Join us

Heart Attack टाळायचा असेल तर रोज खा स्वयंपाकघरातला ‘हा’ पदार्थ, कमी होईल कोलेस्टेरॉल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2025 16:25 IST

How To Reduce Cholesterol : शरीरात जमा झालेल्या कोलेस्टेरॉलमुळे रक्तवाहिन्या ब्लॉक होतात आणि त्यामुळे शरीरात सगळीकडे रक्त पुरवठा सरळीत होत नाही. याच कारणानं हार्ट अ‍ॅटॅकचा धोका वाढतो. 

How To Reduce Cholesterol : खाण्या-पिण्याच्या चुकीच्या सवयी आणि बदलती लाइफस्टाईल म्हणजे एका जागी जास्त वेळ बसून काम करणे, शरीराची जास्त हालचाल न करणे, फास्ट फूड खाणे यामुळे लोकांच्या शरीरात हाय कोलेस्टेरॉल खूप वाढत आहे. ज्यामुळे हार्ट अ‍ॅटॅक आणि स्ट्रोकचा धोका वाढतो. शरीरात जमा झालेल्या कोलेस्टेरॉलमुळे रक्तवाहिन्या ब्लॉक होतात आणि त्यामुळे शरीरात सगळीकडे रक्त पुरवठा सरळीत होत नाही. याच कारणानं हार्ट अ‍ॅटॅकचा धोका वाढतो. 

कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी लोक वेगवेगळी औषधं घेतात. पण अनेकांना हे माहीत नसतं की, आपल्या किचनमध्येच अशा काही गोष्टी असतात, ज्या वाढलेलं कोलेस्टेरॉल कमी करण्यास मदत करतात. औषधं जास्त घेतली तर साइड इफेक्टही होऊ शकतात. अशात किचनमधील एक खास मसाला वापरून तुम्ही कोलेस्टेरॉल शरीरातून बाहेर काढू शकता. याच खास मसाल्याबाबत डॉक्टर सलीम जैदी यांनी माहिती दिली आहे.

डॉक्टरांनुसार कोलेस्टेरॉल कमी करणारा हा खास मसाला म्हणजे दुसरं काही नाही तर आलं आहे. आल्याच्या मदतीनं तुम्ही शरीरात वाढलेलं कोलेस्टेरॉल बाहेर काढून हार्ट अ‍ॅटॅक, स्ट्रोक आणि पोटासंबंधी अनेक समस्या दूर करू शकता. फक्त याचा वापर कसा करावा हे जाणून घेणं महत्वाचं ठरतं. 

कोलेस्टेरॉल कमी करतं आलं

डॉक्टरांनुसार, गॅस, ब्लोटिंग आणि अपचन अशा समस्या होणं आजकाल फारच कॉमन झालं आहे. कारण खाण्या-पिण्याच्या सवयी बदलल्या आहेत. जर तुम्हाला या समस्या दूर करायच्या असतील आणि सोबतच शरीरात वाढलेलं कोलेस्टेरॉल कमी करायचं असेल, तसेच हार्ट अॅटॅकचा धोका टाळायचा असेल तर आलं तुम्हाला मदत करू शकतं.

धमण्यांना करतं साफ

जगभरात हृदयरोगांमुळे दरवर्षी कोट्यावधी लोकांचा जीव जातो. यात हाय कोलेस्टेरॉल ही सगळ्यात मोठी समस्या आहे. कोलेस्टेरॉलमुळे नसा ब्लॉक होतात आणि शरीरातील रक्त पुरवठा अडथळीत होतो. ज्यामुळे हार्ट अ‍ॅटॅक येतो. अशात नसांमधून कोलेस्टेरॉल बाहेर काढण्यासाठी आलं तुमची मदत करतं.

आलं खाण्याची योग्य पद्धत

आलं तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीनं खाऊ शकता. आलं तुम्ही कच्च खाऊ शकता, शिजवून खाऊ शकता, पावडरच्या रूपातही खाऊ शकता. यातील सगळ्यात फायदेशीर पद्धत म्हणजे कच्चं आलं खाणे. आल्याचा एक कच्चा तुकडा घ्या, त्याची साल काढा आणि बारीक करा. अर्धा चमचा आलं जेवणावर वरून टाका किंवा जेवणासोबतच छोटे छोटे तुकडे खाऊ शकता. यानं तुम्हाला अधिक फायदा मिळेल.

उन्हाळ्यात आलं सेफ की नाही?

बरेच लोक असा विचार करतात की, उन्हाळ्यात आलं खाणं नुकसानकारक ठरू शकतं. पण जर तुम्ही ते योग्य प्रमाणात आणि योग्य पद्धतीनं खाल तर या दिवसातही पूर्णपणे सुरक्षित आहे. फक्त दिवसातून अर्ध्या चमच्यापेक्षा जास्त कच्चं आलं खाऊ नये. जर तुम्हाला काही आजार असेल किंवा औषधं घेत असाल तर आलं खाण्याआधी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

टॅग्स : हृदयरोगहृदयविकाराचा झटकाहेल्थ टिप्स