Join us

उठता-बसता हाडांमधून कटकट आवाज येतो? खा ६ पदार्थ रोज, ठिसूळ हाडं होतील दणकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2025 11:56 IST

Causes of bone cracking: Calcium-rich foods for strong bones: Prevent bone cracking naturally: Healthy bones diet: आपल्या शरीराला पुरेसे कॅल्शियम मिळाले नाही तर हाडे कमकुवत होतात. त्यासाठी आहारात काही पदार्थ नेहमी खायला हवे.

आपल्या शरीरातील सगळ्यात महत्त्वाचा भाग हाडं.(Causes of bone cracking) हाडांशिवाय शरीराची संपूर्ण रचना अपूर्ण आहे. वय वाढू लागले की हाडे ठिसूळ होतात.(Calcium-rich foods for strong bones) ज्यामुळे चालताना-उठताना आणि बसताना आपल्याला अधिक त्रास होतो. हल्ली ऐन तारुण्यातच हाडं-सांधेदुखीचा त्रास सहन करावा लागतो. (Prevent bone cracking naturally) गुडघेदुखी, कंबरदुखी, पाठ दुखण्याची समस्या तरुणांमध्ये वाढताना दिसत आहे.(Healthy bones diet) वयाची तिशी ओलांडण्यापूर्वीच दुखणं आपल्या अंगाशी येते.(Foods high in calcium) हाडांना पुरेशा प्रमाणात पोषक तत्व मिळण्याची गरज असते. हाडं कॅल्शियम, फॉस्फेट आणि इतर खनिजे साठवून आपल्याला शरीराला चालना देतात. (Natural calcium sources) वयोमानानुसार दररोज ७०० ते १००० ग्रॅम कॅल्शियमची आवश्यकता आपल्या शरीराला असते.(Calcium for bone strength) आपल्या शरीराला पुरेसे कॅल्शियम मिळाले नाही तर हाडे कमकुवत होतात. त्यासाठी आहारात काही पदार्थ नेहमी खायला हवे.(Best food for bone density) ज्यामुळे हाडे ठिसूळ होण्याऐवजी अधिक दणकट होतील. 

दिवसाची सुरुवात कशाने करावी? चहा की लिंबू पाणी - काय तब्येतीला जास्त बरे

1. कडधान्य 

आपल्या आहारात लाल तांदूळ, ओट्स आणि क्विनोआ सारख्या पदार्थांना खायला सुरुवात करा. यामध्ये भरपूर मॅग्नेशियम आणि कॅल्शियम असते. हे नियमितपणे खाल्ल्यास आपली हाडे सुदृढ राहतील. 

2. मासे 

सॅल्मन, सार्डिन या माशांमध्ये व्हिटॅमिन डी आणि ओमेगा -३ फॅटी ॲसिड असतात. जे आपल्या शरीराला कॅल्शियम शोषण्यास आणि जळजळ कमी करण्यास मदत करतात. हे खाल्ल्याने हाडे आणि सांधे मजबूत होतात. 

3. टोफू 

टोफू, मसूर आणि बीन्समध्ये प्रथिनांचे चांगले स्त्रोत आहे. यात कॅल्शियम, फॉस्फरस आणि मॅग्नेशियम देखील असते. कॅल्शियमने बनवलेले टोफू हाडांसाठी खूप चांगले असते. भाज्या, डाळी किंवा सॅलडमध्ये आपण खाऊ शकतो. 

4. दुग्धजन्य पदार्थ 

दूध, दही आणि चीज हे कॅल्शियमचे चांगले स्त्रोत आहे. आपण सोया, बदाम किंवा ओट मिल्कसारखे फोर्टिफाइड पर्याय उपलब्ध आहेत. जे हाडांसाठी फायदेशीर आहेत. आपण हे सकाळच्या नाश्त्यामध्ये खाऊ शकतो. 

5. ड्रायफ्रूट्स 

बदाम, तीळ, सूर्यफुलाच्या बिया आणि अळशीच्या बिया शरीराला पुरेशा प्रमाणात कॅल्शियमसह इतर खनिजे देतात. ज्यामुळे हाडे मजबूत तयार करण्यास आणि जळजळ कमी करण्यास मदत करतात. आपण हे नियमितपणे खाल्ल्यास हाडं चांगली राहतील. 

6. हिरव्या पालेभाज्या 

पालक, बोक चॉय सारख्या अनेक हिरव्या पालेभाज्यांमध्ये कॅल्शियम, व्हिटॅमिन के आणि मॅग्नेशियम भरपूर प्रमाणात आढळते. हे आपल्या हाडांची ताकद तर वाढवते तसेच त्यांना ठिसूळ होण्यापासून रोखते. आपण विविध प्रकारे आहारात खाऊ शकतो.   

टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्स