आपल्यापैकी अनेकांना सकाळ झाली की चहा-कॉफी पिण्याची तल्लफ लागते. गरमागरम चहा किंवा कॉफीशिवाय आपल्या दिवसाची सुरुवात काही होत नाही.(Tea coffee health risks) सकाळचा एक कप चहा, ऑफिसमध्ये दोन-तीन कप, संध्याकाळची मैफल, रात्री थकवा घालवण्यासाठी पुन्हा एक कप. असं करत कळत न कळत आपण गरजेपेक्षा जास्त प्रमाणात चहा- कॉफी पितो.(Cancer risk tea coffee) पण हीच सवय आपल्या आरोग्यासाठी अतिशय घातक ठरु शकते.(Excess tea coffee side effects) हिवाळा सुरु झाला की आपण भरपूर प्रमाणात चहा पितो. पण आपला आवडता गरम चहा आणि कॉफीमुळे आपल्याला कर्करोग जडण्याची शक्यता अधिक असते. (Tea coffee daily consumption)
यूएस नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट आणि लंडन इन्स्टिट्यूट ऑफ कॅन्सर रिसर्चच्या मते जे लोक सकाळचा चहा किंवा कॉफी खूप गरम पितात त्यांना एसोफेजियल स्क्वॅमस सेल कार्सिनोमा (ESCC) नावाच्या विशिष्ट घशाच्या कर्करोगाच्या गंभीर आजाराला सामोरे जावे लागू शकते. ज्यामध्ये प्रामुख्याने अन्ननलिकेचा समावेश जास्त असतो.
ब्रिटिश जर्नल ऑफ कॅन्सरमध्ये प्रकाशित झालेल्या संशोधनात यूके बायोबँक अंतर्गत सुमारे साडेचार लाख लोकांचा १० वर्षाहून अधिक काळ मागोवा घेण्यात आला. संशोधनात असं स्पष्टपणे आढळून आले की खूप गरम पाणी किंवा चहा प्यायाल्याने आपल्या घशावर परिणाम होतो. संशोधक म्हणतात जे लोक दररोज ८ कपांपेक्षा जास्त गरम चहा किंवा कॉफी पितात. त्यांना घशाचा कॅन्सर होण्याची शक्यता ही ५.६४ पटीने जास्त प्रमाणात असते.
खूप गरम पेय प्यायाल्याने अन्ननलिकेवर परिणाम होतो. तज्ज्ञांच्या मते खूप गरम तापमानातील पेय सतत पिण्याने तोंड, अन्ननलिका आणि घशाच्या आतील पेशींना इजा होऊ शकते. यावर वारंवार जखमा झाल्यास त्या भागात सूज येणे, जळजळ वाढणे आणि दीर्घकाळ कॅन्सर होण्याचा धोका देखील वाढतो. कारण कॉफीतील कॅफिन आणि चहातील टॅनिन हे घटक शरीरातील काही पोषक तत्वांचे शोषण कमी करतात.
तज्ज्ञ असंही म्हणतात चहा-कॉफी पूर्णपणे बंद करण्याऐवजी आपण त्याचे प्रमाण आणि तापमान तपासायला हवे. खूप उकळलेला चहा- कॉफी थोडा थंड झाल्यानंतर प्यावा. घोट घेताना जळजळ होत असेल तर चहा-कॉफी पिणे टाळा. दिवसाला २ ते ३ कपांपेक्षा जास्त चहा-कॉफी पिऊ नका.
हिवाळ्यात आपण गरम पेय पिण्याऐवजी कोमट पाणी, हळदीचे दूध, आले- तुळशीचा काढा आणि सूप यांचा आहारात समावेश करु शकतो. हे पर्याय शरीराला उबही देतात आणि आरोग्याला फायदा देखील करतात.
