गुडघेदुखी हा आजकाल वाढता त्रास झाला आहे. पूर्वी हा त्रास वयानुसार वाढत जायचा, पण आता कमी हालचाल, जास्त बसून राहणे, वजन वाढणे आणि चुकीच्या सवयींमुळे तरुणांनाही हा त्रास होतो. गुडघेदुखीमुळे चालणे, पायऱ्या चढणे, अगदी दैनंदिन कामातही त्रास होतो. त्यामुळे त्यामागची कारणे आणि घरगुती उपाय जाणून घेणे गरजेचे आहे.
गुडघेदुखी वाढण्यामागे अनेक कारणे असतात. सर्वात सामान्य म्हणजे सांध्यांची झीज (ऑस्टिओआर्थ्रायटिस). वयानुसार हाडांची चांगलीच झिज होते आणि घर्षणामुळे वेदना निर्माण होतात. वजन वाढलेले असणे हेही एक मोठे कारण आहे. (Do your knees hurt? Before taking the pills, see what's wrong, do these 4 simple remedies, you will definitely get relief)जास्त वजन गुडघ्यांवर अधिक ताण देते. शरीरात जर कॅल्शियम आणि जीवनसत्व डी ची कमतरता असेल तर गुडघे नक्कीच दुखतात. तसेच कधी काही गंभीर इजा झाले असेल तर ती थंड वातावरणात वाढते. बराच वेळ उभे राहणे, जास्त वेळा पायऱ्या चढणे किंवा बसून काम करणे हे ही गुडघ्यांना त्रासदायक ठरते. हे काही सोपे उपाय करुन पाहा.
१. गरम पाण्याचा शेक: दिवसातून काही मिनिटे गुडघ्यांना गरम पाण्याचा शेक दिल्यास स्नायूंना आराम मिळतो, रक्ताभिसरण सुधारते आणि वेदना कमी होते. जर सूज असेल तर थंड शेकही देता येतो. त्याचाही फायदाच होतो. आजकाल गरम पाणीच वापरावे लागते असे काही नाही. इतरही अनेक उपाय असतात.
२. तेलाने मालीश: साजूक तूप, तीळाचे तेल किंवा खोबरेल तेल हलके गरम करुन गुडघ्यांवर गोलाकार फिरवत मालीश केल्यास सांधे मऊ राहतात आणि वेदना कमी होते. रात्री झोपण्यापूर्वी हा उपाय करणे नक्कीच फायदेशीर ठरते.
३. गरम पाण्यात मीठ घालून पाय बुडवणे: एका बादलीत कोमट पाणी घ्यायचे. त्यात एक चमचा मीठ घालून त्यात पाय बुडवायचे. चंबूने गुडघ्यावर पाणी ओतत राहा. यामुळे सूज कमी होते आणि वेदना कमी होतात. मीठ वेदना कमी करते.
४. आहार आणि व्यायाम: हळदीचे दूध, तीळ, बदाम, हिरव्या भाज्या आणि दूध यांचा आहारात समावेश करा. वजन नियंत्रणात ठेवा आणि दररोज हलके स्ट्रेचिंग किंवा योगाभ्यास करा. जसे ताडासन, त्रिकोणासन किंवा पवनमुक्तासन.