'ब्रेसियर' हा महिलांच्या आयुष्यातील न वगळता येणारा अतिशय महत्वाचा असा भाग आहे. महिलांना दररोज ब्रेसियर ही वापरावीच लागते. खरंतरं, ब्रेसियर ही प्रत्येकीच्या स्तनांच्या (Does Wearing Tight Bra Cause Cancer) आकाराप्रमाणेच व्यावस्थित फिटिंगची असली पाहिजे. चुकीच्या फिटिंगची किंवा अतिशय घट्ट अशी ब्रेसियर घातल्याने त्वचेच्या इतर समस्यांबरोबरच, आरोग्याच्या अनेक तक्रारी देखील खूप त्रास देतात. महिलांच्या आरोग्याशी संबंधित (Tight Bra Breast Cancer) अनेक समज-गैरसमजांपैकी एक म्हणजे टाईट ब्रेसियर घातल्याने कॅन्सरचा धोका वाढतो. हा एक असा समज आहे की जो अनेक वर्षांपासून समाजात पसरलेला आहे( tight bra health effects).
अनेकदा महिलांना भीती वाटते की घट्ट ब्रेसियर घातल्याने स्तनाच्या उतींवर (tissues) दाब येतो आणि त्यामुळे कॅन्सरचा धोका वाढू शकतो. टाईट ब्रेसियर घातल्याने कॅन्सरचा धोका वाढतो का, याबद्दल अनेकांमध्ये संभ्रम असतो. पण यामागे काही वैज्ञानिक सत्य आहे का? की ही निव्वळ एक गैरसमजूत आहे? आपण याच प्रश्नाची सखोल माहिती घेणार आहोत. विविध संशोधनांवर आधारित तज्ज्ञांची मते आणि त्यामागील सत्य काय आहे, हे जाणून घेऊया.
अतिशय घट्ट किंवा खूप टाईट ब्रेसियर घातल्याने स्तनांच्या कॅन्सर होतो का ?
टीओआयच्या वृत्तानुसार, काहीजणींना असे वाटते की, टाईट ब्रा घातल्याने स्तनाच्या कर्करोगाचा धोका वाढतो. विशेषत: अंडरवायर ब्रेसियर घातल्याने हा धोका अधिकच वाढतो, तर त्यामुळे ब्रेस्ट कॅन्सरचा धोका अधिक असतो असे मानले जाते. हा गैरसमज १९९० च्या दशकात सुरू झाला १९९५ मध्ये सिडनी रॉस सिंगर आणि सोमा ग्रिस्माजियर यांच्या 'ड्रेस्ड टू किल' या पुस्तकात कोणताही वैज्ञानिक अभ्यास न करता असा अंदाज वर्तवला गेला की ब्रा, विशेषत: अंडरवायर असलेली ब्रा, स्तनांमधील लिम्फॅटिक प्रवाह रोखू शकते. त्यांच्या मते, त्यामुळे टॉक्सिक मटेरियल स्तनाच्या टिश्यूमध्ये अडकते आणि त्यातून ब्रेस्ट कॅन्सर होऊ शकतो. त्यानंतर ही अफवा झपाट्याने पसरली. आजकाल व्हॉट्सअॅप आणि इंस्टाग्राम रील्सवर अशा प्रकारच्या बातम्या दिसतात. मात्र आजपर्यंत असा कोणताही संशोधन अहवाल समोर आलेला नाही, ज्यात टाईट ब्रेसियर घातल्याने ब्रेस्ट कॅन्सर होतो, असे सांगितले आहे. कोणताही डॉक्टर तुम्हाला अशा प्रकारच्या गोष्टी सांगणार नाही. त्यामुळे हा केवळ एक गैरसमज आहे, यात काहीही सत्य नाही.
आंघोळीसाठी थंड पाणी वापरावे की गरम? तज्ज्ञ सांगतात, कोणते पाणी जास्त फायद्याचे...
रिसर्च सांगतो की...
ब्रेसियर घातल्याने कॅन्सर होत नाही. ब्रेसियर टाईट असो, वायर असलेली असो किंवा कुठल्याही प्रकारची असो, तिचा स्तनाच्या कर्करोगाशी काहीही संबंध नाही. अमेरिकन कॅन्सर सोसायटी आणि नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट सारख्या अग्रगण्य संस्था सांगतात की ब्राचा प्रकार, फिट किंवा टाईटनेस यांचा कॅन्सरशी कोणताही वैज्ञानिक संबंध आढळलेला नाही.
पिंपल्स येऊ नयेत म्हणून तमन्ना भाटिया चेहऱ्याला रोज लावते एक विचित्र गोष्ट, पण डॉक्टर म्हणतात...
२०१४ मध्ये सिएटल येथील फ्रेड हचिन्सन कॅन्सर रिसर्च सेंटर येथील संशोधकांनी हा मुद्दा तपासण्यासाठी १५०० महिलांवर एक प्रयोग करून पाहिला. त्यातही टाईट ब्रा आणि कॅन्सर यांचा कोणताही संबंध नसल्याचे आढळले. हा अभ्यास कॅन्सर एपिडेमियोलॉजी, बायोमार्कर्स अँड प्रिव्हेन्शन या जर्नलमध्ये प्रकाशित झाला होता. याशिवाय अमेरिकन कॅन्सर सोसायटी स्पष्ट सांगते, की “असा कोणताही वैज्ञानिकदृष्ट्या मान्य अभ्यास नाही, जो सांगतो की, कुठल्याही प्रकारची ब्रा घालणे हे स्तनाच्या कर्करोगाचे कारण ठरते.”
टाईट ब्रेसियर वापरणे नुकसानदायक कधी ठरते ?
टाईट ब्रेसियर वापरणे नुकसानदायक ठरु शकते. जर टाईट ब्रामुळे तुम्हाला त्रास होत असेल, तर ती वापरणे थांबवा. टाईट ब्रेसियर वापरल्याने जर त्वचेवर लाल रॅशेज, खांद्यांवर खोल खड्डे तयार होत असतील किंवा दररोज ब्रेसियर इलास्टिकमुळे अस्वस्थत वाटत असेल, तर तुमचे शरीर नक्कीच तुम्हाला काहीतरी गंभीरतेचा इशारा देत आहे. फक्त हा इशारा कर्करोगाशी संबंधित नसतो. अशा परिस्थितीत पाठीचा त्रास, चुकीची शारीरिक स्थिती आणि रक्तप्रवाहातील अडथळ्यांची समस्या निर्माण होऊ शकते.