भारतीयांच्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग हा चहा मानला जातो. सकाळचा पहिला घोट असो किंवा कामाच्या वेळी घेतलेला छोटा टी ब्रेक असो.(Tea side Effects) एक कप चहा हा मनाला आणि शरीराला ऊर्जा देण्याचे काम करतो. पण अनेकांना चहा वारंवार गरम करुन पिण्याची सवय असते.(reheating tea side effects) आपल्यासोबत अनेकदा असं होतं की, बनवलेला चहा थंड पडतो आणि आपण तो पुन्हा गरम करुन पितो.(is it safe to reheat tea) थंड चहा वाया जाऊ देण्यापेक्षा पुन्हा गरम करुन प्यायलं तर काय बिघडलं असा प्रश्न देखील आपल्याला पडतो.(how long tea stays fresh) पण सारखा गरम करुन प्यायलेला चहा आरोग्याला हानी पोहोचवू शकतो.
दुधाचा चहा जास्त काळ साठवून ठेवणे धोकादायक आहे. तो २ ते ३ तासांत खराब होऊ शकतो. आपल्या खोलीच्या तापमानानुसार बॅक्टेरिया अधिक वेगाने वाढतात, ज्यामुळे चहाचे पोषक घटक नष्ट होतात.(tea health risks) आपल्यापैकी अनेकांना असं वाटतं की, चहा पुन्हा गरम करुन प्यायल्याने आरोग्याला हानी पोहोचत नाही.(drinking stale tea) पण वारंवार गरम केल्याने चहामधील टॅनिन आम्लयुक्त बनू शकतात, ज्यामुळे आम्लता, गॅस आणि पचनाच्या समस्या उद्भवतात. (harmful effects of old tea)काळी चहा ही जास्त काळ टिकू शकते. जर ती फ्रीजमध्ये ठेवली तर ६ ते ७ तास टिकते. परंतु, जितकी जास्त काळ साठवाल तितकी त्याची चव आणि अँटीऑक्सिडंट गुणधर्म कमी होतात.
खराब झालेला चहा कसा ओळखाल?
1. चहाच्या चवीत आंबटपणा किंवा कडूपणा जाणवणं.
2. चहामध्ये विचित्र वास किंवा थर तयार होणे.
3. रंग बदलणे किंवा फेस येऊ लागेल.
साठवलेल्या चहाचा आरोग्यावर होणारा परिणाम
1. वारंवार उकळवलेला चहा प्यायल्याने पचनसंस्थेवर परिणाम होतो. यामुळे आम्लपित्त, वायू, बद्धकोष्ठता आणि विषबाधा देखील होऊ शकते.
2. आपल्या शरीरातील पोषणाचे नुकसान होते. ज्यामुळे अँटीऑक्सिडंट्स कमी होतात आणि पोषक तत्व नष्ट होतात.
3. पुन्हा गरम केलेला चहा प्यायल्याने आतड्यांमधील बॅक्टेरिया कमकुवत होतात.