Join us
Daily Top 2 Weekly Top 5

कमी खाल्लं तर वजन घटतं-कॅन्सर होत नाही-पचनाचे आजार बरे होतात हे खरंय? डॉक्टर सांगतात, तथ्य काय..

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2026 12:58 IST

Meal Eating Tips : जास्त खाल्ल्याने तब्येत सुधारत नाही तर पोटासंबंधी समस्या वाढू लागतात. अशात जाणून घेऊया की, कमी आणि संतुलित आहार घेतल्याने कोणते फायदे मिळतात.

Meal Eating Tips : आजच्या धावपळीच्या जीवनात लोकांच्या खाण्या-पिण्याच्या सवयी खूप बदलल्या आहेत. भूक लागल्यावर लोक काहीही खातात. बऱ्याच लोकांमध्ये असा समज असतो की, जास्त खाल्ल्याने शरीराला जास्त शक्ती मिळते, पण मुळात हा एक मोठा गैरसमज आहे. जास्त खाल्ल्याने तब्येत सुधारत नाही तर पोटासंबंधी समस्या वाढू लागतात. अशात जाणून घेऊया की, कमी आणि संतुलित आहार घेतल्याने कोणते फायदे मिळतात. सोबतच जास्त खाण्याचे नुकसानही पाहूयात.

जास्त खाण्याचे नुकसान भूकेपेक्षा जास्त खाल्ल्याने पोटासंबंधी वेगवेगळ्या समस्या होतात. जास्त खाल्ल्याने पचनाचा स्पीड कमी होतो. पोट आणि पचन तंत्रावर दबाव पडतो. अशात पुन्हा पुन्हा गॅसची समस्या आणि पोटदुखीची समस्या होऊ लागते. डॉक्टर सल्ला देतात की, हलका आणि संतुलित आहार घ्यावा. पण कमी आणि संतुलित खाण्याने मन आणि पोट दोन्ही भरत नाही.

कमी खाण्याचे फायदे

कमी आणि संतुलित आहार घेतल्याने पोट हलकं राहतं आणि अन्न चांगल्या प्रकारे पचतं. पचन तंत्रावर कमी दबाव पडतो आणि गॅस, ब्लोटिं आणि बद्धकोष्ठतेची समस्याही कमी होते. त्यासोबतच शरीराची ऊर्जा वाचते. जड काही खाल्ल्याने आणि जास्त खाल्ल्याने ते पचवण्यासाठी शरीराला जास्त मेहनत करावी लागते. अशात शरीराला सुस्ती आणि लठ्ठपणा या गोष्टींचा सामना करावा लागतो. कमी आणि संतुलित आहार घेतल्याने शरीरात ऊर्जा शिल्लक राहते. तसेच वजन नियंत्रित राहण्यासही मदत मिळते. वजन नियंत्रित राहिल्यास लठ्ठपणा, डायबिटीस आणि हृदयरोगांचा धोकाही कमी होतो.

मेटाबॉलिज्म बूस्ट होतं 

कमी आणि संतुलित आहार घेतल्याने मेटाबॉलिज्म बूस्ट होतं. संशोधनात आढळून आलंय की, कमी आहार घेतल्याने पचन अग्नि वेगाने अन्न पचवते आणि शरीराला पूर्ण पोषण मिळतं.

अ‍ॅसिड रिफ्लक्सचा धोका कमी होतो 

कमी आणि संतुलित आहार घेतल्याने शरीरात सूज आणि अ‍ॅसिड रिफ्लक्सचा धोका कमी होतो. जास्त जड अन्नाने अ‍ॅसिड वेगाने वाढतं आणि पचनासंबंधी समस्या वाढू लागतात. मग प्रश्न हा आहे की, किती खावं?

आयुर्वेदानुसार जेवण कधी आणि कसं करावं? 

आयुर्वेदानुसार पोटाला तीन भागांमध्ये अन्न द्यायला हवं. म्हणजे एक भाग ठोस आणि एक भाग तरल असावा. तर एक भाग रिकामा ठेवला पाहिजे. सामान्य भाषेत नेहमी पोटाला ७० टक्के अन्न दिलं पाहिजे. काही भाग रिकामा ठेवला पाहिजे.

English
हिंदी सारांश
Web Title : Less food, better health? Exploring the truth about stomach problems.

Web Summary : Eating less, balanced meals aids digestion, boosts metabolism, and prevents acidity. Overeating causes digestive issues and fatigue. Ayurveda suggests filling only 70% of the stomach for optimal health and well-being.
टॅग्स : हेल्थ टिप्सअन्न