Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > महिलांमध्ये सतत ओटीपोट दुखण्याचं कारण माहिती आहे का? फक्त पाळी नाही तर 'या' सवयी ठरतात त्रासदायक

महिलांमध्ये सतत ओटीपोट दुखण्याचं कारण माहिती आहे का? फक्त पाळी नाही तर 'या' सवयी ठरतात त्रासदायक

Do You Know Why Women Have Frequent Lower Abdominal Pain? Not Just Periods, These Habits Can Be the Real Cause : ओटी पोट दुखण्याची विविध कारणे जाणून घ्या.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2026 17:00 IST2026-04-01T16:56:33+5:302026-04-01T17:00:06+5:30

Do You Know Why Women Have Frequent Lower Abdominal Pain? Not Just Periods, These Habits Can Be the Real Cause : ओटी पोट दुखण्याची विविध कारणे जाणून घ्या.

Do You Know Why Women Have Frequent Lower Abdominal Pain? Not Just Periods, These Habits Can Be the Real Cause | महिलांमध्ये सतत ओटीपोट दुखण्याचं कारण माहिती आहे का? फक्त पाळी नाही तर 'या' सवयी ठरतात त्रासदायक

महिलांमध्ये सतत ओटीपोट दुखण्याचं कारण माहिती आहे का? फक्त पाळी नाही तर 'या' सवयी ठरतात त्रासदायक

महिलांच्याआरोग्याशी संबंधित एक सामान्य पण त्रासदायक समस्या म्हणजे ओटीपोटात होणारी वेदना आणि पोट फुगणे. अनेकदा हा त्रास साधाच वाटतो, पण वारंवार होत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करणं योग्य नाही. यामागे काही शारीरिक, हार्मोनल आणि जीवनशैलीशी संबंधित कारणं असू शकतात.

सर्वात सामान्य कारण म्हणजे पचनाशी संबंधित समस्या. अयोग्य आहार, जास्त तिखट-तेलकट पदार्थ, वेळेवर न खाणं किंवा पाणी कमी पिणं यामुळे गॅस तयार होतो आणि पोट फुगतं. (Do You Know Why Women Have Frequent Lower Abdominal Pain? Not Just Periods, These Habits Can Be the Real Cause)यामुळे ओटीपोटात जडपणा आणि वेदना जाणवतात. महिलांमध्ये हार्मोनल बदल हेही एक मोठं कारण आहे. मासिक पाळीच्या आधी किंवा दरम्यान शरीरात होणाऱ्या बदलांमुळे पोटात सूज येते, पोट फुगल्यासारखं वाटतं आणि ओटीपोट दुखू शकतं. हा त्रास अनेक महिलांना नियमितपणे जाणवतो.

तसंच, बद्धकोष्ठता (कॉन्स्टिपेशन) ही समस्या देखील ओटीपोट फुगण्यामागचं महत्त्वाचं कारण आहे. पोट साफ न झाल्यामुळे आतमध्ये दाब निर्माण होतो आणि त्यामुळे वेदना व फुगणे वाढते. कधी कधी मूत्रमार्गातील संसर्ग (UTI) किंवा गर्भाशयाशी संबंधित समस्या जसे की सिस्ट, इन्फेक्शन यामुळेही ओटीपोटात वेदना होऊ शकतात. अशा वेळी वेदना सतत राहते किंवा तीव्र होते, त्यामुळे डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक असतं.

यावर उपाय म्हणून काही सोप्या सवयी अंगीकारणं खूप फायदेशीर ठरु शकतं. सर्वप्रथम, आहार हलका आणि संतुलित ठेवणं गरजेचं आहे. जास्त तेलकट, तिखट आणि प्रक्रिया केलेले पदार्थ टाळावेत. पोट हलकं राहील असे पदार्थ खावेत. दररोज पुरेसं पाणी पिणं खूप महत्त्वाचं आहे. यामुळे पचन सुधारतं आणि गॅसची समस्या कमी होते. सकाळी कोमट पाणी पिण्याची सवय लावली तर पोट साफ होण्यास मदत होते. हलका व्यायाम, चालणं किंवा योगा केल्यानेही पचन सुधारतं आणि पोट फुगण्याची समस्या कमी होते. विशेषतः पोटासाठीचे काही सोपी योगासनं फायदेशीर ठरतात.

तणाव कमी ठेवणंही तितकंच महत्त्वाचं आहे. कारण मानसिक तणावाचा परिणाम थेट पचनावर होतो. रिलॅक्सेशन तंत्र, ध्यान किंवा आवडत्या गोष्टींमध्ये वेळ घालवणं उपयोगी ठरतं. जर वेदना खूप तीव्र असेल, वारंवार होत असेल किंवा त्यासोबत इतर लक्षणं दिसत असतील, तर स्वतः उपचार करण्याऐवजी डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं आहे.
 

Web Title : महिलाओं में लगातार पेट दर्द: सिर्फ पीरियड्स नहीं, आदतें भी!

Web Summary : महिलाओं में बार-बार पेट दर्द पाचन, हार्मोनल बदलाव, कब्ज या यूटीआई के कारण हो सकता है। संतुलित आहार, जलयोजन, व्यायाम और तनाव कम करने जैसे जीवनशैली में बदलाव से परेशानी कम हो सकती है। लगातार, गंभीर दर्द के लिए चिकित्सीय सलाह लें।

Web Title : Persistent abdominal pain in women: Not just periods, habits matter!

Web Summary : Recurring abdominal pain in women can stem from digestion, hormonal shifts, constipation or UTI. Lifestyle changes like balanced diet, hydration, exercise, and stress reduction can alleviate the discomfort. Seek medical advice for persistent, severe pain.