Is Rock Salt Cause Of Heart Attack: सध्या हेल्दी खाण्याच्या नावाखाली अनेकांनी आपल्या आहारात रॉक सॉल्ट म्हणजेच सैंधव मीठ वापरण्यास सुरुवात केली आहे. सैंधव मीठ आरोग्यासाठी चांगलं मानलं जातं, मात्र दीर्घकाळ आणि जास्त प्रमाणात त्याचं सेवन करणं सुरक्षित आहे का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. कारण मिठामधील खनिजे थेट ब्लड प्रेशर आणि हृदयाच्या आरोग्यावर परिणाम करतात. त्यामुळे सैंधव मिठाचा अतिवापर हृदयासाठी घातक ठरू शकतो का, याबाबत डॉक्टरांचे मत जाणून घेणे महत्त्वाचे आहे.
सैंधव मीठ आणि सामान्य मीठ यामधील फरक
डॉ. बिनय पांडे यांनी एका वेबसाईटला सांगितले की, सर्वप्रथम सैंधव मीठ आणि सामान्य मीठ यातील फरक समजून घेणे गरजेचे आहे. दोन्ही मिठांचा मुख्य घटक सोडियम क्लोराईड हाच असतो. फरक इतकाच की सैंधव मीठ कमी प्रक्रिया केलेलं असत आणि त्यामध्ये पोटॅशिअम, मॅग्नेशिअम, कॅल्शिअम यांसारखी काही खनिजे अत्यंत कमी प्रमाणात असू शकतात. मात्र हे प्रमाण इतकं कमी असतं की त्याचा हृदयाच्या आरोग्यावर कोणताही ठोस परिणाम होत नाही.
सैंधव मिठामुळे हार्ट अॅटॅकचा धोका वाढतो का?
डॉक्टरांच्या मते, हार्ट अॅटॅकचा धोका मिठाच्या प्रकारावर नव्हे, तर एकूण सोडिअम सेवनावर अवलंबून असतो. सैंधव मीठ असो किंवा पांढरे मीठ, जास्त प्रमाणात घेतल्यास ते ब्लड प्रेशर वाढवू शकतं. दीर्घकाळ हाय ब्लड प्रेशर राहिल्यास हार्ट अॅटॅक आणि स्ट्रोकचा धोका वाढतो.
सैंधव मीठ “नैसर्गिक” असल्यामुळे ते कितीही प्रमाणात सुरक्षित आहे, ही एक मोठी गैरसमजूत आहे. शरीर सैंधव मीठ आणि सामान्य मिठातून मिळणाऱ्या सोडिअममध्ये कुठलाही फरक करत नाही. गरजेपेक्षा जास्त सोडिअम शरीरात पाणी साठवतं, हृदयावर ताण वाढवतं आणि रक्तवाहिन्यांना नुकसान पोहोचवू शकते.
हृदयासाठी मीठ किती धोकादायक?
हार्ट अॅटॅकचा धोका सैंधव मिठामुळे नव्हे, तर जास्त मीठ सेवन, प्रोसेस्ड फूडचं अति सेवन, शारीरिक हालचालींचा अभाव, धूम्रपान, मधुमेह, ताणतणाव या घटकांमुळे वाढतो.
सैंधव मीठ स्वतःहून हार्ट अॅटॅकचे कारण ठरत नाही, मात्र तेही मर्यादित प्रमाणातच सेवन करणं आवश्यक आहे. हृदयाच्या चांगल्या आरोग्यासाठी संतुलित आहार, कमी मीठ आणि आरोग्यदायी जीवनशैली सर्वात महत्त्वाची आहे.
Web Summary : Rock salt's excessive consumption may harm the heart, doctors warn. Sodium, not salt type, impacts heart health. Both rock and regular salt raise blood pressure if consumed in excess, increasing heart attack and stroke risks. Moderation and a healthy lifestyle are key.
Web Summary : डॉक्टरों का कहना है कि सेंधा नमक का अत्यधिक सेवन हृदय के लिए हानिकारक हो सकता है। नमक का प्रकार नहीं, बल्कि सोडियम हृदय स्वास्थ्य को प्रभावित करता है। सेंधा और सामान्य नमक दोनों का अधिक सेवन रक्तचाप बढ़ाता है, जिससे दिल के दौरे और स्ट्रोक का खतरा बढ़ जाता है। संयम और स्वस्थ जीवनशैली महत्वपूर्ण हैं।