Join us
Daily Top 2 Weekly Top 5

दही जास्त खाल्ल्याने कॅन्सरचा धोका वाढतो? पाहा रोज किती प्रमाणात दही खावं, आहारात करा छोटासा बदल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2026 13:35 IST

Probiotics and cancer prevention facts: Side effects of excessive curd consumption: दही खाण्याचे नेमके फायदे, कॅन्सरशी त्याचा संबंध आणि दररोज किती प्रमाणात दही खाणे सुरक्षित आहे, याबद्दल जाणून घेऊया.

उन्हाळा सुरु झाला की आपल्यापैकी अनेक लोक दही खाण्यास सुरुवात करतात. अनेक भारतीयांच्या आहाराचा अविभाज्य भाग आहे. उन्हाळ्याच्या दिवसांत तर दह्याशिवाय जेवण पूर्णच होत नाही. पण अलीकडे सोशल मीडियावर 'दही खाल्ल्याने कॅन्सर होतो' किंवा 'दही आणि कॅन्सरचा काय संबंध' अशा अनेक चर्चांना उधाण आले आहे. यामुळे सामान्य लोकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.(Does eating too much curd cause cancer) दही हे आरोग्यासाठी एक 'सुपरफूड' मानले जाते. यामध्ये असलेले प्रोबायोटिक्स आपली पचनसंस्था मजबूत करतात आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात. (Side effects of excessive curd consumption) कॅन्सरसारख्या गंभीर आजाराचा विचार केला, तर अनेक जागतिक संशोधनांनुसार दह्याचे सेवन कॅन्सरचा धोका वाढवण्याऐवजी तो कमी करण्यास मदत करते. पचनमार्गाचे आणि कोलन कॅन्सरचे प्रमाण दह्याच्या नियमित सेवनाने कमी होतात. कोणतेही अन्नपदार्थ खाण्याची एक ठराविक पद्धत आणि वेळ असते. चुकीच्या वेळी किंवा चुकीच्या पदार्थांसोबत दही खाल्ल्यास त्याचे शरीरावर विपरीत परिणाम होऊ शकतात. दही खाण्याचे नेमके फायदे, कॅन्सरशी त्याचा संबंध आणि दररोज किती प्रमाणात दही खाणे सुरक्षित आहे, याबद्दल जाणून घेऊया. 

ब्लाऊजच्या बाह्यांच्या ८ डिझाइन्स पाहा-साध्या साडीचंही पालटतं रुप, लग्नसोहळा ते ऑफिसवेअर-सुंदर मनमोहक कलेक्शन

अमेरिकन कॅन्सर एसोसिएशन रिपोर्टनुसार दह्यामध्ये असलेल्या लॅक्टोबॅसिलससारख्या प्रोबायोटिक्समुळे शरीरातील सूज कमी होते. शरीरातील दीर्घकालीन सूज हे कॅन्सरचे मुख्य कारण असते. दही खाल्ल्यामुळे गुड बॅक्टेरियांची संख्या वाढते, ज्यामुळे कोलन कॅन्सरचा धोका लक्षणीयरीत्या कमी होतो. दही हे अँटी-ऑक्सिडंट्सने समृद्ध असल्याने ते पेशींचे नुकसान होण्यापासून वाचवते. त्यामुळे दही खाल्ल्याने कॅन्सरचा धोका वाढत नाही. 

आपण दिवसातून १ ते २ वाटी म्हणजे साधारण २०० ते २५० ग्रॅम ताजे दही खाणे आरोग्यासाठी पुरेसे आहे. उन्हाळ्यात हे खाण्याचे प्रमाण वाढवले तरी चालते, कारण ते शरीराला थंडावा देते. दही मात्र नेहमी ताजे असावे, जास्त आंबट दही खाल्ल्याने पित्त वाढते. 

अनेकांना जेवणानंतर दही खाण्याची सवय असते. पण आयुर्वेदानुसार दही जेवणासोबत किंवा जेवणाआधी खाणे अधिक फायदेशीर असते. दह्यात साखर घालण्याऐवजी चिमूटभर जिरे पूड किंवा काळे मीठ टाकून खा. यामुळे आपले पचन सुरळीत होईल आणि शरीराला जास्तीत जास्त प्रोबायोटिक्स मिळेल. 

रात्री दही खाल्ल्याने कफ वाढण्याची शक्यचा असते आणि पचन मंदावते. कधीही मासे किंवा गरम पदार्थांसोबत दही खाऊ नका, यामुळे त्वचेचे विकार होऊ शकतात. बाजारात मिळणारे फ्लेवर्ड योगर्ट टाळा. त्यात साखरेचे प्रमाण जास्त असते. घरी बनवलेले साधे दही चांगले असते. दही हा कॅल्शिअम आणि प्रोटीनचा उत्तम स्त्रोत आहे. यामुळे हाडे मजबूत होतात, रक्तदाब नियंत्रित राहतो आणि त्वचेवर नैसर्गिक चमक येते.

English
हिंदी सारांश
Web Title : Does excess curd increase cancer risk? Know the right amount.

Web Summary : Contrary to claims, curd may reduce cancer risk, aiding digestion and immunity. Eat 200-250g daily, preferably with meals, adding cumin or black salt. Avoid at night, with fish, or flavored yogurts. Curd benefits bones, blood pressure, and skin.
टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्सकर्करोग