Join us
Daily Top 2 Weekly Top 5

भारतीयांचे वाढतेय कोलेस्टेरॉल आणि हृदयरोगाचा धोका अनेकांना; डॉक्टरांनी सांगितलं कारण, चुकतंय काय..

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2026 17:19 IST

Why Indians Get Heart Attacks Early: गेल्या काही वर्षात हृदयरोगांच्या केसेसमध्ये धक्कादायक वाढ झाली आहे. आणखी चिंतेची बाब म्हणजे कमी वयाच्या लोकांमध्ये हृदयरोगांचा धोका अधिक वाढत आहे. कारण...

Why Indians Get Heart Attacks Early: जगातील इतर देशांसोबतच भारतात हृदयासंबंधी आजारांचा धोका गंभीर चिंतेचा विषय ठरत आहे. गेल्या काही वर्षात हृदयरोगांच्या केसेसमध्ये धक्कादायक वाढ झाली आहे. आणखी चिंतेची बाब म्हणजे कमी वयाच्या लोकांमध्ये हृदयरोगांचा धोका अधिक वाढत आहे. याचं एक मुख्य कारण नसांमध्ये वाढतं बॅड कोलेस्टेरॉल सांगितलं जातं. कार्डियोलॉजिस्ट सांगतात की, भारतीय लोकांमध्ये हृदयासंबंधी समस्या बॅड कोलेस्टेरॉल लेव्हल कमी असल्यावरही दिसू लागतात. म्हणजे पाश्चिमात्या देशांमध्ये जी बॅड कोलेस्टेरॉल लेव्हल मध्यम मानली जाते, ती भारतात घातक ठरू शकते.

एक्सपर्टचं काय मत?

एक्सपर्ट सांगतात की, यामागे भारतीय जेनेटिकची बनावट एक मुख्य कारण आहे. शरीराची रचना, फॅट आणि शुगर प्रोसेस करण्याची पद्धत, तसेच फॅमिलीकडून मिळालेले काही गुण भारतीयांना कमी वयातच हृदयरोगांप्रति जास्त संवेदनशील बनवते. ही समस्या केवळ खाण्या-पिण्यापर्यंत मर्यादित नाही, तर जीनही यात मोठी भूमिका बजावतात. याच जेनेटिक कारणांमुळे भारतीयांमध्ये धमण्यांमध्ये ब्लॉकेज आणि हृदयारोगांसंबंधी समस्या पाश्चिमात्य देशांच्या तुलनेत साधारण १० वर्षाआधीच विकसित होतात.

लाइफस्टाईलही असते जबाबदार

बॅड कोलेस्टेरॉल वाढण्यासाठी केवळ जेनेटिक्स कारणंच जबाबदार असतात असं नाही. लाइफस्टाईलही हा धोका खूप वाढवतात. हल्ली जंक फूड, फास्ट फूड, गोड पदार्थ आणि जास्त फॅट असलेले पदार्थ अधिक खाल्ले जातात. तसेच कमी शारीरिक हालचाल, वाढता ताण आणि वाढतं वजन हृदयरोगाला कारणीभूत ठरतं. जेव्हा ब्रॅड कोलेस्टेरॉल शरीरात अधिक वाढतं, तेव्हा गुड कोलेस्टेरॉल कमी होतं, ज्यामुळे हार्ट अॅटॅकचा धोका अनेक पटीने वाढतो.

कसा कराल बचाव?

हृदय निरोगी ठेवायचं असेल आणि बॅड कोलेस्टेरॉलचा धोका कमी करायचा असेल तर काही छोट्या छोट्या सवयी बदलू शकता. संतुलित आणि हृदय फिट ठेवणारा आहार घ्या. त्यात भाज्या, कडधान्य आणि लीन प्रोटीनचा समावेश असावा. रोज हलका व्यायाम करा, वॉक करा. प्रोसेस्ड फूड आणि गोड पेय टाळा. वजन नियंत्रित ठेवा आणि तणावही कमी घ्या. या सवयी लावल्या तर बॅड कोलेस्टेरॉल कमी होऊन आणि गुड कोलेस्टेरॉल वाढण्यास मदत मिळेल. ज्यामुळे हृदयरोगांचा धोका कमी केला जाऊ शकतो.

English
हिंदी सारांश
Web Title : Why Indians are prone to cholesterol, heart disease: Doctors explain

Web Summary : Indians face higher heart disease risk due to genetics, lifestyle. Early heart attacks linked to bad cholesterol, even at moderate levels. Diet, exercise, stress management are crucial for prevention.
टॅग्स : हृदयरोगहृदयविकाराचा झटकाआरोग्य