Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > पोटऱ्या दुखतात, गोळा येतो पोटरीत? जाड- फुगलेल्या पोटऱ्या कमी करण्याचा उपाय-दुखणे छूमंतर

पोटऱ्या दुखतात, गोळा येतो पोटरीत? जाड- फुगलेल्या पोटऱ्या कमी करण्याचा उपाय-दुखणे छूमंतर

Do your legs hurt? Reduce thick, swollen the calf of the leg, see this very simple solution, the pain will be relieved, health tips : पोटरी दुखत असेल तर करा हे उपाय. पाहा नक्की का होतो हा त्रास. पोटरीतील वेदना कमी करा.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2025 16:49 IST2025-06-29T12:14:36+5:302025-06-30T16:49:31+5:30

Do your legs hurt? Reduce thick, swollen the calf of the leg, see this very simple solution, the pain will be relieved, health tips : पोटरी दुखत असेल तर करा हे उपाय. पाहा नक्की का होतो हा त्रास. पोटरीतील वेदना कमी करा.

Do your legs hurt? Reduce thick, swollen the calf of the leg, see this very simple solution, the pain will be relieved, health tips | पोटऱ्या दुखतात, गोळा येतो पोटरीत? जाड- फुगलेल्या पोटऱ्या कमी करण्याचा उपाय-दुखणे छूमंतर

पोटऱ्या दुखतात, गोळा येतो पोटरीत? जाड- फुगलेल्या पोटऱ्या कमी करण्याचा उपाय-दुखणे छूमंतर

दिवसभर काम केल्यानंतर महिलांच्या शरीराचा प्रत्येक अवयव दुखतो. ऑफीसचे काम, घरचे काम, मुलांची काळजी, घरच्यांची काळजी, धुणी भांडी या सगळ्या गोष्टीत वेळ कधी निघून जातो कळतही नाही. (Do your legs hurt? Reduce thick, swollen the calf of the leg, see this very simple solution, the pain will be relieved, health tips)मात्र जरा अंग टेकलं की दिवसभराची धावपळ शरीराला जाणवते. हात, पाय, डोकं बोलायला लागते. पायाला त्रास जरा जास्त जाणवतो. दिवसभर उभ्याने काम करणार्‍यांसाठी तर पायाची काळजी घेणे फार गरजेचे असते. तळवा, मांडी आणि पोटरी सारेच दुखते. तुमचीही पोटरी सारखी दुखते का? 

 

आजच्या धावपळीच्या जीवनात असे पोटऱ्या दुखणे, ही अगदीच सामान्य तक्रार झाली आहे. अनेकांना हा त्रास होतो. अनेक वेळा या त्रासाकडे दुर्लक्ष केले जाते. खास म्हणजे महिलांकडून. महिला अशा त्रासांकडे कधीच फार लक्ष देत नाहीत. दुसर्‍यांची लाख काळजी घेतात, मात्र स्वत:ची नाही. पोटऱ्या नक्की का दुखतात. त्यामागे नेमकी कोमती असतात हे समजून घेणे आणि योग्य उपाय करणे आवश्यक आहे. याचबरोबर, पोटऱ्यांची चरबी कमी करणे आरोग्यासाठी महत्त्वाचे ठरते.

कोणत्याही गोष्टीचा अतिरेक चांगला नाही. मग वजन जास्त वाईट तसेच अति व्यायामही वाईटच. काही जणांचे वजन त्याच्या पायांना पेलवत नाही. त्यामुळे पोटरीवर ताण येतो. स्नायूंना त्रास झाला की पोटऱ्या दुखतात. त्याविरुद्ध काही जण फिटनेस फ्रिक असतात. ते व्यायाम जरा प्रमाणापेक्षा जास्त करतात. शरीराला क्षमतेपेक्षा जास्त व्यायाम करायला लागला तरी पोटऱ्यांवर ताण येतो. उपाय अगदी सोपा आहे. व्यायाम प्रमाणात करा आणि वजन फार जास्त असेल तर ते कमी करा. 

पायाच्या दिशेने रक्ताभिसरण व्यवस्थित होत नसेल तरी पोटऱ्यांवर ताण येतो. शरीरात पाण्याची आणि इलेक्ट्रोलाइट्सची कमतरता असल्यास स्नायू आखडतात. त्यामुळे वेदना जाणवतात. शरीरातील पोटॅशियम, कॅल्शियम आणि मॅग्नेशियम कमी झाल्यास पोटऱ्यांमध्ये कळ जाते. सतत उभं राहून काम करणाऱ्यांच्या पोटऱ्या फार थकतात. त्यामुळेही वेदना वाढतात. गरम पाण्याचा शेक घेणे हा सर्वोत्तम उपाय आहे. सायकलिंग करा. पोटऱ्या मजबूत होतात.

पोटऱ्याची अतिरिक्त चरबी कमी करण्यासाठी कार्डिओ व्यायाम करा. तसेच धावणे, चालणे, झुंबा, स्क्वॉट्स मारणे बैठका मारणे, असे व्यायाम करा. सायकल चालवा. पोटऱ्यांसाठी सगळ्यात मस्त व्यायाम म्हणजे सायकल चालवणे. पायाला तेलाने मालीश करायचे. त्यामुळे स्नायू मोकळे होतात.

Web Title: Do your legs hurt? Reduce thick, swollen the calf of the leg, see this very simple solution, the pain will be relieved, health tips

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.