Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > हळकुंडाचे विविध फायदे माहिती आहेत का ? त्वचा होईल सुंदर, वेदनाही करते कमी - पाहा कशी हळद लावायची

हळकुंडाचे विविध फायदे माहिती आहेत का ? त्वचा होईल सुंदर, वेदनाही करते कमी - पाहा कशी हळद लावायची

Do you know the various benefits of turmeric stick? The skin will become beautiful, it also reduces pain - see how to apply turmeric stick : हळकुंड आरोग्यासाठी फारच फायद्याचे. पाहा कसे वापरायचे.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2025 16:29 IST2025-12-05T16:25:35+5:302025-12-05T16:29:19+5:30

Do you know the various benefits of turmeric stick? The skin will become beautiful, it also reduces pain - see how to apply turmeric stick : हळकुंड आरोग्यासाठी फारच फायद्याचे. पाहा कसे वापरायचे.

Do you know the various benefits of turmeric stick? The skin will become beautiful, it also reduces pain - see how to apply turmeric stick | हळकुंडाचे विविध फायदे माहिती आहेत का ? त्वचा होईल सुंदर, वेदनाही करते कमी - पाहा कशी हळद लावायची

हळकुंडाचे विविध फायदे माहिती आहेत का ? त्वचा होईल सुंदर, वेदनाही करते कमी - पाहा कशी हळद लावायची

हळकुंड हा भारतात घराघरात वापरला जाणारा पदार्थ आहे. आपल्या स्वयंपाकघरात तो सहज सापडतो आणि आयुर्वेदात तर त्याचे स्थान अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. हळकुंड रंग, सुगंध आणि औषधी गुणांनी समृद्ध असतो. हळकुंड वापरण्याचे अनेक फायदे असतात. (Do you know the various benefits of turmeric stick? The skin will become beautiful, it also reduces pain - see how to apply turmeric stick)आपल्याला ते माहिती ही नसतात. त्वचा ते जखम अनेक समस्यांवर हळकुंड वापरता येते. 

हळकुंडाचा सर्वात मोठा गुण म्हणजे त्यातील प्रतिजैविक (antiseptic) आणि दाहशामक (anti-inflammatory) गुणधर्म. हळदीपेक्षा हळकुंड जास्त शक्तीशाली असते. त्यामुळे जखम भरून येण्यात तो मदत करतो, सूज कमी करतो आणि शरीरातील विषारी द्रव्ये बाहेर काढण्यात सहाय्य करतो. यात कर्क्युमिन नावाचे घटक मुबलक प्रमाणात असते, जे रोगप्रतिकारक शक्ती वाढवणे, त्वचा उजळवणे आणि वेदना शांत करणे यासाठी उपयुक्त असते. रक्तशुद्धीकरण आणि पचनक्रिया सुधारण्यामध्येही हळकुंडाची भूमिका मोठी आहे.

याचा वापर अनेक प्रकारे करता येतो. त्वचेवर लावल्यास तो नैसर्गिक क्रीमप्रमाणे काम करतो, हळकुंड उगाळून लावा किंवा त्याची पेस्ट तयार करा. पुरळ, त्वचेवरील डाग, खाज किंवा अॅलर्जी कमी करण्यासाठी हळकुंड फायद्याचा असतो. हिवाळ्यात कोरडी, निस्तेज त्वचा पुन्हा तजेलदार दिसावी म्हणून हळकुंडाचा हलका लेप खूप उपयोगी ठरतो. केसांवरही हळकुंडाचा उपयोग होऊ शकतो, केसातील बुरशी, कोंडा किंवा खाज कमी करण्यासाठी त्याचा हलका लेप लावतात. जखमेवर हळकुंड फार उपयुक्त ठरते. 

आयुर्वेदात मात्र हळकुंडाचा उपयोग केवळ बाहेरूनच नाही तर आतूनही केला जातो. सर्दी-खोकला होणे, घशात कफ साचणे, अंगदुखी किंवा तापाच्या सुरुवातीच्या अवस्थेत हळकुंड दुधात मिसळून प्यायल्यास शरीराला आराम मिळतो. पचन सुधारण्यासाठी, भूक वाढवण्यासाठी आणि शरीर उष्ण ठेवण्यासाठीही हळकुंड मदत करते.
हळकुंडाचे गुण शांत, स्थिर आणि फायदेशीर असतात. घरातील छोट्या-मोठ्या तक्रारींवर तो सहज वापरता येतो, आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तो पूर्णपणे नैसर्गिक आहे. सौंदर्य, आरोग्य, प्रतिकारशक्ती आणि स्वच्छता या सर्वांसाठी त्याचा एक छोट्यासा तुकडा फाद्याचा ठरतो. हळकुंडात अनेक गुणधर्म सामावलेले आहेत. योग्य प्रमाणात आणि योग्य प्रकारे वापरला तर हळकुंड शरीराला आतून बाहेरून दोन्ही बाजूंनी निरोगी ठेऊ शकतो.

Web Title : हल्दी के फायदे: सुंदर त्वचा, दर्द से राहत और उपयोग का तरीका

Web Summary : हल्दी, एंटीसेप्टिक और एंटी-इंफ्लेमेटरी गुणों से भरपूर, घाव भरने, सूजन कम करने और विषहरण में सहायक है। कर्क्यूमिन प्रतिरक्षा बढ़ाता है और त्वचा को निखारता है। यह त्वचा, घावों और दूध के साथ सेवन करने पर आंतरिक स्वास्थ्य के लिए बहुमुखी है।

Web Title : Turmeric Stick Benefits: Beautiful Skin, Pain Relief, and How to Use

Web Summary : Turmeric stick, rich in antiseptic and anti-inflammatory properties, aids healing, reduces swelling, and detoxifies. Curcumin enhances immunity and brightens skin. It's versatile for skin issues, wounds, and internal health when consumed with milk.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.