Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > जो तो सांगतो गव्हाची चपाती खाणं बंद करा, पण खरंच गहू त्रासदायक असतो का? डॉक्टर सांगतात..

जो तो सांगतो गव्हाची चपाती खाणं बंद करा, पण खरंच गहू त्रासदायक असतो का? डॉक्टर सांगतात..

Chapati Side Effects : खरंच चपाती बिनधास्त आणि रोज खाणं फायदेशीर असतं का? रोज चपाती खाल्लीच पाहिजे का? पाहूयात यावर एक्सपर्ट काय सांगतात. 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2026 17:25 IST2026-03-05T10:23:25+5:302026-03-05T17:25:21+5:30

Chapati Side Effects : खरंच चपाती बिनधास्त आणि रोज खाणं फायदेशीर असतं का? रोज चपाती खाल्लीच पाहिजे का? पाहूयात यावर एक्सपर्ट काय सांगतात. 

Doctor warns about hidden risks of eating too much wheat chapati | जो तो सांगतो गव्हाची चपाती खाणं बंद करा, पण खरंच गहू त्रासदायक असतो का? डॉक्टर सांगतात..

जो तो सांगतो गव्हाची चपाती खाणं बंद करा, पण खरंच गहू त्रासदायक असतो का? डॉक्टर सांगतात..

Chapati Side Effects : चपाती भारतीय लोकांच्या आहाराचा मुख्य भाग आहे. वेगवेगळ्या भागांमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या चपात्या खाल्ल्या जातात. सामान्यपणे दोन्ही वेळच्या मुख्य जेवणात चपाती असतेच असते. चपाती पचायला हलकी आणि सोपी मानली जाते. यातून शरीराला भरपूर पोषणही मिळतं. भाजी - चपाती खाल्ल्याशिवाय अनेकांचं पोटच भरत नाही. पण खरंच चपाती बिनधास्त खाणं फायदेशीर असतं का? रोज चपाती खाल्लीच पाहिजे का? पाहूयात यावर एक्सपर्ट काय सांगतात. 

काय सांगतात एक्सपर्ट?

ऑर्थोपेडिक आणि आर्थ्रोस्कोपी एक्सपर्ट डॉ. मनु बोरा यांनी इन्स्टाग्रामवर यासंबंधी एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. त्यात ते सांगतात की, गव्हाच्या चपाती नियमित आणि अधिक प्रमाणात खाणं वजन आणि मेटाबॉलिक हेल्थबाबत सतर्क असलेल्या लोकांसाठी नुकसानकारक ठरू शकते. डॉ. बोरा यांच्यानुसार, "आहारात सगळ्यात जास्त नुकसानकारक गव्हाची चपाती असू शकते. जास्त लोक मिठाई रोज खात नाहीत, काही लोक तर अजिबातच खात नाहीत. साखरचं सेवनही सगळ्यांसाठी समानपणे घातक ठरत नाही. पण जे लोक रोज गव्हाची चपाती खातात, त्यांच्यासाठी ही नुकसानकारक ठरू शकते". 

आरोग्यासाठी फायदेशीर का नाही? 

डॉक्टरांचा तर्क आहे की, ज्या गोष्टीला आपण सामान्य आणि सुरक्षित मानतो, ती जर प्रमाणापेक्षा जास्त घेतली गेली तर शरीरावर वाईट प्रभाव करू शकते. खासकरून आजच्या काळात गव्हाचा वापर अनेकदा प्रोसेस्ड किंवा रिफाइंड रूपाने केला जातो. त्यामुळे याचा प्रभाव अधिक वाढू शकतो. डॉ. बोरा सांगतात की, जास्त प्रोसेस्ड गव्हाने बनलेले पदार्थ शरीरात सूज, वजन वाढणे आणि मेटाबॉलिक गडबड यासारख्या समस्या वाढवू शकतात. जर हे मोठ्या प्रमाणात आणि नियमित खाल्ले तर हळूहळू यांचा तब्येतीवर प्रभाव पडतो.


चपाती खाऊच नये का?

याचा अर्थ असा नाही की, चपाती खाणं पूर्णपणे बंद केलं पाहिजे. मुळात हे समजून घेतलं पाहिजे की, प्रमाण आणि गुणवत्ता दोन्ही गोष्टी महत्वाच्या आहेत. धान्याची निवड, योग्य प्रमाणात सेवन आणि संतुलित डाएट फॉलो करणं समजदारी ठरेल. डॉक्टरांनुसार, रोजच्या जेवणात असलेले पदार्थही विचार न करता खाण्याऐवजी समजदारीने निवडा. हेल्दी डाएट म्हणजे केवळ आपण काय खातो हेच नाही तर किती खातो आणि कोणत्या रूपात खातो हे आहे.

Web Title : क्या रोज गेहूं की चपाती खाना हानिकारक है? डॉक्टर बताते हैं

Web Summary : गेहूं की चपाती का नियमित और अधिक सेवन वजन और मेटाबॉलिक स्वास्थ्य के प्रति सतर्क लोगों के लिए हानिकारक हो सकता है। प्रोसेस्ड गेहूं सूजन, वजन बढ़ने और मेटाबॉलिक समस्याओं का कारण बन सकता है। संयम, अनाज का चुनाव और संतुलित आहार जरूरी है।

Web Title : Is Eating Wheat Chapati Daily Harmful? Doctors Share Their Views

Web Summary : Regularly eating wheat chapati in excess may harm those mindful of weight and metabolic health. Processed wheat can cause inflammation, weight gain, and metabolic issues. Moderation, grain selection, and a balanced diet are crucial for health.