Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > 'या' वयात महिलांना असतो Heart Attack चा जास्त धोका, डॉक्टरांनी सांगितलं नेमकं कारण...

'या' वयात महिलांना असतो Heart Attack चा जास्त धोका, डॉक्टरांनी सांगितलं नेमकं कारण...

Heart Problem In Women : चिंतेची बाब म्हणजे हार्ट अ‍ॅटॅक किंवा वेगवेगळ्या हृदय रोगांचा धोका एका वयानंतर अधिक वाढतो. हे वय महिलांमध्ये ४५ ते ५५ दरम्यान मानलं जातं.

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2025 12:03 IST2025-06-10T12:03:23+5:302025-06-10T12:03:50+5:30

Heart Problem In Women : चिंतेची बाब म्हणजे हार्ट अ‍ॅटॅक किंवा वेगवेगळ्या हृदय रोगांचा धोका एका वयानंतर अधिक वाढतो. हे वय महिलांमध्ये ४५ ते ५५ दरम्यान मानलं जातं.

Doctor tells due to this reason the risk of heart attack increases in women | 'या' वयात महिलांना असतो Heart Attack चा जास्त धोका, डॉक्टरांनी सांगितलं नेमकं कारण...

'या' वयात महिलांना असतो Heart Attack चा जास्त धोका, डॉक्टरांनी सांगितलं नेमकं कारण...

Heart Problem In Women : हृदयासंबंधी आजारांच्या केसेस आधी पुरूषांमध्ये अधिक बघायला मिळत असे. पण गेल्या काही वर्षात महिलांमध्ये हार्ट अ‍ॅटॅकच्या केसेस अधिक वाढल्या आहेत. हार्ट अ‍ॅटॅक महिलांमध्ये अकाली मृत्यूचं एक मोठं कारण बनत आहे. चिंतेची बाब म्हणजे हार्ट अ‍ॅटॅक किंवा वेगवेगळ्या हृदय रोगांचा धोका एका वयानंतर अधिक वाढतो. हे वय महिलांमध्ये ४५ ते ५५ दरम्यान मानलं जातं. याच दरम्यान महिलांचा मेनोपॉजशी सामना होतो. याचं एक मोठं कारण म्हणजे याच काळात अ‍ॅस्ट्रोजनचं प्रमाण कमी होतं.

हृदयाचे डॉक्टर उद्गीथ धीर यांनी Indiatv.in सोबत बोलताना सांगितलं की, अ‍ॅस्ट्रोजन हेल्दी कोलेस्टेरॉलची लेव्हल नियंत्रित ठेवण्यास, रक्तवाहिन्या लवचिक ठेवण्यास आणि सूज कमी करण्यास मदत करतं. ज्यामुळे हृदय हेल्दी राहतं. पण मेनोपॉज दरम्यान हे हार्मोन कमी होतं. ज्यामुळे धमण्यांमध्ये प्लाक अधिक जमा होऊ लागतं. 

अ‍ॅस्ट्रोजन हृदय कसं निरोगी ठेवतं?

अ‍ॅस्ट्रोजन मेनोपॉजआधी रक्तवाहिन्या लवचिक ठेवण्यास आणि ब्लड प्रेशर सामान्य ठेवण्यास मदत करतं.

एलडीएल म्हणजेच बॅड कोलेस्टेरॉल कमी करून आणि गुड कोलेस्टेरॉल वाढवण्यास अ‍ॅस्ट्रोजन मदत करतं. धमण्यांवर आलेली सूज कमी करण्यास हे हार्मोन मदत करतं.

मेटाबॉलिज्म बूस्ट करण्यास आणि ब्लड शुगर कंट्रोल करण्यासही हे मदत करतं. पण मेनोपॉजनंतर या हार्मोन्सचे फायदे कमी होऊ लागतात. कारण अ‍ॅस्ट्रोजनचं प्रमाण कमी होतं. याला एथेरोस्क्लेरोसिस म्हणजेच धमण्या आकुंचन पावणे, हाय ब्लड प्रेशर आणि हृदयासंबंधी इतर समस्या होऊ लागतात.

मोनोपॉजनंतर वाढतो या आजारांचा धोका

मेनोपॉजनंतर शरीरात अनेक बदल होऊ लागतात. ज्यामुळे हृदयासंबंधी आजारांचा धोका वाढतो. शरीरात बॅड कोलेस्टेरॉल वाढणं आणि गुड कोलेस्टेरॉल कमी होऊ लागतं. हाय ब्लड प्रेशर आणि अ‍ॅस्ट्रोजनच्या कमतरतेमुळे रक्तवाहिन्या टणक होतात. खासकरून पोटाच्या आजूबाजूला चरबी वाढू लागते. तसेच याच काळात डायबिटीसचा धोका वाढतो. सूज आल्यामुळे धमण्यांमध्ये प्लाक जमा होण्याचा धोका असतो. या सगळ्या गोष्टींमुळे हृदयासंबंधी आजाराचा धोका वाढतो.

महिलांसाठी घातक वय

डॉ. नीलम सूरी यांनी Indiatv.in ला सांगितलं की, जेव्हा एकाच वेळी शरीरात इतके बदल होतात, तेव्हा हृदयामध्ये गंभीर स्थिती निर्माण होते. मेनोपॉजनंतर महिलांमध्ये हाय ब्लड प्रेशरची समस्या अधिक बघायला मिळते. डायबिटीस, लठ्ठपणा, धुम्रपान आणि फॅमिली हिस्ट्रीमुळे हा धोका अधिक वाढतो.

कशी घ्याल हृदयाची काळजी?

महिलांनी वाढत्या वयात आपल्या हृदयाची अधिक काळजी घेतली पाहिजे. यासाठी नियमितपणे तपासणी करा, ब्लड प्रेशर कंट्रोल ठेवा, कोलेस्टेरॉल कंट्रोल ठेवा, पौष्टिक आहार घ्या, नियमितपणे व्यायाम करा आणि तणाव कमी घ्या.

Web Title: Doctor tells due to this reason the risk of heart attack increases in women

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.