Join us   

रात्रीचं जेवण सोडल्यानं खरंच वजन कमी होतं? तज्ज्ञ सांगतात, नक्की खरं काय.. उपाशी राहाल पण..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2024 1:47 PM

Does skipping dinner help in losing weight : वजन कमी करण्याचे अनेक तर्क वितर्क व्हायरल होतात, लोक सल्ले देतात? पण त्या सल्ल्यात किती तथ्य?

शरीर जरी आपले असले तरी, आपल्याला शरीराबद्दल सगळ्याच गोष्टी ठाऊक असतीलच असे नाही (Lose Weight). सोशल मिडिया असो किंवा डॉक्टरांचे सल्ले (Fitness). आपण अनेकदा आहार किंवा जीवनशैलीबद्दल विविध गोष्टी ऐकत असतो. आता वेट लॉसबद्दलचं बघा ना, वजन कमी करण्यासाठी रात्रीचं जेवण टाळा, भात - चपाती खाणं टाळा, तेलकट पदार्थ खाणं टाळा, यासह अनेक गोष्टी आपण ऐकल्या असतील. पण या सगळ्या गोष्टींमध्ये किती तथ्य आहे? या गोष्टी सोडल्याने खरंच वजन कमी होते का? नक्की खरं काय? याची माहिती डॉक्टर सरीन यांनी दिली आहे(Does skipping dinner help in losing weight).

रात्रीचे जेवण टाळल्याने वजन कमी होते का?

रात्रीचे जेवण टाळण्यापेक्षा वेळेवर जेवण करणे गरजेचं आहे. ओट्स, क्विनोवा यासह महागडे पदार्थ खाण्यापेक्षा आपण बाजरीची भाकरी खाऊनही वजन कमी करू शकता. बाजरीची भाकरी खाल्ल्याने रक्तातील साखरही वाढत नाही. शिवाय यात कॅलरीजचे प्रमाणही कमी असते. ज्यामुळे वेट लॉससाठी पुरेपूर मदत होते.

उन्हाळ्यात दह्यासोबत काय खावे-काय टाळावे? आयुर्वेद तज्ज्ञ सांगतात, रात्री नुसतं दही खाऊच नये कारण..

फास्ट फूड आणि व्यायाम करून वजन कमी होते का?

जर आपण बारीक दिसत असाल तर, याचा अर्थ असा नाही की, तुम्ही बारीक आहात. जर आपण अरबट चरबट किंवा फास्ट फूड खाल तर, साहजिक याचा नकारात्मक परिणाम आरोग्यावर होईल. बऱ्याचदा लोक व्यायामही करतात आणि फास्ट फूडही खातात. पण याने वेट लॉस होणार नाही. त्यामुळे पौष्टीक खा.

लठ्ठपणा अनुवांशिक आहे का?

काहींच्या घरात पिढ्यानपिढ्या लोक लठ्ठपणाच्या समस्येने त्रस्त आहेत. परंतु ज्यांचे नातेवाईक लठ्ठ आहेत, अशा व्यक्तींमध्ये लठ्ठपणा आपोआप विकसित होत नाही. बिघडलेल्या जीवनशैलीमुळेही वजन वाढू शकते. काही लोकांचे आई-वडील लठ्ठ असतात, पण त्यांच्या मुलांचे फास्ट फूड खाऊनही वजन वाढत नाही. त्यामुळे हेल्दी खा. हेल्दी आयुष्य जगा.

घामामुळे शरीराला दुर्गंधी येते? ४ पैकी १ गोष्ट रोज खा; उन्हाळ्यातही परफ्यूमची गरज पडणार नाही..

प्रत्येक तासाला खाणं आरोग्यदायी असतं?

ज्यांना वजन वाढवायचं आहे, त्यांनी प्रत्येक तासाला खायला हवे. परंतु, ज्यांना फिट राहायचं आहे, त्यांनी दर तासाला खाऊन चालणार नाही. आपण दिवसाला दोन किंवा तीन वेळा खाऊ शकता.

टॅग्स : वेट लॉस टिप्सफिटनेस टिप्स