डोळे आपल्या ज्ञानेंद्रियातील महत्त्वाचा अवयव. डोळ्यांचे कमकुवत होणं अनेक समस्यांचे कारण ठरतं. (What is the cause of eye weakness) बदलेल्या जीवनशैलीमुळे स्क्रीनचा वापर वाढला आहे. तसेच चुकीच्या खाण्यापिण्याचा देखील डोळ्यांवर वाईट परिणाम होऊ शकतो. मोबाईल, टीव्ही, लॅपटॉपच्या अतिवापरामुळे डोळे कमकुवत होतात. (warning signs 8 symptoms eyes weakening)
डोळ्यांतून सतत पाणी येणे, धुसर दिसणं किंवा डोळे कोरडे पडणे या गोष्टींकडे आपण दुर्लक्ष करतो. परंतु योग्य वेळी डोळ्यांची काळजी घेतली नाही तर आपल्याला अनेक गंभीर समस्यांना सामोरे जावं लागू शकतं. (eye low vision) यामध्ये अशी अनेक लक्षणं आहेत ज्यामुळे आपले डोळे कमकुवत होतात. जरी हे लक्षण वेळीच ओळखता आली नाही तर आपल्याला दृष्टी वाचवण्यात अपयश येऊ शकते. जाणून घेऊया सामान्य दिसणाऱ्या डोळ्यांच्या या ८ लक्षणांबद्दल.
1. मोबाईल, लॅपटॉप किंवा टीव्ही पाहताना सतत आपले डोकं दुखत असेल तर हे कमकुवत दृष्टीचे लक्षण असू शकते. जेव्हा डोळ्यांवर अधिक ताण येतो तेव्हा डोकेदुखी वाढते. यासाठी दर २० मिनिटांनी स्क्रिन ब्रेक घ्या. नियमितपणे डोळ्यांचे व्यायाम करा.
2. आपले डोळे दिवसभर थकलेले किंवा जड वाटत असतील तर डोळे जास्त थकल्याचे लक्षण आहे. ड्राय आय सिंड्रोमच्या बाबतीत डोळे अधिक कोरडे होतात आणि खाज सुटू लागते. यासाठी वारंवार डोळे धुवा, स्क्रिनवर काम करताना डोळे मिचकवा. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आय ड्रॉप वापरा.
पब्लिक टॉयलेट वापरताय? ४ चुकांमुळे वाढतो युरिन इन्फेक्शनचा धोका, पोटदुखीचा त्रासही अधिक
3. रात्री किंवा अंधारात आपल्याला फोन पाहण्याची सवय असते. त्यामुळे डोळे दुखणं, डोळ्यातून पाणी येणं आणि धुसर दिसणं यासारखी लक्षण दिसतात. याला रातांधळेपणा असेही म्हणतात. ज्यामुळे दृष्टी हळूहळू धुसर होऊ लागते. अशावेळी आहारात गाजर, पालक आणि अंडी खा. डोळ्यांची वेळोवेळी तपासणी करा.
4. आपल्याला धुसर दिसत असेल किंवा डबल दिसत असेल तर डोळ्यांच्या स्नायूंमध्ये कमकुवतपणाचे लक्षण असू शकते. अशावेळी डॉक्टरांचा सल्ला घ्या. डोळे नियमितपणे तपासा.
5. पुस्तक वाचताना किंवा फोनच्या स्क्रिनवरील अक्षरे अस्पष्ट दिसत असतील तर हे दुष्टी कमकुवत असण्याचे लक्षण आहे. त्यासाठी दर अर्ध्या तासाने डोळ्यांना आराम द्या. डोळे तपासून योग्य नंबरचा चश्मा लावा.
6. आपल्याला सूर्यप्रकाश किंवा कारच्या हेडलाइट्समुळे खूप त्रास होत असेल आणि तुमचे डोळे आकुंचन पावू लागतात. त्यामुळे डोळ्यांना कोणत्याही प्रकारचा प्रकाश सहन होत नाही. अशावेळी घराबाहेर पडताना सनग्लासेस लावा. मोबाईल आणि लॅपटॉपचा ब्राइटनेस कमी करा.
7. आपल्या डोळ्यांभोवती काळी वर्तुळे येत असतील किंवा डोळे सतत सुजलेले वाटत असतील तर हे डोळ्यांवर आलेल्या ताणाचे लक्षण आहे. यावेळी आपले डोळे फार थकल्यासारखे वाटू लागतात. त्यामुळे डोळ्यांना अशक्तपणा येतो. त्यासाठी किमान ७ ते ८ तास झोप घ्या. डोळ्यांवर थंड पाण्याची पट्टी किंवा काकडी ठेवा.
8. डोळे सतत लाल होणे, डोळ्यातून पाणी येणं किंवा डोळ्यांची आग होणं ही डोळे कमकुवत असल्याचे लक्षण आहे. डोळ्यांवर आलेल्या थकव्यामुळे ही लक्षण आपल्याला पाहायला मिळतात. डोळ्यांना विश्रांती द्या. स्क्रीन टाइम कमी करा. वेळोवेळी डोळे तपासा.