Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > धमण्यांमध्ये ब्लॉकेज होऊ न देण्याच्या सोप्या टिप्स, पाहा काय म्हणाले हृदयाचे डॉक्टर

धमण्यांमध्ये ब्लॉकेज होऊ न देण्याच्या सोप्या टिप्स, पाहा काय म्हणाले हृदयाचे डॉक्टर

Tips to Prevent Artery Blockage : जेव्हा धमण्या ब्लॉक होतात किंवा टाइट होतात तेव्हा हार्ट अ‍ॅटॅक आणि स्ट्रोकचा धोका वाढतो. त्यामुळे धमण्या लवचिक ठेवण्यासाठी काही गोष्टींची काळजी घेतली पाहिजे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2025 11:19 IST2025-09-17T11:18:04+5:302025-09-17T11:19:08+5:30

Tips to Prevent Artery Blockage : जेव्हा धमण्या ब्लॉक होतात किंवा टाइट होतात तेव्हा हार्ट अ‍ॅटॅक आणि स्ट्रोकचा धोका वाढतो. त्यामुळे धमण्या लवचिक ठेवण्यासाठी काही गोष्टींची काळजी घेतली पाहिजे.

Doctor shares tips to prevent artery blockage and keep them healthy | धमण्यांमध्ये ब्लॉकेज होऊ न देण्याच्या सोप्या टिप्स, पाहा काय म्हणाले हृदयाचे डॉक्टर

धमण्यांमध्ये ब्लॉकेज होऊ न देण्याच्या सोप्या टिप्स, पाहा काय म्हणाले हृदयाचे डॉक्टर

Tips to Prevent Artery Blockage : हृदयरोगांचा धोका अलिकडे खूप जास्त वाढला आहे. कारण चुकीची लाइफस्टाईल, खाण्या-पिण्याच्या चुकीच्या सवयी, जास्त चिंता आणि शरीराची कमी हालचाल. अशात वेगवेगळ्या हृदयरोगांचा धोका टाळण्यासाठी धमण्यांना हेल्दी ठेवणं खूप गरजेचं असतं. जेव्हा धमण्या ब्लॉक होतात किंवा टाइट होतात तेव्हा हार्ट अ‍ॅटॅक आणि स्ट्रोकचा धोका वाढतो. त्यामुळे धमण्या लवचिक ठेवण्यासाठी काही गोष्टींची काळजी घेतली पाहिजे.

धमण्यांना निरोगी ठेवण्यासाठी काय करता येईल याबाबत कार्डियोलॉजिस्ट डॉ. संजय भोजराज यांनी काही टिप्स दिल्या आहेत. ज्या आपण सहजपणे फॉलो करून धमण्या हेल्दी ठेवू शकतो. 

स्ट्रेंथ ट्रेनिंग

फिट किंवा निरोगी राहण्यासाठी म्हणा किंवा हृदय हेल्दी ठेवण्यासाठी म्हणा सामान्यपणे जास्तीत जास्त लोक कार्डियो म्हणजे धावणं, चालणं किंवा सायकल चालवणं यावर अधिक भर देतात. पण सोबतच वजन उचलणं किंवा बॉडी एक्सरसाईजसारख्या स्ट्रेंथ ट्रेनिंगही तेवढ्याच महत्वाच्या आहेत.

ब्लड शुगर

स्नायू मजबूत असतील तर शरीरात ग्लूकोजचा वापर चांगल्या पद्धतीने होऊ शकतो. ज्यामुळे इन्सुलिन रेजिस्टेंस आणि डायबिटीसचा धोका कमी होतो. डायबिटीसमुळे धमण्यांचं नुकसान होतं. अशात ब्लड शुगर वाढणार नाही याचा विचार करून आहार घ्यावा.

ब्लड प्रेशर कंट्रोल

नियमित व्यायाम केला किंवा स्ट्रेंथ ट्रेनिंग केलं तर ब्लड प्रेशर कंट्रोल ठेवण्यास मदत मिळते. हाय ब्लड प्रेशरमुळे धमण्यांवरचा दबाव वाढतो. ज्यामुळे त्या कमजोर होतात आणि त्यांच्यातील लवचिकता कमी होते.

ओमेगा-3 फॅटी अ‍ॅसिड

आपल्या शरीराला वेगवेगळे व्हिटामिन्स आणि मिनरल्ससोबतच गुड फॅटची गरज असते. ओमेगा 3 फॅटी अ‍ॅसिड त्यात सगळ्यात बेस्ट मानलं जातं. अशात याचा आहारात नियमितपणे समावेश असायला हवा. कारण यानं शरीरातील सूज कमी होऊन धमण्या मोकळ्या होतात. तसेच यानं कोलेस्टेरॉल सुद्धा रक्तवाहिन्यांमध्ये जमा होत नाही. ओमेगा 3 फॅटी अ‍ॅसिड मिळवण्यासाठी अक्रोड, चिया सीड्स, अळशीच्या बियांचा आहारात समावेश करा.

स्ट्रेस मॅनेजमेंट

आजकाल कामाचा ताण, वेगवेगळ्या जबाबदाऱ्या यामुळे तणाव, चिंता खूप जास्त असते. अशात तणाव, चिंता कमी ठेवण्यावर भर दिला पाहिजे. यासाठी रोज रात्री किमान 7 ते 8 तासांची झोप घ्यावी. तसेच दिवसातून एकदा मेडिटेशन करावं. वॉक आणि डीप  ब्रीदिंग एक्सरसाईज करा.

Web Title: Doctor shares tips to prevent artery blockage and keep them healthy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.