गुडघेदुखीचा त्रास आजकाल फक्त वयोवृद्धांपुरता मर्यादित राहिलेला नाही. तरुणांपासून मध्यमवयीन आणि ज्येष्ठांपर्यंत अनेक जण या समस्येला सामोरे जातात. गुडघा हा शरीरातील महत्त्वाचा सांधा असल्याने चालणे, जिने चढणे-उतरणे, बसणे-उठणे अशा रोजच्या हालचालींवर त्याचा थेट परिणाम होतो. त्यामुळे गुडघेदुखीची कारणे समजून घेऊन योग्य काळजी घेणे गरजेचे आहे.
गुडघेदुखीची कारणे विविध असू शकतात. वयानुसार सांध्यांतील कूर्चा (cartilage) झिजू लागतो आणि त्यामुळे ऑस्टिओआर्थरायटिसचा त्रास होऊ शकतो. जास्त वजन असल्यास गुडघ्यांवर अतिरिक्त ताण येतो आणि वेदना वाढतात. दीर्घकाळ उभे राहणे, चुकीच्या पद्धतीने बसणे, व्यायामाचा अभाव किंवा अचानक जास्त व्यायाम करणे यामुळेही वेदना होतात. कॅल्शियम व व्हिटॅमिन डीची कमतरता, जुन्या दुखापती, लिगामेंट इजा किंवा सूज ही देखील कारणे असू शकतात.
घरच्या घरी काही सोपे उपाय केल्याने गुडघेदुखीवर आराम मिळू शकतो. सर्वात आधी गरम शेक किंवा कोमट पाण्याची पट्टी उपयोगी ठरते. हलक्या सूजेसाठी बर्फाचा शेक घ्यावा, तर जुन्या दुखण्यासाठी गरम शेक फायदेशीर ठरतो. दिवसातून १० ते १५ मिनिटे शेकल्यास स्नायूंना आराम मिळतो.
हळद आणि दूध हा पारंपरिक उपायही उपयुक्त आहे. हळदीत दाह कमी करणारे गुणधर्म असतात. रात्री झोपण्यापूर्वी कोमट दुधात अर्धा चमचा हळद घालून घेतल्यास सूज आणि वेदना कमी होण्यास मदत होते. तसेच आलं आणि लसूण यांचा आहारात समावेश केल्यानेही दाह कमी होतो.
तीळाचे तेल किंवा नारळाच्या तेलाने हलका मसाज केल्यास रक्ताभिसरण सुधारते आणि सांध्यांतील कडकपणा कमी होतो. मसाज करताना फार दाब देऊ नये. नियमित हलका व्यायाम, जसे की चालणे, सायकलिंग किंवा पोहणे, यामुळे गुडघ्याभोवतीचे स्नायू मजबूत होतात आणि वेदना कमी होतात. मात्र तीव्र वेदना असल्यास तज्ज्ञांचा सल्ला घेऊनच व्यायाम सुरु करावा.
वजन नियंत्रणात ठेवणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे. प्रत्येक अतिरिक्त किलो वजनामुळे गुडघ्यांवर अधिक ताण येतो. संतुलित आहार, कॅल्शियमयुक्त पदार्थ जसे दूध, दही, तीळ, बदाम आणि पुरेसा सूर्यप्रकाश यामुळे हाडे मजबूत राहतात. नीकॅप वापरणे आरामदायी आणि फायदेशीर ठरते. चालताना बसताना होणाऱ्या वेदना कमी होतात. मात्र त्रास जास्त दिवस राहीला तर तज्ज्ञांकडे जाणे गरजेचे असते.
Web Summary : Knee pain affects all ages. Causes include cartilage wear, excess weight, and lack of exercise. Home remedies like hot/cold packs, turmeric milk, massage, and light exercise can provide relief. Maintain a healthy weight and get enough calcium.
Web Summary : घुटनों का दर्द सभी उम्र के लोगों को प्रभावित करता है। कारणों में उपास्थि का घिसना, अधिक वजन और व्यायाम की कमी शामिल हैं। गर्म/ठंडी सिकाई, हल्दी दूध, मालिश और हल्का व्यायाम जैसे घरेलू उपचार से राहत मिल सकती है। स्वस्थ वजन बनाए रखें और पर्याप्त कैल्शियम लें।