सर्दी झाली की नाकातून सतत पाणी येणे, नाक बंद होणे आणि नाकात चिकट घाण साचणे असा त्रास अनेकांना होतो. ही साचलेली घाण कोरडी झाली की नाकाच्या आत हुळहुळते, जळजळ होते आणि कधी कधी श्वास घेणेसुद्धा त्रासदायक होते. (Does your hand always go to your nose because of the dirt accumulated in it ? Your nose will not run at all, see what to do)तशीच चिकटून राहिली की हळूहळू सुकते आणि ओढून काढण्याच्या प्रयत्नात कधी रक्तही येते. हा त्रास लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सगळ्यांनाच जाणवतो. वेळेवर योग्य काळजी घेतली नाही तर हा साधा वाटणारा त्रास पुढे सायनस, डोकेदुखी किंवा घशाच्या तक्रारी वाढवू शकतात.
सर्दी झाल्यावर शरीर अधिक प्रमाणात कफ तयार करते. नाकाच्या आतल्या बाजूला सूज येते आणि स्राव घट्ट होऊ लागतो. थंड हवा, धूळ, प्रदूषण किंवा सतत एसीमध्ये राहिल्यामुळे ही घाण अधिक घट्ट होते. पाणी कमी पिणे, शरीर कोरडे पडणे यामुळेही नाकातील स्राव लवकर कोरडा होतो आणि हुळहुळण्याचा त्रास वाढतो.
हा त्रास कमी करण्यासाठी सर्वात सोपा आणि प्रभावी उपाय म्हणजे नाक ओलसर ठेवणे. कोमट पाण्याची वाफ घेतल्याने नाकातील साचलेली घाण मऊ होते आणि सहज बाहेर पडते. दिवसातून एक-दोन वेळा वाफ घेतल्यास नाक मोकळे होते आणि दाहही कमी होतो. नाकाच्या आत कोरडेपणा जास्त जाणवत असेल तर रात्री झोपण्यापूर्वी नाकाच्या कडेला किंवा आत थोडेसे तूप किंवा तीळतेल लावणे उपयुक्त ठरते. यामुळे नाकातील त्वचा मऊ राहते आणि हुळहुळणे कमी होते. सर्दी असताना फार जोरात नाक शिंकरणे टाळावे. कारण त्यामुळे नाकाच्या आतली नाजूक त्वचा दुखावली जाऊ शकते.
सर्दीमुळे नाकात घाण साचू नये यासाठी रोजच्या सवयींमध्ये थोडे बदल करणे गरजेचे आहे. पुरेसे पाणी पिणे अत्यंत महत्त्वाचे आहे. शरीर हायड्रेटेड असेल तर नाकातील घाण घट्ट न होता सहज बाहेर पडते. आहारात कोमट आणि हलके पदार्थ ठेवावेत. गरम सूप, काढे, आले, तुळस यांसारख्या पदार्थांचा उपयोग केल्यास कफ पातळ होतो.
थंड हवा, धूळ आणि प्रदूषण यापासून शक्यतो स्वतःचे संरक्षण करावे. बाहेर जाताना नाकावर रुमाल किंवा मास्क वापरणे फायदेशीर ठरते. एसी किंवा हीटर असलेल्या खोलीत हवा खूप कोरडी असल्यास खोलीत ओलावा राखण्याचा प्रयत्न करावा. सर्दी झाल्यावरही पूर्ण विश्रांती घेणे आणि अंग गरम ठेवणे याकडे दुर्लक्ष करु नये. एकूणच सर्दीमुळे नाकात साचणारी घाण ही सामान्य समस्या असली तरी योग्य काळजी आणि सोपे घरगुती उपाय केल्यास हा त्रास सहज कमी करता येतो. नाक स्वच्छ, ओलसर आणि मोकळे ठेवण्यासाठी रोजच्या जीवनशैलीत केलेले छोटे बदलच मोठा आराम देऊ शकतात.
Web Summary : Cold causing nasal congestion? Steam, hydration, and avoiding irritants help. Apply ghee or sesame oil for dryness. Gentle cleaning and lifestyle adjustments provide relief.
Web Summary : सर्दी में नाक बंद होने पर भाप लें, पानी पिएं और धूल से बचें। घी या तिल का तेल लगाएं। धीरे से सफाई और जीवनशैली में बदलाव से आराम मिलेगा।