आपल्याला एखादी ऍलर्जी असेल किंवा कोणत्या गोष्टीचा त्रास होत असेल तर शरीर त्या गोष्टीच्या संपर्कात आल्यावर काही तरी प्रतिक्रिया देते. जसे की गरम मसाला फोडणी टाकला की लगेच धास लागते किंवा खोकला येतो. (Do you sneeze all the time? Sneezing is not only caused by colds and sinuses, see 2 more reasons)धुळीचे कण डोळ्यांपुढे आल्यावर डोळे लगेच चुरचुरतात. या साऱ्या शरीराने दिलेल्या प्रतिसादात्मक क्रियाच आहेत. असेच काहीचे शिंकेचेही असते. माणसाला शिंका येणे ही नैसर्गिक गोष्ट असली तरी कधीतरी सतत बऱ्याच शिंका येतात. एखादं दुसरीवर थांबतच नाही. अशी शिंका येण्यामागे काही कारणे असतात. पाहा काय कारणे असतात.
शिंका का येतात? शिंका येणे ही एक नैसर्गिक आणि संरक्षणात्मक शारीरिक प्रतिक्रिया आहे. (Do you sneeze all the time? Sneezing is not only caused by colds and sinuses, see 2 more reasons)नाकामध्ये किंवा घशाजवळ काही हुळहुळले किंवा तर ते घटक शरीराबाहेर टाकण्यासाठी नाकातून व तोंडातून जोरात हवा बाहेर फेकली जाते. त्यामुळे ते सुक्ष्म कण शरीराबाहेर टाकले जातात. याला वैद्यकीय भाषेत स्टर्नटेशन असे म्हटले जाते. शिंका येणे गरजेचेच असते मात्र सतत शिंका येणे चांगले नाही. त्यामागे काही वेगळी कारणे असतात.
१. अनेकांना परागकण, पाळीव प्राण्याचे केस खास म्हणजे धूळ व माती अशा गोष्टींची अॅलर्जी असते. त्यामुळे त्याच्या संपर्कात आल्यावर त्यांना भरमसाट शिंका येतात. नाकातून जोरात हवा बाहेर फेकली जाते त्यामुळे नाकातून रक्तही येते. अशी अॅलर्जी असणाऱ्यांनी डॉक्टरांच्या सल्याने योग्य ते उपाय करावेत. बाहेर जाताना मास्क वापरणे सगळ्यात सोयीचे ठरेल. तसेच धुळीशी संपर्क कमी येईल याची काळजी घ्यावी. काहींना सेंट, परफ्यूमच्या वासानेही शिंका येतात. त्यांना तो वास सहन होत नाही डोकेही ठणकायला लागते. असे असल्यास सेंट वापरणे बंद करा कोणी वापरत असेल तर थोडे दूर उभे राहा.
२. सततच्या श्वसन संक्रमणांमुळे शिंकांचे प्रमाण वाढते. नाकातील श्लेष्मल त्वचा सुजते आणि त्यामुळे शिंका येतात. सर्दी, खेकला, ताप याचे प्रमाण कमी करण्यासाठी योग्य ते उपचार कार. कायम सर्दी होत असेल तर सायनस असण्याची शक्यता आहे. त्यामुळे वेळीच वैद्य गाठायचा.
हळदीचे दूध प्या. साधे गरम पाणी प्यायचे. तसेच आल्याचा चहा प्यायचा. नाक कोरडे पडणार नाही याची काळजी घ्यायची. अशा साध्या उपायांनीही शिंकांचे प्रमाण कमी करता येते.