)

अनुष्का शर्माने का सोडले गोड पदार्थ, दूध आणि गहू? ती सांगते, त्यानं नेमकं काय बदललं..

ज्यावेळी शरीराचा एखादा बाग अचानकपणे सुन्न होतो, दृष्टी अंधुक होते किंवा बोलण्यात अडचणी येतात तेव्हा ही लक्षणे ब्रेन ट्यूमरची सुरुवातीची असतात. ही लक्षणे वेळीच ओळखल्यावर आपल्या समस्येला सामोरे जाता येता. ब्रेन ट्यूमरची लक्षणे कोणती पाहूया. 

1. ब्रेन ट्यूमरमुळे आपल्या डोक्यातील ओसीपीटल किंवा मेनिन्जेसमध्ये दाब येऊ शकतो. ज्यामुळे आपल्या दृष्टीवर परिणाम होतो. आपल्याला अंधुक दिसू लागते, अशावेळी वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्यायला हवा. 

2. फ्रंटल लोबमध्ये ट्यूमरमुळे व्यक्तीची सतत चिडचिड होते, डोक दुखू लागल्यावर अस्वस्थ वाटते. अचानक गोष्टी विसरायल होतात. तसेच काही कारण नसताना राग येणे, बोलण्याकडे लक्ष न देणे किंवा काही सामान्य गोष्टीमुळे वर्तनात देखील बदल होतो. ही ब्रेन ट्यूमरची लक्षणे असू शकतात. 

3. सेरेबेलमधील ट्यूमर हा आपल्या चालण्यामध्ये व्यत्यय आणू शकतो. ज्यामुळे चालताना चक्कर आल्यासारखे वाटणे, वारंवार अडखळणे किंवा चालण्यास त्रास होऊ शकतो. अचानक डोक्यावर जास्त प्रमाणात ताण येणे ही लक्षणे दिसतात. 

4. ट्यूमरमुळे न्यूरॉन्स अचानक सक्रिय होतात. ज्यामुळे झटका येऊ शकतो. चक्कर येऊन आपण खाली पडू शकतो. उठताना किंवा बसताना सतत गरगरू शकते. 

लांबसडक केसांसाठी घरगुती उपाय! मेथी दाण्याच्या पाण्यात मिसळा २ पदार्थ, मुळापासून होईल केसांची वाढ- फाटेही फुटणार नाही

5. शरीरात सुन्नपणा, अशक्तपणा किंवा शरीराच्या एका बाजूला ताण जाणवत असेल. तोंडाच्या बाजूला मुंग्या येणे, बोलण्यात अडचणी येणे यांसारख्या समस्या असतील तर हे ट्यूमरचे लक्षण आहे. 

6. हळूहळू वाढणाऱ्या ट्यूमरमध्ये सुरुवातीची लक्षणे ही सामान्य असतात. यात आपल्याला थकवा, मळमळ, ऐकू न येणे किंवा दृष्टीची समस्या वाढू शकते. जर ही लक्षणे कोणत्याही कारणाशिवाय बराच काळ जाणवत असतील तर लगेच डॉक्टरांना भेटा. 

टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्स