Join us

कानात मळ झाला म्हणून कान कोरता? बहिरे व्हाल, पाहा कान साफ करण्याची योग्य पद्धत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2025 16:06 IST

Do you use sharp things to clean ear ? never make such mistakes see how to clean ear wax at home : कानातला मळ कितीही वाढला आणि खाज सुटली तरी चुकूनही करु नका हे उपाय. पाहा कानातला मळ साफ करण्याची योग्य पद्धत.

काही अगदी सामान्य समस्यांपैकी एक म्हणजे कानात साचणारा मळ. कानात एकदा का मळ साचला की अस्वस्थ व्हायला होतं. कान साफ करायला मग विविध नको ते उपाय घरच्या घरी केले जातात. (Do you use sharp things to clean ear ? never make such mistakes see how to clean ear wax at home.)आपल्याला ते उपाय अगदी योग्य वाटतात. कानात पिन टाकली किंवा अगरबत्तीची काडी टाकली की कानाला जरा आराम मिळतो. खाजवल्यावर बरं वाटतं. त्यामुळे लोकं असे उपाय करतात. मात्र त्यामुळे कानाला सेफ्टिक होऊन कानाला आतून दुखापत होते. त्यामुळे कान साफ करण्यासाठी असे उपाय करु नका. पाहा कान साफ करण्यासाठी काय कराल.  

१. कान घरीच सुरक्षितपणे साफ करताना काही गोष्टी पाळल्यास श्रवणेंद्रियाला इजा न होता कान निरोगी ठेवता येतात. कानात जास्त मळ साठल्यास त्यासाठी मऊ कापसाच्या बोळ्याने किंवा स्वच्छ कापडाने बाहेरचा भाग हलक्या हाताने पुसायचा. पण कानाच्या आत खोलवर काहीही टाकू नये. कापूस बर्ड्स काहीच नाही. हलक्या कोमट पाण्याने कानाभोवती स्वच्छता करता येते. 

२. तसेच ओलसर कपड्याने बाहेरील भाग पुसून कोरडा करायचा. जर कान मळ खूप साठलेला असेल तर घरच्या घरी साधे तेल कानात टाकायचे. दोन ते चार थेंब तेल कानात टाकायचे. ते जिरु द्यायचे. मग बोटाच्या मदतीने पातळ असा फडका कानातून फिरवून साफ करायचा. 

३. कानात मॅचस्टिक, हेअरपिन, टूथपिक, चावी किंवा तीक्ष्ण कोमतीही वस्तू कधीही घालू नयेत. हा प्रकार सगळे बिनधास्त करतात. असं केल्यावर तात्पुरतं समाधान मिळतं. मात्र कायम स्वरुपी दुखापत होऊ शकते. त्यामुळे कानाच्या पडद्याला इजा होऊ शकते आणि श्रवणशक्तीवर परिणाम होऊ शकतो. 

४. कानात कापसाचे बोळे अनेक जण घालतात.  कापसाचे खूप बारीक बोळे आत खोलवर घालणे टाळावे कारण त्यामुळे मळ आणखी आत ढकलला जाऊ शकतो. कानात सतत खाज, वेदना किंवा मळ जास्त प्रमाणात जमा होत असल्यास घरच्या उपायांपेक्षा डॉक्टरांचा सल्ला घेणे अधिक योग्य ठरते.

टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्सहोम रेमेडी