Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > एसी वापरता? मग हे माहिती असायलाच हवे, आरोग्यासाठी फार महत्वाचे नियम

एसी वापरता? मग हे माहिती असायलाच हवे, आरोग्यासाठी फार महत्वाचे नियम

Do you use AC? Then you must know these very important rules for health : एसी वापरताना या काही गोष्टी लक्षात ठेवा. शरीराला त्रास नाही होणार.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2025 08:45 IST2025-04-26T08:40:49+5:302025-04-26T08:45:01+5:30

Do you use AC? Then you must know these very important rules for health : एसी वापरताना या काही गोष्टी लक्षात ठेवा. शरीराला त्रास नाही होणार.

Do you use AC? Then you must know these very important rules for health | एसी वापरता? मग हे माहिती असायलाच हवे, आरोग्यासाठी फार महत्वाचे नियम

एसी वापरता? मग हे माहिती असायलाच हवे, आरोग्यासाठी फार महत्वाचे नियम

तंत्रज्ञानाबरोबर अनेक गोष्टी बदलल्या आहेत. (Do you use AC? Then you must know these very important rules for health)स्वयंपाकघरातील काम ते घराची साफसफाई सगळ्याच कामांसाठी आजकाल आपण विविध यंत्र वापरतो. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये एक अशी वस्तू आहे ज्याशिवाय आपण राहूच शकत नाही. ती वस्तू म्हणजे पंखा. (Do you use AC? Then you must know these very important rules for health)वातावरण इतके गरम असते की पंखाही गरम हवाच सोडतो. काही ठराविक लोकांकडे एअर कंडीश्नर असायचा. ज्याला आपण एसी म्हणतो.  मात्र आता एसी अगदी कॉमन गोष्ट आहे.

जर घरी एसी नसेल तर ऑफीसमध्ये असतोच. मस्त गार हवा एसीमुळे मिळते. बाहेर कडक गरम उन असताना एसी खोलीमध्ये बसल्यावर थंडी वाजते. फक्त घरी किंवा ऑफीसमध्ये नाही तर दुकानांमध्ये, बसमध्ये, रेलवेमध्ये इतरही ठिकाणी आता एसी असतो. न्यूज मेडिकल तसेच वेबएमडी या साईट्सवर उपलब्ध असलेली माहिती वाचल्यावर, छान थंडावा देणारा हा एसी नक्की शरीरासाठी चांगला असतो का? असा प्रश्न पडतो.

ऑफीसमध्ये आपण दिवसभर एसीमध्ये असतो. सतत एसीमध्ये बसल्याने शरीर आखडते. सारखा आळस येतो. कारण एसीमुळे शरीराला जरा वेदना होतात.  सांधेदुखीचा त्रास वाढण्याची शक्यता असते. तसेच इतरही काही हाडांचे त्रास उद्भवतात. ज्यांना अर्थरायटिससारखे आजार आहेत त्यांना अधिक त्रास होऊ शकतो. त्यामुळे मधेच एक फेरफटका मारायला एसी बाहेर जावे. साध्या वातावरणात फिरावे. 

एसीमुळे गारवा जरी मिळाला तरी शरीराची आर्द्रता कमी होते. तसेच शरीर व त्वचा कोरडी पडते. सर्दी खोकला वारंवार उद्भवतो. तसेच एसीच्या हवेमुळे डोकेदुखी वाढते. सतत बंद खोलीमध्ये बसल्याने पोटात डचमळते. ताजी नैसर्गिक हवा शरीराला मिळणे गरजेचे असते. तसेच एसीची सवय लागल्यावर बाहेरच्या वातावरणामध्ये अस्वस्थ वाटायला लागते.    


   
ऑफीसमध्ये तसेच उन्हाळ्यामध्ये एसी वापरावा लागतो.आता ते बंद करता येणार नाही. मात्र काळजी घेणे गरजेचे असते. सतत एसीमध्ये थांबावे लागत असेल तर कानामध्ये कापूस घाला. तसेच मध्येच एक फेरफटका मारा. व्यायाम करा शरीराला उष्णता मिळेल अशा कृती करा. सकाळच्या कोवळ्या उन्हामध्ये बसा, त्याचाही फायदा होतो.    

Web Title: Do you use AC? Then you must know these very important rules for health

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.