Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > रोज सकाळी जाग यायला उशीर होतो? करा हे उपाय सुस्ती गायब होईल ५ मिनिटांत

रोज सकाळी जाग यायला उशीर होतो? करा हे उपाय सुस्ती गायब होईल ५ मिनिटांत

Do you wake up lazy every morning? Do this remedy and dullness will disappear in 5 minutes : सकाळी झोपेतून उठल्यावर करा हे उपाय. राहा फ्रेश दिवसभर.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2026 09:05 IST2026-04-01T09:00:05+5:302026-04-01T09:05:02+5:30

Do you wake up lazy every morning? Do this remedy and dullness will disappear in 5 minutes : सकाळी झोपेतून उठल्यावर करा हे उपाय. राहा फ्रेश दिवसभर.

Do you wake up lazy every morning? Do this remedy and dullness will disappear in 5 minutes | रोज सकाळी जाग यायला उशीर होतो? करा हे उपाय सुस्ती गायब होईल ५ मिनिटांत

रोज सकाळी जाग यायला उशीर होतो? करा हे उपाय सुस्ती गायब होईल ५ मिनिटांत

सकाळी झोपेतून उठताना थोडा थकवा आणि आळस जाणवणे अगदी सामान्य आहे, मात्र दिवसाची सुरवात करण्याची इच्छाच होत नसेल आणि सुस्ती जाता जात नसेल तर मग चिडचिड होते. उठल्यावर अंग जड वाटणे, डोळे उघडायला त्रास होणे किंवा काम करण्याची इच्छा न होणे, ही लक्षणे शरीर आणि मन पूर्णपणे सक्रिय न झाल्याचे संकेत असतात. झोपायची चुकीची पद्धत, अपुरी झोप, उशिरापर्यंत मोबाइल वापरणे किंवा अनियमित दिनचर्या ही यामागची प्रमुख कारणे असू शकतात.

ही सकाळची सुस्ती दूर करण्यासाठी काही सोपे आणि प्रभावी उपाय करता येतात. सर्वात महत्त्वाचे म्हणजे रात्रीची झोप व्यवस्थित आणि पुरेशी असणे गरजेचे आहे. दररोज ठराविक वेळी झोपणे आणि उठणे यामुळे शरीराला शिस्त लागते आणि सकाळी वेळेवर जाग येणं सोपं जातं. झोपण्याआधी मोबाइल, टीव्ही यांचा वापर कमी केल्यास झोपेची गुणवत्ता सुधारते.

झोपेतून उठल्यावर लगेच बेडवर पडून राहू नये. हळूहळू उठून थोडं चालणं, अंग ताणून स्ट्रेचिंग करणं यामुळे शरीरातील रक्ताभिसरण वाढतं आणि सुस्ती कमी होते. सकाळी ताज्या हवेत काही वेळ घालवणे किंवा खिडकी उघडून सूर्यप्रकाश घेणे देखील शरीराला जागं करण्यासाठी मदत करतं. चेहऱ्यावर गारेगार पाणी मारा. त्यामुळे झोप उडते आणि हातापायातही जोर येतो. 

सकाळी उठल्यानंतर कोमट पाणी पिणे हा एक चांगला उपाय आहे. त्यामुळे शरीरातील मेटाबॉलिझम सुरू होतो आणि शरीर अधिक सक्रिय वाटू लागते. काही वेळा फारच आळस असेल तर हलका व्यायाम, योगा किंवा प्राणायाम केल्यानेही शरीर आणि मन दोन्ही ताजेतवाने होतात. 

नाश्ता टाळू नये, कारण सकाळचा आहार शरीराला आवश्यक ऊर्जा देतो. पौष्टिक आणि हलका नाश्ता घेतल्यास दिवसभर उत्साह टिकून राहतो. तसेच, दिवसभर पुरेसं पाणी पिणेही आवश्यक आहे, कारण शरीरातील पाण्याची कमतरता असल्यासही थकवा आणि सुस्ती वाढू शकते. याशिवाय, सकाळी एखादं आवडतं काम करणं, जसं की संगीत ऐकणं किंवा थोडं वाचन करणं, यामुळे मन प्रसन्न होतं आणि दिवसाची सुरुवात सकारात्मक होते.

एकूणच, नियमित दिनचर्या, चांगली झोप आणि सकाळी केलेल्या छोट्या सवयींमुळे उठल्यावर येणारी सुस्ती सहज दूर करता येते. शरीर आणि मन दोन्ही सक्रिय ठेवल्यास दिवस अधिक ऊर्जादायी आणि आनंदी जाऊ शकतो.

Web Title : देर से जागते हैं? सुबह की सुस्ती को 5 मिनट में दूर करें!

Web Summary : अच्छी नींद, स्ट्रेचिंग, धूप और स्वस्थ दिनचर्या से सुबह की सुस्ती दूर करें। पानी पिएं, पौष्टिक नाश्ता करें और ऊर्जावान शुरुआत के लिए हल्का व्यायाम करें।

Web Title : Wake up late? Banish morning sluggishness in 5 minutes!

Web Summary : Fight morning sluggishness with good sleep, stretching, sunlight, and a healthy routine. Drink water, eat a nutritious breakfast, and do light exercise for an energetic start.